Project

म्हाडा नियुक्त विकासकच करणार मोतीलाल नगरचा पुनर्विकास मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर पुनर्विकासाला परवानगी गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर नावाच्या म्हाडाच्या १४१ एकर जमिनीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि.२५ रोजी विकासक नियुक्तीबाबत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उपनगरतील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रकल्पात म्हाडाने काही दिवसांपूर्वीच प्रकल्प सल्लागार आणि विकास संस्था (सीडीए) म्हणून अदानी रिअॅल्टीची नियुक्ती केली.

Read More

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी - अमित शहा, राजनाथसिंग, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंग चौहान, नीती आयोगात भेट

राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच नीती आयोगाशी या बैठका झाल्या.

Read More

राज्याची विजनिर्मिती क्षमता ६,४५० मेगावॅटने वाढणार

मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक करार; ३१ हजार ९५५ कोटींची गुंतवणूक, १५ हजार रोजगार संधी महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने मंगळवारी चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. या करारांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी ठरले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे ६ हजार ४५० मेगावॅट वीजनिर्मिती,

Read More

मोतिलालनगर विकास समितीच्या आंदोलनकडे रहिवाशांची पाठ , आंदोलकांकडून अवास्तव मागण्या आणि केवळ व्यावसायिकांचे हीत , रहिवासी समितीकडून कायदेशीर लढाई सुरु

गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे. मात्र, यानंतरही पुनर्विकास प्रकल्पातील अनेक मुद्द्यावरून रहिवासी संघटनांमध्ये नाराजी आहे. याच अनुषंगाने बुधवार,दि.१६ रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोतिलालनगर विकास समितीच्यावतीने आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनाकडे इतर रहिवासी संघटना आणि प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरविल्याचे दिसून आले.

Read More

मुंबईतील विकासकामे थांबवता येणार नाहीत परंतु वारसस्थळांची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं : उच्च न्यायालय

मेट्रो-३ प्रकल्पाच्या भूमिगत कामांमुळे इमारतीला नुकसान झाल्याचा आरोप करणाऱ्या जे. एन. पेटिट हेरिटेज इमारतीच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत गुरूवार, दि.११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विकास आणि वारसा यामधील समतोल राखत म्हटले की, मुंबईसारख्या शहरात विकास थांबवता येणार नाही. परंतु भावी पिढीसाठी वारसा इमारतींचे जतन आणि देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

Read More

उमरखाडी समूह पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी - अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही

'उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समुह पुनर्विकासाचा प्रस्ताव दि.०३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी करण्याकरीता वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तुशास्त्रज्ञाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येईल' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती सादर केल

Read More

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Read More

कुर्ला येथील जागेत उभ्या राहणार धारावीकरांसाठी उंच इमारती

करारनाम्यातील अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास सरकारची मान्यता

Read More

‘उदंचन जलविद्युत प्रकल्पा’मध्ये ५७,२६० कोटींची गुंतवणूक

Investment of Rs 57,260 crores in Udanchan jalvidyut Project

Read More

उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५७,२६० कोटींची गुंतवणूक

राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121