एकपात्री नाट्यप्रयोगांचे बादशहा सदानंद जोशी यांच्या आजपासून सुरु होणार्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्मृतीची पाने चाळता’ या विशेष स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील सहयोग मंदिरात आज शनिवार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजता हा कार्यक्रम पार पडेल. ठाण्यातील ‘व्यास क्रिएशन्स’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे हे असून आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांच्यासह ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी आमदार कांता नलावडे आदी मान्यवर प्रमुख
Read More