राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दि. ५ एप्रिल २०२६ आणि पीयूष गोयल यांचा कार्यकाल दि. ४ जुलै २०२८ असा आहे. तथापि, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोघेही विजयी झाल्याने राज्यसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
Read More
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटीच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीदेखील प्रत्युत्तर दिले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सोमवारच्या भाषणातील वादग्रस्त उल्लेख कामकाजातून काढण्यात आले आहेत. त्याविषयी नाराजी व्यक्त करून गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रथमच दिलेल्या भाषणात हिंदू समाजास लक्ष्य करण्यात आले होते. त्याविषयी मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला होता.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक यांच्यात एकच जुंपल्याचे पाहायला मिळाले. यातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकच गदारोळ संसदेत माजला होता. सत्ताधारी पक्षाकडून राहुल गांधींच्या वक्ततव्याचा चांगला समाचार घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणणे हा गंभीर विषय असल्याचे संसदेत म्हटले आहे.
संसदेतील राहुल गांधी यांचे भाषण ऐकताना 1930 च्या दशकात जर्मनीत, हिटलरचा सहकारी ज्योसेफ गोबेल्सने खोटेपणाला कशी प्रतिष्ठा दिली होती, त्याची झलक भारतीयांना पाहायला मिळाली. दडपून आणि वारंवार आत्मविश्वासपूर्ण आवाजात खोटे बोलत राहिल्याने असत्य हेच सत्य आहे, असे वाटू लागते. पुढील पाच वर्षे भारतीयांना राहुल गांधी यांच्या या असत्याच्या फॅक्टरीतून निघणार्या अनेक खोटेपणाच्या युक्तिवादांसाठी सिध्द व्हावे लागेल. मात्र भाजपला या असत्याला तितक्याच जोमदारपणे आणि प्रभावीरीत्या प्रत्युत्तर देण्याची व्यवस्था निर्माण करावी ल
हाती संविधान घेऊन खासदारकीची शपथ घेणार्या राहुल गांधींना सत्ताधार्यांनी आणीबाणीचा निषेध करणार्या मौनाद्वारे आपल्या मनसुब्यांची चुणूक दाखवून दिली आहे. आता केवळ आरोप-प्रत्यारोप करून राहुल गांधी राजकीय जाहिरातबाजी करू शकत नाही. त्यांना संपूर्ण तथ्ये आणि नियमांसह सरकारला घेरावे लागेल. यातील त्यांचे कसबच त्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहे.
आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीवरील काळा डाग आहे. आणीबाणीच्या ५०व्या वर्षपूर्तीच्या एक दिवस अगोदर अठराव्या लोकसभेच्या पहिल्यया अधिवेशनास प्रारंभ होत असून संविधानात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
एआय सारख्या नवतंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. डिजिटल इंडिया बिल हे केंद्र सरकारकडून डिजिटल सुरक्षेसाठी नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप सदस्यांनी ‘तिसरी बार मोदी सरकार’ आणि ‘बार बार मोदी सरकार’ अशा घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत भाजप सदस्यांमध्ये तीन राज्यांमधील विजयामुळे वाढलेला आत्मविश्वास दिसून आला.