१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती
Read More
जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट झाला असून जिल्हा परिषदेने सर्वेक्षण करून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे, या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेऊन देऊन नये, असे आवाहन परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्षे संपत आले असले, तरी ‘कोविड’च्या बंद काळातील कोरडा शिधा विद्यार्थ्यांना पुरविण्याच्या राज्य शासनाच्या सूचना आहेत
विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या गुढ्या उभारून त्याची पूजा करत ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक शाळेने यावर्षीचा गुढीपाडवा एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांना आपल्या मराठी संस्कृतीचे महत्त्व समजावे म्हणून विविध उपक्रम या शाळेकडून राबवण्यात येतात. त्याप्रमाणे दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवून गुढीपाडवा साजरा केला जातो.
देशात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला.
अतिशय कमी उत्पन्न गटातील श्रमजिवी, कष्टकर्यांच्या परिवारातील बालकांना संस्कारासह उत्तम माणूस घडविणारे शिक्षण देण्याचे आणि अन्य आवश्यक सेवा पुरविण्याचे कार्य कर्तव्यभावनेने बजावत आहे देवगिरी प्रांताच्या विद्या भारती शाखेशी संलग्न आणि उंबरखेडे येथील खान्देश बहुउद्देशीय मंडळ संचालित ‘सरस्वती शिशुवाटिका आणि प्राथमिक विद्यालय.’ चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील आडगावपासून 4 कि.मी. अंतरावर हे गाव प्रथमदर्शनीच प्रेमात पडावे, असे छान आहे.