भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. परंतू, त्यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाचे नेते प्रविण माने नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे आता ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
Read More
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार गटातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे हे नेते शरद पवार गटात बंड पुकारण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूका जवळ आल्या असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहे. यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि सुप्रिया सुळेंचे प्रचारक प्रविण माने तसेच सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे प्रचारक प्रविण माने यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, यावर आता सुप्रिया सुळे यांनी हे शरद पवारांना संपवण्याचं षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. याआधीही त्यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा असं वक्तव्यं केलं होतं. मात्र, आता फडणवीसांनी प्रविण मानेंची भेट घेतल्यानंतर हे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.