वेळास किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'प्रथमा' या मादी कासवाचा 'लोकेशन सिग्नल' बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. वेळासपासून गुजरातच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. प्रथमने आतापर्यंत २७०० किमीचे अंतर कापले आहे. प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होते. तर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या इतर तीन कासवांचा दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास स
Read More