मुंबई : मुंबै बँक, रायगड बँकचे संचालक व ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ( MTB ) स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रविंद्र जाधव यांनी त्यांच्या दहिसर कार्यालयात भेट देत ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तक देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Read More
'दि. मुंबई डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह फेडरेशन'च्या वतीने विक्रोळीत शिक्षण प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. ही वास्तू विधानपरिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या निधीतून उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमीपूजन दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते विक्रोळी पूर्वेत इमारत क्र. ७७ शेजारी, कन्नमवारनगर-२ जुन्या पोलीस स्टेशन शेजारी होणार आहे.
“जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे परमेश्वर उभा असतो, जनता जनार्दन उभी असते. त्यामुळे मागाठाणेच्या महापालिकेतील प्रत्येक प्रभागात भाजपचेच कमळ फुलेल,” असे प्रतिपादन भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. भाजप मागाठाणे विधानसभेतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ते बोलत होते.
सलग दोन वर्षे सातत्याने मुंबई आणि रायगडच्या कोरोना रुग्णांचे आधारस्थान बनलेले मुंबई हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष नगरसेवक प्रकाश दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.