मध्य प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिरात तीन मुस्लिम व्यक्तींनी जबरदस्तीने नमाज पठण केल्याची घटना घडली आहे. रुस्तम, अकबर आणि बाबू खान अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय हे ६५ ते ८५ दरम्यान आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध एफआरआय नोंदवून त्यांना ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी २६ ऑक्टोबर २०२४ घडली. हे कृत्य त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत स्थानिक हिंदू समुदायाने कठोर कारवाईची मागणी केली.
Read More
शुक्रवारी, दि. ८ मार्च २०२४ दिल्लीतील इंद्रलोक परिसरात अनेक मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला. व्हिडिओमध्ये काही पोलिस अधिकारी रस्ता अडवत असल्याने त्यांना बाजूला होण्यास सांगत आहेत. तथापि, एक अधिकारी येतो आणि नमाज पठण करणाऱ्या माणसाला लाथ मारतो आणि त्याला जागेवरुन हटण्यास सांगतो.