राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी गिरगाव येथील गोल देऊळ, कुंभारवाडा येथे बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या बाईक रॅलीतील रामभक्तांना काही कट्टरपंथीयांनी थांबवून धमकावले.
Read More
मुंबई, दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.