(World's Largest Dencentralized Solar Power Project) शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.
Read More
(Pm Narendra Modi) काँग्रेस शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देते. भारताला विकासापासून रोखणारे त्यांच्यासोबत आहेत. इंग्रजांप्रमाणेच काँग्रेसचे केवळ देशाला लुटण्याचे विचार राहिले आहेत. एका परिवाराची देशावर सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांची धडपड असते. दलित, आदिवासी, वंचित घटकांना त्यांनी कधीही बरोबरीचे मानले नाही. काँग्रेसने बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक व्यवहार केला, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी केली.
बंजारा सामाजाची काशी म्हणून पोहरादेवीला ओळखले जाते. गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी धर्मगुरु महंत जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेमध्ये बंजारा समाजाच्या बांधवांचा मोठा सहभाग होता. त्यासोबतच युवा पिढीनेसुद्धा शोभायात्रेत आपला विशेष सहभाग नोंदविला होता. दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक पोहरादेवी परिसरात निघाली होती. युवापिढी भगवा ध्वज फडकवताना यावेळी दिसून आली. (Sevalal Jayanti Poharadevi
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोपसत्राला सामोरे गेल्यानंतर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी गडावर जाणार आहेत. राठोड यांच्या घराबाहेर गाड्यांचा ताफा उभा ठेवण्यात आलेला आहे. इतके दिवस अक्षरशः गायब असणारे राठोड आज सबंध प्रकाराबाबत काय उत्तरं देतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागून राहीलेलं आहे.