शाश्वततेच्या दिशेने पुढाकार घेत टाटा पॉवरने नुकतेच मुंबईतील देवनार येथे दत्ताराम पाटील, जी गार्डन येथे वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, टाटा पॉवरचे प्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम, स्थानिक स्वयंसेवी संस्था, तसेच कर्मचारी व स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बुधवार, १७ सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सेरोपेगिया मोहनरामी, किंवा मोहनरामची सेरोपेगिया, ही एक अत्यंत धोक्यात आलेली, ताठ, कंदयुक्त वनस्पती आहे जी भारतातील महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम घाटातील लॅटरिटिक पठारांवर आढळते. हिरव्या, फ्लास्क-आकाराच्या फुलांनी वैशिष्ट्यीकृत, पिंजऱ्यासारख्या अनोख्या लोबसह, या वनस्पतीचे नाव प्राध्यापक एच.वाय. मोहन राम यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि अधिवास नष्ट होण्यापासून आणि चराईमुळे तिला मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे आययूसीएनने तिला "गंभीरपणे धोक्यात आलेले" दर्जा दिला आहे.
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील प्रत्येक सण आणि उत्सवामध्ये काहीतरी अर्थ निहित आहे. काहीतरी शास्त्र अंतर्भूत आहे. काहीतरी सामाजिक आशय आहे. आणि मुळात संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. मनात आले म्हणून तो शब्द ऋषींनी बनवलेला नाहीये. गणेश चतुर्थीला गणपतीला त्याची पूजा करताना २१ प्रकारची
हुतात्मा प्रतिष्ठानच्या "पर्यावरण व संवर्धन" प्रकल्पांतर्गत दिनांक ३० जुलै २०२५ रोजी ओम पब्लिक स्कूल, कल्याण शिळफाटा रोड, डायघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी मोगरा, सोनचाफा, जाई, जुई,चमेली, पारिजातक, जास्वंद, अबोली, शमी,हिरवा चाफा, रातराणी, अनंत ही फुलझाडे लावण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्यात येत असून याद्वारे दररोज एकूण २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची माहिती उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) तथा प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे यांनी दिली.
महाराष्ट्राची किनारी संरक्षण भिंत म्हणजे कांदळवन. खारफुटी, चिप्पीचे जंगल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे जंगल म्हणजे किनारी लोकांसाठी रोजगारनिर्मितीचा ठेवा. येत्या आठवड्यातील दि. 26 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त या समृद्ध वनाची ओळख करून देणारा हा लेख
मुंबईतील एक महत्वाचे ठिकाण असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मंगळवार दि. १५ जुलै रोजी ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने याचा तपास करत हा खोटा बनाव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत म्हाडाने गृहप्रकल्प परिसरात दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या झाडांची निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 'म्हाडा'चे उपाध्यक्ष
आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. सं
चंद्रपूर हे शहर औद्योगिक शहर आहे. खाणी, सिमेंट, स्फोटके, कागद आणि कापडाचे कारखाने या ठिकाणी आहेत. या शहरात प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे चंद्रपूरला प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने पायलट प्रोजेक्ट राबवावा, अशी विनंती आज सभागृहात अर्धा तास चर्चेवेळी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली. दरेकर यांच्या विनंतीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही सकारात्मक उत्तर दिले.
ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'हरित ठाणे अभियाना'त वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरूवार, ०५ जून रोजी होणार आहे.
कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून,वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात.
(PM Narendra Modi inaugurated a locomotive plant in Dahod) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी दि. २६ मे रोजी वडोदऱ्यातील रोड शोने दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर दाहोद येथे पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील पहिल्या लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवत प्रकल्पाचा शुभारंभ केला. लोकोमोटिव्ह प्लांटच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी स्वतः इंजिनात बसून त्याची माहिती घेतली. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आण
प्रत्येक सजीव जीवाची बाह्य किंवा अंतर्गत अशी संरक्षणप्रणाली विकसित झाली आहे. झाडांमध्येही संरक्षणप्रणाली विकसित झालेली आहे. त्यामुळे संकटावेळी वनस्पती आपले स्वसंरक्षण कसे करतात आणि यामध्ये त्यांना कोणते घटक मदत करतात, याविषयी ऊहापोह करणारा लेख...(CNGC channel in plant)
खरेच ऋतूंची फुले होतात की फुलांचे ऋतू असतात? प्रश्न पडलाय का की ठराविक महिन्यामध्येच फुले का फुलतात? या सगळ्याचे कुतूहल शमवणारा हा लेख...
( comprehensive policy benefit local industries from thermal power plants Chief Minister Devendra Fadnavis ) औष्णिक केंद्रांमधील राखेबाबत २०१६ मध्ये शासनाने केलेल्या धोरणात २० टक्के राख स्थानिक उद्योगासाठी आणि ८० टक्के लिलाव असे प्रमाण होते. परंतु केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १०० % लिलाव करावा लागतो. या राखेचा स्थानिक उद्योगांना लाभ होऊन उद्योग वाढीसाठी शासन सर्वंकष धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
भारतीय जंगलांमध्ये काही विदेशी झाडे, झुडूपे आणि वेलींनी आपली पाळेमुळे पसरली असतानाच यामध्ये अजून दोन प्रजातींची भर पडली आहे (exotic plant species). आफ्रिका खंडात आढळणाऱ्या 'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' या औषधी वनस्पतीची आणि 'कॉन्व्होल्वुलस फॅरिनोसस' या वेलीची भारतामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (exotic plant species). या प्रजाती अनुक्रमे गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रजातींवर अजून दोन नव्या विदेशी प्रजातींचे आक्रमण झाले आहे. (exotic plant species)
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ( Life Giver ) ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो३च्या विविध स्थानकांवर इन-सीटू मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत १०००हून अधिक झाडे लावली.
(Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावातील कातळ सड्यावरून कोथिंबिरीच्या कुटुंबातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे (sindhudurg new plant species). पावसाळ्यामध्येच उगवणार्या या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावे ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ असे करण्यात आले आहे (sindhudurg new plant species). या प्रजातीच्या शोधामुळे जगात केवळ आंबोली-चौकुळ या जैवसंपन्न प्रदेशामध्येच सापडणार्या प्रजातींची संख्या २३ झाली आहे. (sindhudurg new plant species)
देशभरातील ३६ कोळसा आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून एकूण ६२,१९४ मेगावॅट क्षमतेसह, एनटीपीसी लिमिटेडने कोळशासोबत बायोमास मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उद्देशाने, एनटीपीसीने एक निवेदन (ईओआय) जारी केले आहे, ज्याद्वारे त्यांचे किंवा इतर भागीदारांद्वारे त्याच्या केंद्रांसमोर निर्माण होणाऱ्या पॅलेट प्लांट्ससाठी बायोमास पुरवठादारांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी एनटीपीसी लिमिटेडच
(ReNew power plant) राज्यातील प्रकल्प गुजरातला आणि राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेस आणि मविआ सातत्याने करत आहे. नुकतेच काँग्रेसने आमदार आणि विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘रिन्यू पॉवर प्लांट’ महाराष्ट्रातून गुजरातला गेला, अशी माहिती दिली. मात्र या अपप्रचाराची खुद्द कंपनीनेच निवेदन काढत पोलखोल केली. इतकेच नाही, तर महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवणार असल्याची माहितीही दिली. याच निवेदनाचा हवाला देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
पुणे जिल्ह्यातील लोणावळास्थित भुशी धरण परिसरातून १९१८ साली शोधण्यात आलेली ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ ही पाणवनस्पतीची प्रजात नामशेष झाली आहे (Limnophila limnophiloides plant species endemic to bhushi dam). ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) या संदर्भातील घोषणा केली आहे. ‘आययूसीएन’ने आपल्या ‘लाल यादी’त या प्रजातीला ‘नामशेष’ म्हणून नमूद केले आहे. या प्रजातीच्या शोधानंतर गेल्या कित्येक वर्षांत या प्रजातीचा मागमूस न लागल्याने आणि भुशी धरण क्षेत्रात झालेल्या पर्यटनवाढीमुळे जगात केवळ या परिसर
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
टाटा इलेक्ट्रॉनिकसने देशात चिप उत्पादनात मोठी गुंतवणूक केली आहे. आसाम राज्यात टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट या अंतर्गत आसाममधील जागीरोड येथे प्लांट उभारणार असून याचे भूमीपूजन सोहळ्याकरिता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी 'एकदांडी' म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स' (Dipcadi concanense) ही प्रजात प्रथमच दापोली तालुक्यात बहरली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते (Dipcadi concanense). या रोपण यशस्वी झाले असून या 'संकटग्रस्त' प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे. (Dipcadi concanense)
टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी व कर्मचारी संघ सलंग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना दरवर्षी सामाजिक कर्तव्य म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम त्यांच्या पाच राज्यांतील विविध विभागामध्ये राबवत असते. ठाणे विभागाचा वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (ता.१४ जुलै) पानखंडा, घोडबंदर रोड, येथे संपन्न झाला.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ‘भाबरी’ (bhabari) या दुर्गम गावातील गावकर्यांनी अधिवास संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांना जाणवणार्या समस्यांची घेतलेली दखल...(bhabari)
झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असतानाच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील या चित्रपटाचा ट्रेलर बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यातील माउली थिएटर येथे लाँच करण्यात आला. याप्रसंगी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, पीएस आय राजेश पाटील, दिलीप गीते, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होते. १००० वृक्षांची लागवडही याप्रसंगी उपस्थित मंडळींच्या हस्ते करण्यात आली. २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
नुकतेच मुंबई शहराला सलग तिसर्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने मुंबई शहरातील वृक्षगणना, वृक्षांचे प्रकार आणि एकूणच या महानगराला लाभलेल्या या हरित कवचाच्या संरक्षण आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
पुणे मनपा शाळा, पुणे विद्यार्थी गृह आणि अभिनव कला महाविद्यालय असा प्रकाश ढगे यांचा शैक्षणिक प्रवास. निसर्गाशी घट्ट मैत्री टिकवणार्या प्रकाश यांची एकूणच वाटचाल प्रेरक आणि उत्सावर्धक आहे.
वेलस्पून एंटरप्राईज ४१२४ कोटी रुपयांचा पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा महाराष्ट्रात उभा करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मुंबईतील भांडूप येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.'
राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जा निर्मितीवर सरकारने विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले होते. वाढत्या ऊर्जेची मागणी व गरज लक्षात घेता सोलार रुफटॉप योजनेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सरकारने ' प्रधानमंत्री सर्वोदय योजना ' सुरू करत १ कोटी कुटुंबांना रुफटॉप सौर उर्जा देण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नांना जोड देण्यासाठी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने राजस्थानात ७० मेगावॉटचा पहिलावहिला सौर उर्जा निर्मितीसाठी कंबर कसली आहे.
टाटा पॉवरने आपल्या विस्तारीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जलपूरा खुरजा पॉवर प्रकल्प हा टाटा पॉवर कंपनी खरेदी करणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. यासंबंधी जलपूरा खुरजा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्प सुमारे ८३८ कोटी रूपयांनी खरेदी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी टाटा पॉवरने शुक्रवारी आपल्याला आर ई सी पॉवर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीडून लेटर ऑफ इंटेट ( एल ओ एल ) पत्र मिळाल्याचे जाहीर केले होते. टाटा पॉवरकडून हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास स्पेशल परपज व्हेईकल ( एस पी व्ह
'इंटरनॅशनल यूनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) (iucn red list plant) लाल यादीत महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनस्पतीच्या तीन प्रजातींना धोकाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. निसुर्डीच्या कुळातील दोन प्रजातींना 'संकटग्रस्त' (एनडेंजर्ड) आणि कोच कुळातील एका प्रजातीला 'नष्टप्राय' (क्रिट्रीकली एनडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. (iucn red list plant) यामुळे सह्याद्रीत अगदी मोजक्याच ठिकाणी सापडणाऱ्या या प्रजातींच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. (iucn red list plant)
केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा रूपांतरणासाठी छोट्या अणुभट्ट्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बुधवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, अणुऊर्जा हा वीज निर्मितीसाठी सर्वात आशादायक स्वच्छ ऊर्जा पर्यायांपैकी एक मानला जातो. आगामी काळात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर पडत आहे.
मुंबई महानगपालिकेत कोविड काळात झालेल्या ऑक्सीजन घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या एका निकटवर्तीयाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये रोमीन छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या असोसिएट्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
आज पुन्हा एकदा कोविड काळातील मुंबई महापालिकेकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याची बातमी आली. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. आणि उबाठा गटाचे आदित्य ठाकरेंशी संबधित एका व्यक्तीवर कोविड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने धाड टाकली.आणि आता पुढचं नाव कोणाचं? कोण आहे कोविड घोटाळ्यातील पुढचा आरोपी? असे बरेच प्रश्न निर्माण झाले.
भारतातील पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पाने (केएपीपी) वीज निर्मिती सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदनही केले आहे.
जपान सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या तयारीत आहे, ज्याला खुद्द जपानी नागरिकांकडून जोरदार विरोध सुरू झाला. त्यानिमित्ताने जपानकडे हे किरणोत्सारी पाणी कुठून आले आणि ते समुद्रात का सोडले जाणार आहे, हे जाणून घेऊया.