मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात, पिथमपूर येथे विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावू नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करीत होते. अशातच यातील काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न करत स्वताच्या अंगावर तेल ओतून घेतले. एका क्षणात भडका उडाला आणि ३ आंदोलनकर्त्यांनी पेट घेतला. सुदैवाने या आंदोलनात कुठलीही जीवीतहानी झालेली नाही, भाजलेल्या आंदोलनकर्त्यांवर नजीकच्या रूगणालयात उपचार सुरू आहे.
Read More
भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या भोपाळच्या विषारी वायू गळतीला ४० वर्ष लोटली. या वायु गळतीमुळे २५ हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोकांच्या जीवनावर या वायुगळतीमुळे विपरीत परिणाम होऊन, त्यांना शारिरीक अपंगत्वाला सामोरं जावे लागले. यानंतर आता ३७७ टन विषारी कचरा भोपाळ येथील युनियन कारबाईडच्या कारखान्यातून पिथमपूर येथे हलवला जणार आहे, जिथे टप्प्यांमध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.