९ मतदारसंघात शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) तुतारीची वाजली पिपाणी!
Read More
Tutari Pipani symbol confusion : 'तुतारी'सारखे दिसणारे 'पिपाणी' चिन्ह गोठवण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार
‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!’ म्हणत दारोदारी फिरणार्या शरद पवार गटाला ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने झटका दिला आहे. ‘तुतारी’ चिन्हासारखे दिसणारे ‘पिपाणी’ हे चिन्ह यादीतून हटवण्याची त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. आता हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार असल्यामुळे ‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हावर बंदी आणण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणूकीत आम्हाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला आहे, असे सांगत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीले होते. पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. परंतू, आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता विधानसभेतही तुतारी चिन्ह विरुद्ध पिपाणी हा संभ्रम कायम राहणार आहे.
शरद पवार गटाच्या 'तुतारी' चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवले असून शरद पवार गटाचं तुतारी चिन्ह कायम ठेवलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.