( Dombivli BJP West Mandal President Sameer Chitnis and Dombivli East Mandal President Mukund Pednekar ) केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. ‘शतप्रतिशत भाजप’ हे धोरण पूर्वीपासून राहिले आहे. आता कल्याण जिल्हा भाजपचे उद्दिष्ट ‘आगामी महापालिका निवडणुका’ राहणार आहे. रविवार, दि. 6 एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली स्थानिक पातळीवर पुढील वाटचाल कशी राहील, काय उद्दिष्ट आणि ध्येय राहील, याबाबत डोंबिवली भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस आणि डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मुकुंद प
Read More
दिशा सालियानवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मशिद हे मुस्लीमांचं धार्मिक स्थळ आहे. त्यांना विश्वासात घेऊनच कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्य उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. धारावी परिसरात सध्या मुंबई महापालिकेने धारावीतील एका मशिदीच्या अवैध भागावर कारवाई केल्याने तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
आम्हाला राजकारण करायचं नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. उरणमध्ये एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली.
कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उच्च न्यायलयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पेडणेकर यांच्या चौकशीची आणि अटक करण्याची आवश्यकता दिसत नसल्याचे सांगितले. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने याप्रकरणी निकाल दिला.
वसईतील किनार्यांच्या भटकंतीत विविध जीवांचे छायाचित्रण करता-करता अनेक प्रजातींची नव्याने नोंद करणारे, ‘सिटीझन सायन्स’चे पुरस्कर्ते, छंदिष्ट छायाचित्रकार दत्ता पेडणेकर यांचा प्रवास...
'दम लगा के हैशा' या २०१५ साली आलेल्या हिंदी चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने केली. पुढे विविधांगी भूमिका चित्रपट. वेब सीरीजमधून साकारत तिने तिचा चाहतावर्ग तयार केला. तिचा भक्षक हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर वर गाजत आहे. ज्यात तिने एका सक्षम पत्रकाराचे प्रतिनिधीत्व अतिशय उत्तम केले आहे. भक्षक या तिच्या वेब सीरीजमधील तिच्या भूमिकेचे कौतुक देशभरातच नाही तर अगदी जागतिक पातळीवरही केले जात आहे.
“संत एकनाथांनी अभंगरचनांसोबतच अनेक भारुडेसुद्धा लिहिली. कारण त्यांच्या सादरीकरणातून लोकांच्या मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा हेतूही साध्य होतो. आता विवेक फिल्म्सने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना संत एकनाथांचा हाच आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, ” असे उद्गार चित्रतपस्वी पद्मभूषण राजदत्त यांनी काढले. विवेक समूहातील ‘दुर्दम्य लोकमान्य’ व ‘कालजयी सावरकर’ या दोन लघुपटांच्या निर्मितीनंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी सुरू झालेल्या ‘विवेक फिल्म्स’ या नव्या आयामाच्या अंधेरी पश
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तब्बल सात तास चौकशी केली. कोरोनाकाळात शवपिशव्यांच्या खरेदीत घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
राज्यात सध्या ईडीचे धाडसत्र सुरु असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टोला लगावला आहे. पुढील आठवड्यात उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, उबाठाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत व विधिता संजय राऊत यांना ईडीकडे हिशोब द्यावाच लागेल, असे ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. या नेत्यांवर असलेल्या आरोपांबद्दल त्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. यामध्ये उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे.
उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने चौकशीकरिता हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. त्यांना गुरुवारी २५ जानेवारीला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आता अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अमंलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीस हजर राहण्यासाठी समन पाठवले आहे. त्यांना गुरुवारी २५ जानेवारीला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याने ईडी मागे लागली असे वक्तव्य उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने बुधवारी अटक केली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
२०२३ -२४ चा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५० हजार कोटींहून अधिक रुपयांचा होता. म्हणजेच गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची रक्कम कित्येक पट्टींनी जास्त मानली जाते. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ५० ते ७० टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच होतो. उर्वरीत खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो, असं ही सांगितले जातं. मा
101 वर्षाची परंपरा असणार्या गिरणगावातील मराठी कामगार कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख असणार्या परळ येथील दामोदर हॉल त्याचबरोबर येथील सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालय पुनर्बांधणीसाठी दि. 1 नोव्हेंरपासून बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ते जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. याविरोधात गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ रंगकर्मी तसेच सहकारी मनोरंजन मंडळाशी संबंधित कलावंतांनी दामोदर बचाव आंदोलन केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या आंदोलनाला बातमीतून प्रसिद्धी दिली. या बातमीची दखल मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.
आजचा दिवस कोविडकाळात निष्पाप बळी गेलेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाचा होता. कारण आज एकीकडे बॉडीबॅग खरेदी घोटाळ्यासंबधी किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी झाली. तर दुसरीकडे ऑक्सिजन घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध तक्रार दाखल झाली.त्यामुळे आज मुंबईकरांचा ऑक्सिजन घोटाळ्याने कसा जीव घेतला? बॉडीबॅग खरेदीत घोटाळा कसा झाला? त्यात आतापर्यत कोणाची नावे उघडकीस आले आहेत. ह्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
बदलत्या हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला अशा आजारांचा सामना सामान्यांपासून अगदी कलाकारांना देखील करावा लागत आहे. अनेक रोगांच्या साथी सध्या पसरल्या असून आता अभिनेत्री भुमी पेडणकर देखील एका आजारामुळे थेट रुग्णालयात एडमिट झाली आहे.भूमी पेडणेकर हिला डेंग्यूची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती भूमीने स्वतः चाहत्यांना देत डासांपासून सावध राहण्याचं आवाहन देखील केले आहे.
कालचा राडा हा ठरवूनच केला होता, असं वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हें. ला ११वा स्मृतिदिन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. मुख्यमंत्री तिथून बाहेर पडल्यानंतर तिथे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला असलेला रॅक तुटला.
ईडी चौकशीदरम्यान किशोरीताईंना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी होणार होती. मात्र, पेडणेकरांनी ४ आठवड्यांचा वेळ मागितला आहे. किशोरी पेडणेकर यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. १ हजार ३०० रुपये किंमतीची बॉडीबॅग ६८०० रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत
ऐन दिवाळी तोंडावर असतानाच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावला आहे. बुधवारी (८ नोव्हें) चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमंक काय घडतं? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आता एकीकडे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे खिचडी घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलायं.तसेच रवींद्र वायकरांवर ही ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या तिन्ही घटनांचा वेध घेत आज आपण साई रिसॉर्ट प्रकरण, खिचडी घोटाळा, पंचतारींकित हॉट
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने शीवतीर्थावर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. मुंबईचा डान्सबार करु नका. बुडाखाली अंधार दिसतोय. क्षमा कोणालाच करायची नाही. निवडणूक लागू द्या, मग त्यांना दाखवून देऊ. असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. शीवतीर्थावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ही दिसुन येत आहे.
आज पुन्हा एकदा कोविड काळातील मुंबई महापालिकेकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याची बातमी आली. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. आणि उबाठा गटाचे आदित्य ठाकरेंशी संबधित एका व्यक्तीवर कोविड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने धाड टाकली.आणि आता पुढचं नाव कोणाचं? कोण आहे कोविड घोटाळ्यातील पुढचा आरोपी? असे बरेच प्रश्न निर्माण झाले.
एक काळ असा होता. जेव्हा राजेमहाराजे आपल्या आवडत्या सरदाराला बक्षिस म्हणून सोन्या - चांदीचे अलंकार, आभुषणे देत असतं. त्यावेळी हे सोने- चांदीचे दागिणी मिळवण्यासाठी अनेक सरदार आपल्या मालकाला खुश करण्यासाठी काम करत. आता ही असेच एक प्रकरण घडलंय. पण इथे मालक घोटाळे बाज आणि सरदार भ्रष्टाचारी आहेत. हाच काय तो फरक. नुकतेच कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. ईडीने जाहिर केलेल्या आरोपपत्रानुसार हा घोटाळा घडवून आणण्यासाठी बेकायदेशीर कॉन्ट्रक्टचा म
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड बॉडी बॅग खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. त्यांची आज तिसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. किशोरी पेडणेकर तिसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर आहेत. यापूर्वी त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती.
महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. तर या संदर्भात किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आज (१३सप्टें) हजर होत्या. २ तास त्यांची चौकशी करण्यात आली.
महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या संदर्भात किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेसमोर आज उपस्थित होत्या.
मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने पेडणेकर यांच्या विरोधात ‘डेड बॉडी बॅग’ प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असुन मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांना समन्स पाठवले आहे. पेडणेकर यांना 11 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाकडुन अटकेपासुन तुर्तास दिलासा मिळाला आहे. यापूर्वी किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई हायकोर्टाने पेडणेकरांना तुर्तास दिलासा जरी दिला असला तरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दिलासा मिळालेला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची विनंती केली होती.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना २९ ऑग. अटकेपासुन दिलासा मिळाला आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. बॉडी बॅग किट खरेदीत गैरव्यवहार प्रकरणात २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईओडब्ल्यूला दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या तर्फे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल करण्यात आला होता.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीही अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीही किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.
कोवि़ड काळात झालेले घोटाळा आता उघड होत आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड काळातील उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केलेल्या खिचडी घोटाळ्याची तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी ही तक्रार पोलिस, ईडी, आयकर, बीएमसीकडे केल्याची माहिती आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगार आणि गरीब लोकांना खिचडीचे वाटप केले जात होते. त्यात ही घोटाळा झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या नंतर खिचडी घोटाळ्यात कोणावर गुन्हा दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
सत्तेतुन पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असून मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा ठाकरे गटाला मोठा झटका मानला जात आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातील एक महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने देण्यात आल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचा परिणाम येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्येही पाहण्यास मिळण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात येत आहे
अर्थात, साईंच्या लीलेमध्ये आपले स्वागत आहे. मुंबई ते शिर्डी साईनाथांची पायी वारी करणारे काही साईभक्त आपण समाजाला काही देणं लागतो म्हणून वैयक्तिक जीवनात समाजसेवा आणि दानधर्म करुन साईबाबांची शिकवण अंमलात आणायचा प्रयत्न करत असतात. परंतु, या साईभक्तांना आपल्या परीने काम करत असताना आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपली मदत पुरेशी नाही, अशी मनात एक खंत आणि जाणीव झाली होती, ही बाब त्यांच्या मनात घर करून होती. आपल्यासारखे समविचारी आणि आपले ध्येय, विचार पटणारी माणसे एकत्र आली आणि एकत्रितपणे आपण समाजकल्याणाचा विडा उचलला आ
उ. बा. ठा. गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका, महापालिका आणि सिनेटच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. "एकमेकांशी समन्वय साधून काम करा. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं आहे." अशी माहिती प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. यावेळी आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभेचे पराभूत उमदेवारही उपस्थित होते.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एसआरएने मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकरांसाठी हा पहिला मोठा दणका आहे.
डीएस ग्रुपचा भाग असलेल्या डीएस स्पाइसकोने कॅच सॉल्ट्स अॅण्ड स्पाइसेससाठी नवीन मोहिम लॉन्च केली आहे, ज्यामधून नवीन तत्त्व ‘क्यूंकी खाना सिर्फ खाना नही होता’ दिसून येते. डेण्टसू क्रिएटिव्हद्वारे संकल्पित ही मोहिम अन्नामध्ये आठवणी, बंध, परंपरा व मूल्ये अशा अनेक निर्मितींचा समावेश असतो या विचाराला सादर करते, ज्यामुळे ब्रॅण्ड ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाशी संलग्न असल्याची खात्री मिळते.
किशोरी पेडणेकर : 'मागील काही दिवसांत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत.त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची एकप्रकारे कबुली देणाऱ्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपच्या आरोपांवर कुठलेही तथ्यात्मक उत्तर न देता भावनिक हत्यार वापरून मुख्य मुद्द्याला बगल दिली जात आहे. भाजपवर टीका करणे, लोकांची सहानुभूती मिळवणे आणि लोकांना भडकविणे हेच ठाकरे गटाच्या हातात राहिले आहे. आपल्या सासूबाईंच्या मृत्यूबाबत पेडणेकरांनी दिलेली प्रतिक्रिया तर केवळ अशोभनीय
दापोलीतल्या 'त्या' भाषणाने Kishori Pednekar यांचा जळफळाट!
कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता लम्पी हा संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत आहे.
"शिवसेना हा पितृपक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या पितृपक्षात बाळासाहेब नक्की खाली येतील आणि आम्हीच जिंकू" असे अजब तर्कट शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लढवले आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले आहेत. यावेळी भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मुंबई महापालिकेसाठी आपले लक्ष्य १५० आहे असे सांगितले
शिवसेना आणि दसरा मेळावा या दोन गोष्टींचं नातं गेली अनेक वर्ष टिकून आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी येत असतात. मात्र शिवसेनेत सुरु असलेल्या खडाजंगीमुळे यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच "दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल.", असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शनिवारी (२७ ऑगस्ट) पत्रकारांशी ब