(Ratnagiri Accident News) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सोमवार दि. १९ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला असून येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन चारचाकी गाडी थेट १०० फूट खाली कोसळली. यामध्ये गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
Read More
(Jalgaon Accident News) गुजरातहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा जळगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एक महिला जागीच ठार तर, पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.