ताफ्यात ४ हजार ४८९ नव्या वाहनांची भर; मुंबईकरांची सुरक्षा आणखी भक्कम होणार मुंबई पोलीस दलाला सक्षम बनवत फडणवीस सरकारने शहराच्या सुरक्षेला नवी ताकद दिली आहे. गस्त अधिक प्रभावी, प्रतिसाद अधिक जलद आणि तपास अचूक व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात तब्बल ४ हजार ४८९ नव्या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. गृह विभागाचा हा निर्णय पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
Read More
Changes in law are necessary to empower cooperatives CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे 'दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि'. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत कमविलेल्या चल-अचल संपत्तीचे त्याच्या पश्चात योग्य पद्धतीने वाटप होण्याकरिता, संपत्ती नियोजन प्रत्येकाने त्याच्या हयातीतच म्हणजे, तो जीवंत असतानाच करावे. यासाठी नामांकन (नॉमिनेशन) ( Nomination Rules ) आणि इच्छापत्र (व्हिल) हे दोन प्रमुख पर्याय आहेत. भारतीयांमध्ये इच्छापत्राबाबत अजूनही पुरेशी जागरुकता असल्याचे दिसून येत नाही. इच्छापत्र करणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बर्याच जणांना याबाबत पुरेशी माहितीही नसते. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करणे सहज आणि सोपा पर्याय आहे. त्
आज अखेरच्या सत्रानंतर बेंचमार्क निर्देशांक सकाळच्या सत्राप्रमाणे तेजीत राहिला. शेवटच्या सत्राच्या अखेरीस आज निफ्टी २१९०० पार झाला असून सेन्सेक्स २२७.५५ अंशाने (०.३२%) वाढत ,७२०५०.३८ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ७०.८० अंशाने (०.३२) वाढत २१९१०.८० पातळीवर पोहोचला आहे. आज एम अँड एम, बीपीसीएल,ओएनजीसी,एनटीपीसी हे शेअर्स तेजीत पहायला मिळाले असून नेसले इंडिया, आयटीसी, एक्सिस बँक या शेअर्सच्या भावात घट झाली आहे.
भारतीय शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी वांद्रे-कुर्ला येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयात दि. २९ जानेवारी २०२४ सोमवारी ब्रोकर्स इंडस्ट्री स्टँडर्ड्स फोरम (आयएसएफ) च्या सहभागींशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आयएसएफच्या कामाचे कौतुक केले.
ठाण्यातील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुक बदल लागू करण्यात आले असून यानुसार या रस्त्यावरील पर्यायी मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहेत, असे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करताना आयुक्तांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का?