फक्त व्यावसायिक दृष्टीचाच विचार न करता, भागधारकांच्या अडीअडचणींना धावून जाणारी पतपेढी असा चिपळूण तालुका कुणबी सहकारी पतपेढीचा लौकिक आहे. या पतपेढीचे अध्यक्ष काशिराम पवार यांची मुलाखत.
Read More
Kashi Vishwanath वाराणसीमधील काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिराच्या २ किमी अंतरावरील मांस आणि मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसराच्या २ किमीच्या सानिध्यातील परिसरामध्ये एकूण ५५ दुकाने असून संबंधित दुकांनांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यातील १० दुकानांवरील नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणात ३ एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत.
ठाणे : कारगिल युद्धाला ( Kargil War ) यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या युद्धात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून ‘कारगिल-द टेल्स ऑफ वेल्लर’ या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. ’शारदा एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आनंद विश्व गुरुकूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
नाशिक : ( Harshutai Thakur ) “माझा एक हात काम करत नाही. परंतु, त्याची तमा न बाळगता मी मैदानात उतरले आहे. घरात बसले नाही. देवी-देवतांची खिल्ली उडवणे, टीका करणे आता कुठेतरी थांबले पाहिजे. माझा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. परंतु, धर्म-संस्कृती काय असते हे शिकवणे माझ काम आहे. जिहाद्यांना प्रत्युत्तर देणे माझे काम आहे. जो माझ्या देवी-देवतांच्या विरोधात बोलणार, त्याला आम्ही सोडणार नाही,” असा इशारा हिंदू रणरागिणी हर्षुताई ठाकुर यांनी दिला.
नालासोपारा (प.) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश काशिनाथ वझे यांना आज वयाची ७५ वर्षें पूर्ण होत आहेत. बालस्वयंसेवक असलेल्या रमेश वझे यांनी नालासोपारा, वसई या भागांत संघविचार पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे कार्य अविरतपणे केले. १९६४ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सन १९६९, १९७० आणि १९७१ या तीन वर्षांत संघाचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. रमेश वझेंनी स्वयंसेवकापासून मुख्यशिक्षक, मंडल कार्यकर्ता, तालुका कार्यकर्तापासून ते जिल्हा कार्यकर्त्यांपर्
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:०० वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे राज्यस्तरीय शिक्षक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शिक्षक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विशाल कडणे आहेत.
शरद पवार गटाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात आणि उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोमवारी हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
होळकर घराणे मुळातच हे शिवभक्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी यांनी श्री सोमनाथ, श्री ओंकारेश्वर, श्री नागनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर आदी शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी यांनी आपले राज्य हे शिवार्पण करून, राज्यकारभार केला. म्हणून, त्यांच्या हातात आपल्याला शिवपिंड दिसते. त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरून’ अशी राजमुद्रा असे. भगवान शिवशंकराच्या नावानेच त्यांनी लोककल्याणकारी राज्य चालवले. तसेच संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी मंदिरे, वास्तू, जलकुंडे आणि बारवांची न
ज्याप्रमाणे सुपीक शेतजमिनीतून धान्याचे मोती पिकवण्यासाठी मशागत आवश्यक असते, त्याचप्रमाणे बालपणीचे संस्कार आणि शिक्षण उत्तर आयुष्याची पायाभरणी करते. चौंडीमध्ये माणकोजी पाटील शिंदे आणि सुशीलाबाईंच्या पोटी जन्मललेल्या अहिल्येचीही जडणघडण अशीच विलक्षण होती. म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षापर्यंत आई-वडिलांकडून अहिल्याबाईंना भविष्यातील जीवनाची दिशा मिळाली. अशा या ‘अहिल्या’ ते ‘अहिल्यादेवी’ जीवनप्रवास उलगडणारी ही कथा...
व्यक्तिगत दु:खाला बाजूला सारून राष्ट्रहिताला प्राधान्य देत, अहिल्याबाईंना होळकर राज्याची धुरा हाती घेतली. पण, नुसतीच ती जबाबदारी न घेता, त्या जबाबदारीचे आयुष्यभर समर्थपणे निर्वहनदेखील केले. या कार्यात भारतात परकीय आक्रांतांच्या धार्मिक उन्मादाने धास्तावलेल्या संस्कृतीला आपल्या क्षात्रतेजाने पुन्हा तेजोवलय प्राप्त करून दिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभरात केलेल्या व्यापक कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
अहिल्याबाई होळकर म्हणजे इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व. भारताच्या मध्यकालीन इतिहासात थोरले राजे छत्रपती शिवराय आणि नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर ही दोन राज्यकर्ती व्यक्तिमत्त्वे अतिशय वेगळी होती, महत्त्वपूर्ण होती. त्या काळात राजेशाही असली, तरी लोकशाहीतल्या भारतीय राज्यघटनेतील लोककल्याणकारी राज्याची (welfare state) संकल्पना, दोघांनीही आपल्या शासनातून आणि प्रशासनातून प्रत्यक्षात उतरविली होती. आधुनिक काळातल्या लोकतंत्राची त्यांना जाणीव होती आणि राज्यव्यवहारातील अनेक पातळ्यांवर तर्कशुद्ध आणि लोकाभिमुख कार
"ज्ञानवापी ही केस आमच्यासाठी भक्तीचा एक मार्ग आहे. विरोधक त्यांची वास्तू सोडणार नाही, आपल्याला ते हिसकावूनही घ्यायचे नाही. अक्रांतांनी ज्या ज्या मंदिरांवर आक्रमणे केली ते प्रत्येक मंदिर आम्ही न्यायालयीन लढ्यातून सोडवणारच!", असा ठाम विश्वास हिंदू मंदिरांसाठी कायदेशीर संघर्ष करणारे वरिष्ठ अधिवक्ता अॅड. विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केला.
ज्ञानवापी संरचनेच्या व्यास तळघरात पूजा सुरू राहणार, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुनावणीत मुस्लिम पक्षाला मोठा झटका देत व्यास तळघरात पूजा करण्यावर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सुरू असलेले भोजशाळेतील सर्व्हेक्षण थांबविण्यासही नकार दिला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तोतया महंताकडून काशी विश्वनाथाची पूजा केली आहे, असे स्पष्टीकरण काशी विश्वनाथ न्यासाकडून करण्यात आले आहे.काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहे. यादरम्यान, त्यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथाची पूजा केल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिरातील महंत राजेंद्र तिवारी यांनी राहुल गांधी यांना काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात नेऊन तेथे पूजा केल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेस आणि राहुल गाधींचा ह
अयोध्येप्रमाणे लवकरच मथुरेतही श्रीकृष्ण विराजमान होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुणे येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या होत आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे. आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे.
सर्व पुरावे आणि वस्तुस्थिती हिंदूंच्या बाजूने स्पष्टपणे दिसत असतानाही, काशी विश्वेश्वर मंदिराला मुस्लिमांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. हा हिंदूंच्या सार्वजनिक जीवनातील शुचितेच्या संकल्पनांचा सर्वोच्च आविष्कारच! अयोध्येप्रमाणेच आता काशी विश्वेवराला मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजाकडून मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या तत्त्वांचाच आदर्श बाणविला जात आहे, हे नक्की.
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी ३१ जानेवारीला एतिहासिक निर्णय देत ज्ञानवापी परिसरातील व्यासजी का तेहखाना ( तळघर ) या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवसांत तळघरात पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे तळघर ज्ञानवापी परीसरात असलेल्या मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता तेथे नियमित पुजा विधी होणार आहेत
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी मंचावरून लोकांना संबोधित केले आणि सांगितले की, काळाचे चक्र बदलत आहे, ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. यानंतर ते कुबेर टिळा येथे पोहोचले, तेथे त्यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या शुभ कार्यात गुंतलेल्या मजुरांची भेट घेतली. पीएम मोदींनी मजुरांवर पुष्पवृष्टी केली. वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन असो किंवा दिल्लीतील 'भारत मंडपम'चे उद्घाटन असो, या प्रसंगी ते नेहमीच मजुरांचा सन्मान करताना दिसतात.
वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करताना या परिसरात बांधलेल्या तळघराच्या चाव्या वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिम पक्षकारांनी तळघराच्या चाव्या देण्यास नकार दिल्या होत्या. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दि. १८ जानेवारी २०२४ रोजी हा निर्णय दिला.
"रामलला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे! अशी घोषणा आम्ही दिली होती. आज त्याच जागी राम मंदिर बांधण्यात येत आहे. अयोध्येसाठी जशी कायदेशीर लढाई लढली, तशीच मथुरा-काशीसाठीही लढली जाईल." असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज तक या हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपासून कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे काशी येथे विशेष यज्ञास प्रारंभ करणार आहेत. हा यज्ञ प्राणप्रतिष्ठेपासून पुढील ४० दिवस होणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या दिवशी रामजन्मभूमी स्थीत राममंदीरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने आज तक या वृत्तवाहीनीशी बोलताना योगगुरू बाबा रामदेव यांनी अयोध्येत न्यायालयाचा निर्णय आला आहे, परंतु आता मुस्लिमांनी काशी विश्वनाथ आणि मथुरा जन्मभूमीचा वाद स्वेच्छेने संपवण्याचा विचार केला पाहिजे. अस म्हटल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे उद्घाटन झाले. यावेळी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर उपस्थित होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘ओम नमः पार्वती पतये’ आणि ‘हर-हर महादेव!’ ने केली. भारतातील शिवशक्ती बिंदूवर चंद्राच्या आगमनाला एक महिना पूर्ण होत असताना आपण अशा दिवशी काशीला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर तर दुसरे शिवशक्तीचे स्थान काशी येथे असल्याचे त्यांनी सांगितले.
तामिळनाडूच्या मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर सनातन धर्मावर अनेक विधाने समोर येत आहेत. दरम्यान, आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही सनातन धर्मावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सनातन धर्माचा अपमान केला जातोय, त्या सर्वांना २०२४ ला मोक्ष मिळेल”, असे विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. यासोबतच बाबा रामदेव म्हणाले की, काशी हे स्वतःच दिव्य आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीला भव्यता दिली आहे.
काशी आणि अयोध्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकार मथुरेला नवसंजीवनी देण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची मथुरामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून भव्य कॉरिडॉर बांधण्याची योजना आहे. ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या बैठकीत आता मथुरेतही भव्य कॉरिडॉर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री योगी यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पात काही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून, सुधारणा झाल्यानंतर ही संपूर्
औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वनाथाच्या दर्शनास गेल्या आणि परत आल्याच नाहीत, असा पुरोगामी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील इतिहास लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शनिवारी मांडला. मात्र, नेमाडेंच्या या इतिहासाचे खरे इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी खंडन केले आहे.
काशी येथील ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. औरंग्याने मंदिर पाडून त्याजागी प्रार्थनास्थळ उभे केले, याची कागदपत्रे उपलब्ध असतानाही, न्यायालयीन लढ्याची काय गरज आहे, असा प्रश्न उपस्थित करणार्यांनी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराबाबत काय झाले, याचा एकदा अभ्यास करणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, यात त्रिशूलसह हिंदू धर्माची इतर चिन्हे आहेत. त्यामुळे या संकुलाला मशीद म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “ज्ञानवापीमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मुर्ती आहेत. ज्ञानवापीला मशीद म्हटले तर वाद होईल.
दि. ४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. रुपेरी पडद्यावर आई, वहिनी, पत्नी अशा विविधांगी भूमिका अगदी लीलया साकारलेल्या सुलोचना दीदी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तितक्याच प्रेमळ; पण शिस्तप्रिय स्वभावाच्या होत्या. तेव्हा, पडद्यामागच्या आपल्या आईच्या भावस्पर्शी आठवणी, स्वभाववैशिष्ट्ये यांना सुलोचना दीदींच्या कन्या कांचन घाणेकर यांनी दिलेला हा उजाळा...
प्लेसमेंटची तयारी आणि वाढत्या एड-टेक (Ed-tech) या ब्रँडसाठी भारतातील प्रसिद्ध वेबसाइट प्रेपइंस्टा (PrepInsta)ने केदार काशीकर यांची प्रादेशिक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. श्री काशीकर यांसारख्या अनुभवी व्यावसायिकांच्या नियुक्तीसह, प्रेपइंस्टा (PrepInsta) ने उत्कृष्टता आणि धोरणात्मक वाढीसाठी आपली कटिबद्धता असल्याचे सांगितले.
वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे (एएसआय) करण्यात येत असलेल्या ज्ञानवापी मशीद परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बुधवारपर्यंत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अबुधाबीमध्ये सरकारने एक नियम आणला आहे. या नियमानुसार लोक रस्त्याच्या कडेला नमाज अदा करू शकणार नाहीत. पोलिसांनी आता रस्त्याच्या कडेला नमाज अदा करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर कुठेही वाहन थांबवून नमाज अदा केल्यास एक हजार दिरहमचा म्हणजेच २२ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो, असे अबू धाबी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आता मुरादाबादमधील सुफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हा नियम भारतात लागू केला असता तर काही धर्मांधांनी हा
ठाणे : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या आता लगेच सोडविल्या जाणार आहेत. ते आता तणावात राहता कामा नयेत. त्यांच्यावर दर्जात्मक शिक्षण अवलंबून आहे. शिक्षक संघटनांनी देखील त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकून न राहता शिक्षणावर त्यांनी लक्ष्य केंद्रित करावे. असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
वाराणसी न्यायालयात प्रलंबित असलेल्या ज्ञानवापी - काशी विश्वनाथ वादाशी संबंधित सर्व खटल्यांवर एकत्र सुनाणवीसाठी हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २१ एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे.
पुस्तकं वाचन प्रत्येकालाच आवडत. पंरतू आज तरूणांचा वाचनाकडे कल फार कमी होताना दिसतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान द्वारे आयोजित मेडिकल कॉलेजच्या वाड्मय मंडळाच्या उद्घाटनात वाचन प्रवासावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सांगायचे की "वाचाल तर वाचाल आणि जो वाचणार नाही तो वाचणारंच नाही." त्यामुळे वाचन करणे हे फार गरजेचे आहे.
चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
खलिस्तानवाद्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कायदा-व्यवस्था राखण्याची जबादारी पार पाडण्यात भगवंत मान सरकारला अपयश येत असल्यास खलिस्तानवाद्यांचा बीमोड करण्यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.
प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी तयार करण्यासाठी तो झटतोय. जाणून घेऊया तुषार ज्ञानेश्वर अष्टेकर या धर्मवेड्याविषयी...
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या जत्रेची शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. सोमवार, दि. २० फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या या यात्रेची समुद्रस्नानानंतर सांगता होणार आहे. अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळते. यानिमित्त देवस्वाऱ्यांचे अलौकिक दृश्य पहाण्यासाठी दूरदूरहून भाविक येते.
पृथ्वी शॉ सोबत भांडण झालेली अभिनेत्री सपना गिल ही एक भोजपूरी अभिनेत्री आहे. सपना गिल हिचे वय २६ वर्ष आहे. सपना गिल ही चंडीगढची रहिवासी आहे. सपनाला लहानपणापासून मॉडलिग आणि अभिनय क्षेत्रात काम करायचे होते. सपना गिल हिच्या अभिनय करियरची सुरूवात भोजपूरीतील सुप्रसिद्ध अभिनेते निरहुआ आणि रवि किशन यांच्यासोबत केली. तिने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या सिनेसातून अभिनय करियरला सुरूवात केली. त्यानंतर तिने अभिनेता पवन सिंहसोबत ' मेरा वतन' या चित्रपटात ही काम केले आहे. सपना गिल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. इं
ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची पूजा आणि उपासनेच्या हक्काचा दावा हा सुनावणीयोग्यच आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयात बुधवारी ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. नागपुरातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख असलेल्या मंगेश काशीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे
ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत सेवाभावी संस्थांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज सायंकाळी ६ वाजता होणार्या या सत्कार सोहळ्यानिमित्त ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परीघ उलगडणारा हा लेख...
न्यायालयाच्या सुट्टीनंतर काशिविश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली.
ज्ञानवापी-काशिविश्वनाथ परिसर परकीय मुस्लीम आक्रमकांनी वेळोवेळी उद्ध्वस्त केला. मात्र, लढवय्या हिंदू समाजाने वेळोवेळी काशिविश्वनाथाचे मंदिर पुन्हा उभारले. राजा तोडरमल ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा देदीप्यमान वारसा हिंदू समाजास लाभला आहे. त्यामुळे आता ज्ञानवापी-काशिविश्वनाथासाठी हिंदू समाज दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा निर्णायक लढा देण्यास सज्ज झाला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर आणि दरवाजाच्या चौकटीच्या खालच्या भागाला सोन्याचा मुलामा चढवल्याने मंदिराला पूर्ण सुवर्णमयी रूप आले आहे.
काशी विश्वनाथ – ज्ञानवापी प्रकरणाचा खटला दाखल करून घ्यायचा की नाही, याविषयी वाराणसी जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. याविषयी अद्याप मुस्लिम पक्षाचाच युक्तिवाद सुरू आहे