पंचतंत्रकार सांगतात की, नीट शक्ती संतुलन केले, तर प्रचंड हत्तीलादेखील मारता येते. ‘पंचतंत्र’ हे राजनितीशास्त्रावरील अतिशय उत्तम पुस्तक आहे. ज्यांना हे समजले नाही, त्यांनी या पुस्तकाला लहान मुलांच्या गोष्टीचे पुस्तक करून ठेवलेले आहे. उपेक्षेने पुस्तके मारता येतात किंवा जाळून संपवून टाकता येतात. पण,लहान मुलांचे पुस्तक करूनही एखादे पुस्तक कसे संपविता येते, याचे ‘पंचतंत्र’ हे एक उदाहरण आहे.
Read More
आपण सर्वांनीच लहानपणी पंचतंत्राच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तेव्हा मजेशीर वाटणार्या गोष्टींबद्दल आज इंटरनेटवर शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर ‘मानवी जीवनाच्या पाच सूत्रांवर उपदेश’ हा त्या गोष्टींमधून अभिप्रेत होता. मला वाटत नाही आपल्यापैकी अनेकांनी प्रौढावस्थेत त्या गोष्टी, तो उपदेश घेण्यासाठी पुन्हा वाचायला घेतल्या असतील. त्याचं कारण सोपं आहे. प्रौढावस्थेत उपदेश घेण्यापेक्षा उपदेश करण्यात आपल्याला जास्त रस असतो. हा लेखप्रपंच उपदेश करण्याच्या हेतूने अजिबात केलेला नाही. उलटपक्षी आज ज्या रोगाने जगभरात आणि आपल्या