(Amit Shah On Operation Mahadev) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून लष्कराने ठार केले केले आहे. या तीन दहशतवाद्यांची नावे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जाहीर केली आहेत. सुलेमान, अफगान आणि जिब्रान असे या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तीनही दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते, असेही अमित शाह यांनी सांगितले.
Read More
(Amit Shah reveals Inside Story of Operation Mahadev) "पहलगामचा हल्ला अत्यंत भीषण होता, त्यावर चर्चा होत आहे आणि ती झालीही पाहिजे. परंतु ऑपरेशन सिंदूरच्या आधी मी ऑपरेशन महादेवसंदर्भात महत्त्वाची माहिती देतो.", असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ऑपरेशन महादेवबद्दल संसदेत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामच्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन महादेव कधी सुरु झालं? दहशतवाद्यांची ओळख कशी पटवली? याची सगळी माहिती अमित शाह यांनी संसदेत सांगितली.
(Amit Shah to Akhilesh Yadav) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाषण करतेवेळी सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. तसेच त्यात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांचा नावांसह उल्लेख करत ते पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि गृहमंत्र्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
(Amit Shah Hits Out At P Chidambaram) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत "पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचा काय पुरावा आहे?" असा वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सुरु असलेल्या चर्चेदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
(P Chidambaram clarifies his statement on pahalgam terror attack) संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत होणाऱ्या चर्चेपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त टिप्पणीमुळे चिदंबरम टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यानंतर त्यांनी आता त्यांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे.
(SCO) चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी २५ जूनला भारताच्या वतीने या बैठकीत सहभाग घेतला होता.
(Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून, कोलकात्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
(Germany backs India in war against terrorism) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून संयुक्त पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला जर्मनीने पाठिंबा दर्शवला आहे.
(PM Narendra Modi On Operation Sindoor at Bikaner) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भाषणापूर्वी त्यांना बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल देखील महत्त्वाचे विधान केले आहे.
(PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
(PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे.
(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाील रहिवाशी ज्योती मल्होत्राचे पहलगाम कनेक्शन पुढे आले आहे. हल्ल्यापूर्वी ज्योती पहलगाममध्ये गेली असून तिचा तिथला एक व्हिडीओ सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी ज्योतीचे काही कनेक्शन आहे का? याबाबतचा तपास करण्यात येत आहे.
(PM Narendra Modi at Adampur Air Base) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त करुन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन थेट हवाई दलाच्या जवानांसोबत संवाद साधला.
(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे.
(Lahore Blast) भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर लाहोरमध्ये सलग तीन स्फोट झाले असून पाकिस्तानी माध्यमांनी ड्रोन हल्ले झाल्याचा दावा केला आहे.
(Rajnath Singh on Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या लष्करी कारवाईनंतर गुरुवार दि. ८ मे रोजी सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहिमेची माहिती देताना ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती दिली.
( Operation Sindoor ) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ
(Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त केले आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराकडून ५ महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.
(Mock Drill in Maharashtra) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) तणाव दिवसागणिक वाढत आहे. युद्धाचे ढग गडद झाले आहेत. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वतःचा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
(India - Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा तणाव दिवसागणीक वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी कराराला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी पुन्हा 'जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल', अशी पोकळ धमकी दिली आहे.
(Ban On Pakistani Ships) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपारीचे आदेश देणे, याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि एक्स हँडल्सवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली. अशात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आय
(India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.
(Bilawal Bhutto statement on Pakistan Terror Backing) पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरांमधून करण्यात आलेला आहे. मात्र पाकिस्तानने कायमच या आरोपांचे खंडण करत कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूज या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाला पोसण्याचे काम करत असल्याची कबुली दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भु
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
(Lawrence Bishnoi Gang Threatens Pakistan) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली. या गँगच्या धमकीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली आहे. गुरवार, दि. १ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
(National Security Advisory Board Revamped) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समिती (NSAB) मध्ये मोठे बदल केले आहेत. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात रॉचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
आता बालाकोट नाही तर पाकिस्तानवर अशी कारवाई करा की, असे हल्ले पुन्हा कधीही होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी सर्वच स्तरातून होतेय. या पार्श्वभूमीवर तपासाच्या दिशेने देशातील सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. हल्ल्यानंतर बैसरनमधील स्थानिकांचे, पर्यटकांचे जबाब नोंदवले जातायत. तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणी असणाऱ्या मोबाईल्स कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या व्
(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स
(Neeraj Chopra)भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आगामी काळात भारतात आयोजित केलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावरुन नीरजवर जोरदार टीका होत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यानंतर नीरजवर समाजमाध्यमांमधून टीकेची राळ उठली होती. या प्रकरणावर आता नीरजने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत समाजमाध्यमावर
(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा
(PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीक
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून पुढील तीन दिवसात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी स
(Pahalgam Terror Attack Updates) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २६ वर्षीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला आहे.
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...