केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या पालघर येथील वाढवण बंदरासाठी ५ हजार, ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
Read More
मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा जेएनपीएने केली आली. जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार दि.२५ रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी जनेप प्राधिकरणाला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्वतः मंजुरी मिळाली आहे.
भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने वर्ष २०२४ मध्ये कामगिरीचे नावे शिखर गाठले आहे. कंटेनर थ्रूपुटमध्ये विक्रमी ७.०५ दशलक्ष टीईयूएसचे ध्येय साध्य केले आहे. “जनेप प्राधिकरणाने २०२४मध्ये ७.०५ दशलक्ष टीईयूएस कंटेनर थ्रूपुट साध्य केले आहे. आम्ही १०पेक्षा जास्त दशलक्ष टीईयूएस हाताळण्याची क्षमता साध्य करून या महिन्यात भारताचे सर्वात मोठे बंदर बनण्यासाठी सज्ज आहोत," असा विश्वास हितधारकांच्या बैठकीत उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख बंदरांच्या सचिवांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात देशातील प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन जेनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे सहसचिव संदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत झाले.