ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
Read More
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आजकाल सर्वच स्तरांतून सकारात्मक पुढाकार घेतलेला दिसतो. प्लास्टिकबंदी किंवा कचऱ्याचे योग्य निर्मूलन, शिवाय नदी स्वच्छता आणि विशेष म्हणजे, इलेट्रिक वाहन हे सर्व प्रयास स्तुत्य मानले पाहिजेत. पुण्यात देखील यादृष्टीने एकत्रित प्रयत्न उत्तम सुरू आहेत. आता बघा ना, नकळत आपण अगदी छोट्या गोष्टीतून प्रदूषण घडवित असतो, मात्र त्यावर मात करता येते, हे येथील नोबेल हॉस्पिटलने दाखवून दिले.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. वर्सोवा आणि मढ बेटाला जोडण्यासाठी समुद्रावर एक केबल पूल बांधला जाईल. प्रस्तावित मढ-वर्सोवा पूल सुमारे १.५ किमी लांबीचा असेल आणि वर्सोवा ते मढ हा प्रवास फक्त ५ ते ७ मिनिटांत पूर्ण करता येईल. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल. तसेच, प्रवाशांचा वेळ वाचेल.
“येणाऱ्या गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा उत्सवांमध्ये ६ फूटांपर्यंत उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे,” असे स्पष्ट निर्देश गुरूवार दि.२४ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे आणि पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन देणे.
गेटवे ऑफ इंडियाजवळील २२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला काही अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने परावानगी दिली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मंगळवार, दि.१५ जुलै रोजी ही मंजूरी दिली. ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने ही याचिका दाखल केली होती. जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाचा आराखडा, जागेची निवड, मंजूरी प्रक्रीया, आणि हरकती न मागवल्याचा मुद्दा या याचिकेत उपस्थित केला होता
नव्या पिढीने आपल्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा विचार करत जीवन जगण्याची दिशा ठरवायला हवी. सात्विक आहार स्वीकारणं, कृत्रिम जीवनशैलीपासून दूर राहणं, देशी पर्यटनातून भारताची संस्कृती समजून घेणं आणि वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचं रक्षण करणं हे जीवन समृद्ध करणारे मूलमंत्र आहेत, असे मार्गदर्शन अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव व संसाधन) सुचिता भिकाने यांनी केले.
‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत, सायकलवरून १६ हजार किमी प्रवास करणार्या महेंद्र पोपट निकम यांच्याविषयी..
इस्रायल-गाझा संघर्ष दीर्घकाळ चालू असून, आता त्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच दि. 9 जून रोजी गाझाला कथित मानवतावादी मदत घेऊन निघालेल्या ‘फ्रीडम फ्लोटिला कोएलिशन’ अर्थात ‘एफएफसी’ गटाच्या नौकेवर इस्रायली नौदलाने कारवाई केली. त्या नौकेवर स्वीडिश तथाकथित पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग आणि तिचे 11 सहकारी उपस्थित असल्याने याची दिवसभर अनेक माध्यमांवर चर्चा सुरू होती. याबाबतची माहिती जहाजावर असलेल्या युरोपियन संसदेच्या सदस्या रिमा हसन यांनी दिली.
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑईल खरेदी करून त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न ‘ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क’(ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात होत आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या प्रकल्पाविषयी...
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
ठाणे : सिमेंट, कॉक्रीटच्या जंगलात विकासाचे इमले उभे राहत असले तरी पायाभूत सुविधासाठी निसर्गातील शाश्वत पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने सौर उर्जा ( Solar Energy ) आणि पर्जन्य जल यासारख्या पर्यावरणपुरक बाबींकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ठाण्यात पार पडलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामधील प्रदर्शनात पर्यावरणपुरक सुविधा पुरवणाऱ्या स्टॉलवर हजारो नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसुन आले.
ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.
जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते! थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते? या गीतातील बोल सर्वार्थाने ‘जीवनप्रवास’ ही भावना शब्दबद्ध करतात. आपल्या जीवनप्रवासाची वाटही अशीच नागमोडी आणि वेडीवाकडी. कधी या वाटेवर सुखाचा वर्षाव होतो, तर कधी दु:खांच्या संकटांनी ही वाट आसवांनीच गच्च भिजून जाते. एकूणच आपल्या जीवनावर सामाजिक, पर्यावरणीय अशा कित्येक घटकांचे परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाणवत असतात. मग अशावेळी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा, यासंबंधीच्या ‘मनोवाटा’ धुंडाळणारा हा लेख...
जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबईची हॅट्ट्रीक
गेले वर्ष हे मानवी इतिहासातील सर्वात तप्त वर्ष ठरले. पृथ्वीवरील वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे जगभर तापमानवाढीची समस्या जाणवत आहे. पण, पर्यावरणातील या बदलांमध्ये मानवी जीवनशैलीचा सर्वात मोठा हात आहे, ही गोष्ट चिंताजनक. जगातील विकसित देशांनी गरीब देशांच्या साधनसंपत्तीची लूट करून, आपले समाज विकसित केले. ते करताना पर्यावरणाचा समतोल बिघडविला. त्याचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यशस्वी उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवक ते पर्यावरणसंरक्षक ते सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे कराडचे अरविंद कलबुर्गी यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
ग्रेटा थनबर्ग नक्की कोण? पर्यावरणवादी की, हिंसक फुटीरतावादी मनोवृत्तीचे प्यादी? नुकतेच जलवायू परिवर्तन, प्रदूषण यांबद्दल नेदरलॅण्ड येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी स्वीडनची २० वर्षीय ग्रेटा तिथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होती. रॅली होती-पर्यावरणाबद्दल. मात्र, ग्रेटा हिने मंचावर एक पॅलेस्टाईन आणि एक अफगाणिस्तानच्या अशा दोन महिलांना बोलावले.
गेल्या १३ वर्षांपासून गडकिल्ले संवर्धनासोबतच पर्यावरण संरक्षण-संवर्धन, अभिनय यांसारख्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणार्या शैलेंद्र कंधारे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारा हा लेख...
वनस्पतीशास्त्रात पदवी, पदव्युत्तर, एमफील आणि डॉक्टरेट असे सर्वोच्च शिक्षण प्राप्त करून गेल्या तीन दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणार्या प्राध्यापिका संध्या पवळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धानासाठी वाहून घेतले आहे. वसुंधरेची लेक असलेल्या संध्या पावले युगातील या नवदुर्गाच आहेत...
पेशाने शास्त्रज्ञ, जैवविविधतेचा एक उत्तम निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि एवढं कमी म्हणून की काय साहित्याचीदेखील आवड असलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक डॉ. मंदार दातार यांच्याविषयी...
बदलती व्यावसायिक स्थिती, विभिन्न प्रकारची आव्हाने यावर मात करून स्थायी व दूरगामी स्वरुपात यशस्वी होण्यासाठी ’ईएसजी’ हा एक सार्थ व समर्थ पर्याय ठरू शकतो. यावर अधिकांश प्रतिसाद देणार्यांचे एकमत झाले आहे. कुठलाही नवा व्यवस्थापन पर्याय हा खर्चिक असतोच. मात्र, या वाढीव खर्चावर प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती, गुणात्मक दर्जावृद्धी व व्यावसायिक कार्यक्षमता यांद्वारे मात केली जाऊ शकते.
देशभरात दरवर्षी गणेशोत्सवाची आवर्जून वाट पाहिली जाते. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा उत्सव असतो. या काळात हजारो कोटींची उलाढाल होत असते. गणेश मूर्ती तयार करणार्या कसबी हातांना यामुळे काम मिळते. परंतु, मागील काही वर्षांत मातीच्या गणेशमूर्तींपेक्षाही ’प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढले होते. यंदा महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता सकारात्मक पाऊल टाकले आहे.
पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच सरकारी पातळीवर काम सुरू दिसते. यासाठी अनेक स्तरांवर कार्यरत संस्था असल्या तरी त्यांचे हे कार्य लोकसंख्या आणि समस्येच्या अनुषंगाने विचार केल्यास कसे तुटपुंजे पडते, याचा प्रत्यय सध्या काही घटनांतून येताना दिसतो. ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ अर्थात हरितगृह वायूंमुळे वातावरणीय बदलावर होणारा परिणाम सर्वश्रुत आहेच. याच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन आणि त्याने गाठलेली दशकभरातील सर्वोच्च पातळी हे वृत्त अलीकडेच झळकले. सध्या
विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, उत्तम शिक्षिका ते आंतरराष्ट्रीय संस्थेत पर्यावरणासाठी कुशल नेतृत्व करणार्या, पर्यावरण संवर्धनाचे कृतिशील धडे देणार्या नीता गांगुली यांचा हा प्रवास...
पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर एकमत होत नसतानाच, भारतात मात्र उत्तर प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांनी संपूर्ण जगाला मागे टाकत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कचर्याची कमीत कमी निर्मिती आणि पुनर्वापर यासाठी एकत्रितपणे परस्पर सामंजस्याने उपक्रम राबविण्याचे या दोन राज्यांनी निश्चित केले आहे. त्यासाठी ‘कोका-कोला’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने पुढाकार घेत ‘रिप्लानेट्स’ या आशयाचे चर्चासत्र नुकतेच आयोजित केले होते.
नुकत्याच सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’अंतर्गत १९ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. तसेच भारतीय रेल्वेनेही लवकरच ३५ मार्गांवर हायड्रोजन रेल्वे धावणार असल्याचे जाहीर केले. त्यानिमित्ताने ‘ग्रीन हायड्रोजन’ या पर्यायी इंधनस्रोताविषयी संशोधक हर्षल अगरवाल यांच्याशी बातचित करुन या ऊर्जास्रोताची उपयोगिता आणि त्यासंदर्भातील आव्हाने याविषयीची ही सविस्तर मुलाखत...
पर्यावरण संरक्षणाची कल्पना ही प्राचीन काळापासून भारतीय सांस्कृतिक तसेच आचार-विचारांमध्ये रुजलेली आढळते. पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी सध्याच्या कायदेशीर तरतुदी समजून घेण्यासाठी, पर्यावरण संरक्षणाच्या संबंधी भारतीय इतिहासात डोकावणे महत्त्वाचे आहे. तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताच्या पर्यावरणसंबंधी कायद्यांची उत्क्रांती याविषयावर प्रकाश टाकणारा हा लेख...
जगातील सर्वात मोठी आणि प्राचीन वनसंपदा असलेला देश म्हणजे कांगो. मात्र, तिथल्या सरकार आणि देशाने केलेल्या एका विधानावर आता पाश्चिमात्य देश आणि देशांतर्गत पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.
पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली मुंबईत होणार्या अनेक प्रकल्पांना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून जोरकसपणे विरोध केला जातो, हे उघड आहे.
पंढरीची वारी आता केवळ ‘लोकल’ नसून ‘ग्लोबल’ झाली आहे.
गोरेगावच्या आरे कॉलनी येथील ‘मेट्रो ३’च्या कारशेडचे उर्वरित काम सुरू झाले की, वर्षभरात कारशेड बांधून पूर्ण होऊ शकते,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारू नये म्हणून आंदोलन करणार्यांना ‘छद्म पर्यावरणवादी’ असे संबोधत फडणवीस म्हणाले
पुणे महानगराचा पर्यावरण कृती आराखडा बनविण्यासाठी युरोपियन समुदायानतर्गत असलेल्या ग्लोबल कोव्हेटंट ऑफ मेयर्स या संस्थेने पुणे महापालिकेला मदतीची तयारी दर्शविली आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले की, या अंतर्गत पुणे महापालिकेच्या संबंधित प्रकल्पांची जलदगतीने अमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कृतीचा समावेश असणारा सर्वसमावेशक हवामान कृती नियोजन अभ्यास केला जाणार आहे.
पर्यावरणाला धोका पोहोचण्याची पर्यावरण प्रेमींना भीती हे तर निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्याचे उद्योग : दयानंद स्टॅलिन यांचा आरोप
प्रकल्प रद्द करण्यासाठी 600 पेक्षा अधिक नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सरकारने प्लास्टर आॅफ पेरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायाची अंमलबजावणीही येत्या काळात होईल. मात, खरचं प्लास्टर आॅफ पेरिस हे शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा घातक आहे का ? याविषयी तज्ज्ञांकडून तथ्य जाणून घेऊन केलेला हा उहापोह…..
वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपतील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार वृक्षरोपणाची मोहिम
डोंबिवलीनजीक असलेल्या उंबार्ली येथील पक्षी अभयारण्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण येण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेमींकडून या टेकडीवर आज पहारा देण्यात येणार आहे. त्यासाठी 15 ते 20 पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
पर्यावरणवाद्यांच्या पोकळ प्रतिमेला छेद देऊन सुसंवादी आणि ‘अभ्यासू पर्यावरणवादी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या उल्हास राणे यांच्याविषयी...
जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारतातील पाणथळींची एकूणच स्थिती, मुंबई उच्च न्यायालयात पाणथळींच्या संरक्षणार्थ दाखल जनहित याचिका यांचा ऊहापोह करणारा लेख...
सध्या जागतिक पातळीवर सिंगापूर सायकल कॅम्पेन राबविले जात आहे. या कॅम्पेनचे वैशिष्ट्य म्हणजे यात सबकुछ महिला असे हे कॅम्पेन आहे. ‘झिरो कार्बन फूटप्रिंट’ हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धानासाठी नारी शक्ती सरसावल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.
‘दै. मुंबई तरुण भारत’च्या हाती या संदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे लागली असून दफनभूमीला जागा दिली नाही म्हणून विशिष्ट समाज आरेमधील कारशेडला विरोध करत असल्याचे खळबळजनक सत्य उजेडात आले आहे.
‘एसएफसी इन्व्हायर्नमेंटल प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर यांना एका ख्यातनाम इंग्रजी दैनिकातर्फे 'आयकॉन ऑफ नवी मुंबई' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या युगात तडजोड न करता आपले ध्येय गाठणारा एक यशस्वी उद्योजक, अशी त्यांच्या कामाची ख्याती आहे. आपला व्यवसाय करताना पर्यावरण व्यवस्थेला धक्का लागू न देता उन्नती करणे हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपली सेवा दिली आहे. नवी मुंबई शहरातील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
'कॉप-१४' संमेलनात पंतप्रधान मोदी यांची घोषणा
सगळ्याच नाहीत पण बहुसंख्य पर्यावरण चळवळी या नकारात्मक भावनेवर सुरू आहेत. करण्यासारखे बरेच काही असताना आपले तेच बरोबर हाच या मंडळींचा हेका आहे.
जगातील सर्वात मोठ्या सदाहरित अमेझॉन जंगलांना आगीने घेरले आहे. गेले ११ दिवस या जंगलात आगीचे साम्राज्य आहे. जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल अशी जैवविविधता या जंगलांमध्ये आढळते.अमेझॉन हे जगातील सर्वात मोठे वर्षावन ते सर्वाधिक कार्बन शोषून ग्लोबल वोर्मिंगचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. परंतु सध्या ही वने आगीमुळे धुमसत आहेत.