भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हत
Read More
प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ Beer Biceps यांना अलीकडेच एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला. या पोस्टमध्ये त्यांनी “पाकिस्तानी भावंडांनो” असं संबोधत शांतीचा संदेश दिला होता. मात्र त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटताच त्यांनी ती पोस्ट हटवली आणि नंतर भारतीय लष्कराला पाठिंबा दर्शवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचे समर्थन केल्यावर अभिनेत्री सेलिना जेटली हिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत सेलिनाने ठामपणे सांगितलं – “मी कधीच माफी मागणार नाही.” सध्या ऑस्ट्रियामध्ये असलेल्या सेलिनाने आपल्या देशभक्तीचा अभिमान व्यक्त करत भारतीय सैन्याचे शौर्य आणि बलिदान यांचं कौतुक केलं आहे.