विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यावेळी पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात असलेले मनसेचे अमित ठाकरे माहिममधून पिछाडीवर गेले आहेत. तर उबाठा गटाचे महेश सावंत सध्या आघाडीवर आहेत.
Read More
जर मनसे महायूतीच्या विरोधातील सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील, तर एका पदासाठी अडून राहणं संयुक्तिक राहणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्या, अशा सुचना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यामुळे मी आज माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका ठरवणार आहे, असे वक्तव्य माहिम विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केले आहे.
"माहिममध्ये अशा प्रकारची लढत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले. परंतू, शेवटी यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आम्ही मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच आमची भूमिका ठरवू," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. माहिममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे तिथे यंदा तिरंगी लढत होणार आहे.
आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायूतीने एकत्र येऊन त्यांना समर्थन द्यायला हवे, असे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी माध्यमांशी संवाद साधला.
मंगळवारी मनसे आणि शिवसेनेने आपापली उमेदवार यादी जाहीर केली. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याठिकाणी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे.
मनसेने अमित ठाकरेंना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आता उबाठा गटाने अमित ठाकरेंच्या विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. उबाठा गटाने महेश सावंत यांना माहिममध्ये उमेदवारी जाहीर केली.