देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या सुरु आहे, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंसह उबाठा गटावर केला आहे. तसेच त्यांनी मुंबकरांना सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.
Read More
देवनार ‘डम्पिंग ग्राउंड’ साफ करण्यासाठी २ हजार ३६८ कोटींच्या खर्चाची निविदा मुंबई पालिकेने काढली. तेव्हापासून कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे तेथे घिरट्या घालू लागले आहेत. कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षांत ते गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन आरोप करताना, त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत, असा हल्लाबोल मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. १५ मे रोजी केला.
मुंबई : गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कचरावेचक महिलांना कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार केला आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’, सा. ‘विवेक’ आणि ‘पार्क’च्या या कार्यालयातील महिला कर्मचार्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
“मुंबई पालिकेने बांधलेल्या देवनार रस्त्याचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी झाले असताना या कामाच्या खर्चात तब्बल १३० कोटी रुपयांचा फेरफार कशासाठी झाला आहे,” असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवार, दि. २ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत केला. तिसर्यांदा फेरफार झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
देवनारमध्ये एका विवाहितेवर बलात्कार करून व्हीडिओ शूट करत व्हायरल करण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
२००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते.