मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा केवळ कागदोपत्री न राहता, जनमानसात रुजवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठीच्या गौरवशाली अडीच हजार वर्षांच्या परंपरेचा जागर करण्यासाठी, आता दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' देखील साजरा केला जाईल, असे मराठी भाषा विभागाने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि संशोधनाला गती मिळणार
Read More