उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.
Read More
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुद्वेषी वक्तव्यानंतर त्यांचावर चौफेर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत असल्याचा आरोप केला, त्यावर केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जो धर्माचा नाश करतो, धर्म त्याचा नाश करतो.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्यासह अनेक नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मोहम्मद अलीला गुजरात पोलिसांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक केली आहे. त्याचे पाकिस्तानशी संबंध असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तो पाकिस्तानातील एका व्यक्तीसोबत व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडला गेला होता. गुजरातचा मौलाना सोहेल खानही याच गटात होता.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित 'द आरएसएस, मनू अँड आय' या कार्यक्रमाचा धसका घेऊन पोस्टर्स डाव्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाचे पोस्टर्स फाडण्याचा नेहेमीचा बालिशपणा केला आहे.
अकोल्यात कट्टरपंथीयांनी केलेल्या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला महाराष्ट्र पोलिसांनी दि. २० मे रोजी अटक केली आहे. अरबाज खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खान हा अकोल्यातील हिंदूंवरील हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे मानले जाते. मात्र पोलीसांना अद्याप हिंसाचारामागील 'गॉडफादर' भेटला नाही. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
भाजप नेत्या नुपूर शर्मांचे समाजमाध्यमांवर समर्थन केल्यामुळे अमरावतीयेथील औषधविक्रेते उमेश कोल्हे यांची कट्टरपंथीयांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी समर्थन केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडलेल्या नुपूर शर्मांचे समर्थन केले आहे. शर्मा यांची बाजू घेताना "नुपूर शर्मा जे बोलल्या होत्या, झाकीर नाईकनेही तेच सांगितले होते". "पण नाईकने माफी मागावी अशी कोणीही मागणी केलेली नव्हती", असे विधानकरून त्यानंतर राज ठाकरे यांनी एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर ठाकरी भाषेत तोफ डागली.
जागतिक स्तरावर गौरवलेले ख्यातनाम लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात एका माथेफिरूने चाकूने हल्ला केला. सध्या भारतात देखील नुपूर शर्माच्या पोस्टचे समर्थन केले म्हणून उमेश कोल्हेसह अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. सलमान रश्दी यांच्यावरील हल्ला आणि नुपूर शर्मा समर्थन प्रकरणी सुरु असलेलं हत्यासत्र हे सगळ एकाच विचारधारेकडून सुरु आहे का आणि म्हणूनच विशिष्ट धर्मीय भारतात सुरक्षित नाहीत असे वैचारिक दळण दळणारे तथाकथित विचारवंत रश्दींवर झालेल्या हल्याने गप्प आहेत?
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या जैश - ए - मोहम्मद आणि तहरीक - ए - तालिबानचा अतिरेकी मोहम्मद नदीमला दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर येथून अटक केली आहे
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या कथित अपमानजनक टिप्पण्यांबद्दल नोंदवलेले प्रथम माहिती अहवाल
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नुपूर शर्मांचं समर्थन करणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी लिहिल्याने त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय संथ गतीने सुरु होता. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तेवर येताच उमेश कोल्हे हत्या तपासाने चांगलाच वेग घेतला. पुढे हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले.
महाराष्ट्रात उमेश कोल्हे प्रकरणाची पूनरावृत्ती !
खरोखरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणारे कधीही ‘फाईव्हस्टार’ मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत, त्यांना उंची कपडे, उंची मद्य, गुळगुळीत कागदाच्या मासिकांमध्ये मुलाखती आणि अन्य अपेक्षा नसते. त्यामुळे ते अतिशय शांतपणे त्यांचे काम करत राहतात आणि त्यासाठी गरज पडल्यास आपल्या प्राणांचे बलिदानही देतात.
नुपूर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हेंची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपीला ऑर्थर रोड तुरुंगात बेदम मारहाण झाली आहे. २३ जुलै रोजी पाच जणांनी पठाणला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र रचल्याचा खुलासा पाटण्यातून पर्दाफाश केलेल्या ‘दहशतवादी नेटवर्क’मधून उघड झाला आहे.
अजमेर दर्ग्याच्या खादिमांनी नजीकच्या काळात हिंदूंविरोधात भडकाऊ आणि चिथावणीखोर विधान केली असून त्यातूनच शराफतच्या बुरख्याआड लपलेला खादिमांचा भेसूर चेहरा समोर येत आहे. इतकेच नव्हे, तर अजमेरमधील शरीफ दर्ग्याच्या खादिमांची विधाने आणि त्यांची कुकृत्ये पाहता यापैकी कोणीही अजिबात शरीफ नसल्याचे स्पष्ट होते.
राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालाल या शिवणकाम करणार्या हिंदूच्या शिरच्छेदाचे धागे आता इस्लामी कट्टरपंथी संघटना ‘एसडीपीआय’पर्यंत पोहोचले आहेत.
महुआ मोइत्रा व शशी थरुर काँग्रेसचे खासदार आहेत. यातून तृणमूल काँग्रेस व काँग्रेसला मुस्लिमांना अन् इस्लामी कट्टरपंथीयांना संदेश द्यायचा असतो. हिंदूंना जे काफिर समजतात, त्या काफिरांबद्दल आमचेही मत तुमच्यासारखेच आहे, असे या दोन्ही पक्षांना धर्मांधांना सांगायचे असते. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा, असे केल्याने तुम्हालादेखील तुमचा हिंदूद्वेषाचा सिलसिला सुरू ठेवता येईल, असे सांगायचे असते. पण, याचा एक ना एक दिवस उलटा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
अमरावती हत्याकांडाचा तपास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनआयएला दिले होते.
नुपूर शर्मांच्या विरोधात समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून सामाजिक शांतात बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखायला गेलेल्या हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर आणि जिल्हा प्रमुखावर जीवघेणा हल्ला झाला आहे
यापूर्वी ८ जून २०२२ रोजी भीम सेना प्रमुख नवाब सतपाल तंवरनेही नूपुर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर भीम सेनेतर्फे कानपुरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाबद्दल नुपूर शर्मालाच दोषी ठरविले होते. भीम सेनेचा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष सतपाल तंवर म्हणाला होता की. “नूपुर शर्माने नबीचा अपमान केला आहे. ज्यामुळे कोट्यवधी धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांना अटक झालेली नाही."
देशात निरपराध हिंदूंच्या होणाऱ्या हत्येस हे निवडक पत्रकार आणि राजकीय नेते जबाबदार असल्याचाही आरोप मिश्रा यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ४८व्या ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने जर्मनीच्या आणि त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या छोटेखानी दौर्याला आठवडा उलटून गेला असला आणि हा दौरा अवघ्या तीन दिवसांचा असला तरी बदलत्या जागतिक परिस्थितीत नवी समीकरणे तयार करण्याच्या दृष्टीने तो अतिशय महत्त्वाचा होता.
नुपूर शर्मा यांचे सोशलमीडियावर समर्थन केल्याने उदयपूरमधील टेलर कन्हैय्यालाल यांची हत्या झाली होती, याच कनैह्यालाल यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भाजपचे राजस्थानमधील नेते कपिल मिश्रा पुढे सरसावले
राजस्थानच्या उदयपूरमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांविषयीच्या विधानाच्या समर्थनात दहा दिवसांआधी समाज माध्यमांवर ‘पोस्ट’ करणार्या एका शिवणकाम करणार्या व्यक्तीची रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मदनामक इस्लामी जिहाद्यांनी गळा कापून निर्घृण हत्या केली.
"कुठलाही धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल बोलणे चुकीचेच आहे पण महाराष्ट्रात हिंदूंना मारण्याची सूट मिळाली आहे का ?" असा घणाघाती सवाल भाजपचे आ. नितेश राणे यांनी मविआ सरकारला केला आहे. माविआ सरकराने हा विषय दाबून टाकला आहे असाही आरोप राणे यांनी केला आहे
राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची मंगळवारी हत्या करण्यात आली. हल्लेखोर मंगळवारी दि २८ रोजी भरदिवसा त्याच्या दुकानात घुसले. आणि तलवारीने त्याच्यावर अनेक वार करून त्याचा गळा चिरला. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही तयार करण्यात आला होता. एवढेच नाही तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उदयपूर जिल्ह्यात २४ तासांसाठी नेट बंद ठेवण्यात आले आहे.
जन्नत अलिमा हिने जे द्वेष पसरविणारे, स्फोटक भाषण केले, ते लक्षात घेता तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी, अशी मागणी हिंदू मुन्ननीचे नेते कुत्रलानाथन यांनी केली आहे. जन्नत अलिमा हिच्या स्फोटक भाषणाबद्दल हिंदू मुन्ननीच्या या नेत्याने पोलिसांमध्ये तक्रारही नोंदविली आहे. ‘एसडीपीआय’ने नुपूर शर्मा हिचा आणि निदर्शकांविरुद्ध कडक कारवाई केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांचा निषेध करण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी अलिमा हिने ही धमकी दिली.
धर्मांध मुस्लिमांनी दोन आठवड्यापर्यंत देशभरात यथेच्छ धुडगूस घातल्यानंतर मुस्लिमांतल्याच ‘जमियत उलेमा-ए-हिंद संघटने’ला जाग आली आणि तिच्या अध्यक्षांनी हिंसाचाराचा विरोध केला, नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, देशात कायद्याचे राज्य असल्याचे विधान त्यांनी केले. तसेच, दंगलखोरांसह ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि मौलाना मोहम्मद मदनीविरोधात फतवा काढणार असल्याचे म्हटले.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या कथित ईशनिंदेच्या वक्तव्यावरुन भारताच्या विविध शहरांत मुस्लीम समुदाय आक्रमक होत रस्त्यावर उतरला. मुस्लीम देशांमधून याविषयी लगोलग विरोधी सूर उमटले. पाकिस्तानसारख्या देशाने, तर ‘भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत’ वगैरे नेहमीची री ओढली.
पूर्व भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात चक्क ‘सायबर’ हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
आम्ही १८ लाख नागा साधू रस्त्यावर उतरू: महंत बालक दास
प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने धर्मांध दंगेखोरांकडून पश्चिम बंगालमध्ये मोठ्याप्रमाणावर हिंसाचार केला गेला. त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना, राज्य पोलीस राज्यात उसळलेली दंगल रोखण्यासाठी असमर्थ ठरत असल्यास पश्चिम बंगाल सरकारने केंद्रीय दलांना बोलावले पाहिजे, असे मत नोंदवत कलकत्ता उच्चन्यायालयाने ममता बॅनर्जींच्या तृणमूल सरकारला फटकारले.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सहभागी झालेल्या निदर्शकांना निर्वासित करण्यात येईल असे अरब टाइम्सने ११ जून रोजी नोंदवले.
मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट केली म्हणुन साद अश्पाक अन्सारी या युवकाला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगाल राज्यातील बेथुआदहरी रेल्वे स्टेशन आणि ट्रेनवर जमावाने हल्ला केला. काल दि. १२ रोजी संध्याकाळी, पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर इस्लामी जमावाने हल्ला केला. तसेच स्थानकावरील लोकल ट्रेनचे नुकसान केले.
भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैगंबराचा कथितरत्या अपमान केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी धर्मांधांनी शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, तेलंगणा, बेळगाव, महाराष्ट्रात गोंधळ माजवून हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दिल्लीत गोंधळ माजविणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
मोहम्मद पैगंबरांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भातील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ (ओआयसी)च्या विधानाचा भारताने कठोर शब्दांत निषेध केला आहे.
भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांना त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.