पंजाबमध्ये आप सरकार स्थापन केल्यानंतर शिरोमणी अकाली दल हा पक्ष पुरता बिथरला आहे. आधी शेतकर्यांच्या मुद्द्यांवरुन शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. त्यानंतर मायावतींच्या बसपासोबत संधान साधत निवडणूकही लढवली. पण, त्यांच्या पदरी पराभवच पडला. भाजपशी फारकत घेऊन अकाली दल अस्तित्वाची लढाई लढत आहे.
Read More
भूतानची ४७०किलोमीटरची सीमा चीनला लागून आहे . म्हणजेच भारत आणि चीन यांच्यादरम्यान भूतान हा ‘बफर स्टेट’ची भूमिका बजावत आहे. त्यामुळे भारतासाठी भूतान हा महत्त्वाचा देश आहे. १९५१ मध्ये ज्या वेळी चीनने आपल्या विस्तारवादी धोरणानुसार तिबेटला अस्तित्वहीन केले. तेव्हापासूनच भूतानने चिनी विस्तारवादाचा धसका घेतला आहे.