नेदरलँडचा बीच व्हॉलीबॉल खेळाडू स्टीव्हन व्हॅन डी वेल्डे हा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला आहे. सन २०१४ साली इंग्लंड येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यामुळे त्याला ४ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली होती.
Read More
युरोप खंडाच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या नेदरलँडमधील (Netherlands) एका गावात राहणाऱ्या झोराया टेर बीक या २८ वर्षीय तरुणीने कायदेशीररित्या आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Euthanasia) अहवालानुसार, शारीरिकदृष्ट्या निरोगी असूनही, तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षामुळे तिने इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे. तिला यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला इच्छामरणाची अपेक्षा आहे. नेदरलँड्सने २००१ साली इच्छामरण कायदेशीर केले. तसे करणारा नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे. तेव्हापासून, इच्छामरण हवे असलेल्या लोकांची वाढती
अॅपलमध्ये काम करणाऱ्या नताशा डच नावाच्या महिलेला इस्त्रायल -हमास संघर्षावर पोस्ट करणे महागात पडले आहे. तिने यहुदींच्या विरोधात विधान केले होते. त्यामुळे तिला नोकरीवरून काढण्यात आले आहे. नताशाच्या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तिने जर्मन आणि यहुदींना दहशतवादी म्हणटले होते. त्यानंतर नताशाविरोधात कारवाईची मागणी सोशल मिडीयावर करण्यात आली होती. दरम्यान इस्त्रायल आणि हमास यांच्यात १ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे.
नोटबंदीनंतर बंद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटांचं नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अहमदाबादच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) च्या विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. ज्यात रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांपासून अनोख्या वस्तू बनवण्यात आल्या होत्या. या नोटांपासून साऊंड प्रूफ टाइल्स, पर्स, विटा, डायरी इत्यादी वस्तू बनवल्या गेल्या होत्या.
सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्ता स्वतःच्या आरमाराच्या बळावर हिंदुस्थानावर स्वारी करून आल्या. त्यांनी कोलकाता, चेन्नई, गोवा, वेंगुर्ला, राजापूर, मुंबई, सुरत अशा विविध ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. हे सर्व पाहून त्यावेळच्या सत्ताधीशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. अपवाद होता तो फक्त शिवरायांचा...
हिवाळी ऑलिंपिक २०२२ हे चीनमधील बीजिंग येथे पार पडत आहे. या ऑलिम्पिकसाठी जगभरातील पत्रकार चीनमध्ये उपस्थित आहेत. पण साम्यवादी विचारसरणी मानणाऱ्या चीनमध्ये लोकशाही आणि माध्यमांचे स्वातंत्र्य मात्र नाही याचा अनुभव प्रत्येक क्षणाला येथील पत्रकारांना येताना दिसत आहे.