मुंबई मेट्रो २ अ आणि ७ वरून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नियमित प्रवास कार्ड आणि पासवर थेट २५ टक्के सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून याबाबत एक्स अकाउंटवर माहिती देण्यात आली आहे.
Read More
पुण्यातील टिळक रोडच्याइथल्या न्यू इंग्लिश स्कूल येथे दि. २१ जुलै रोजी प्रख्यात संशोधक, रा. चिं. ढेरे यांच्या जयंतीनिम्मित डॉ. रा. चिं. ढेरे संशोधन केंद्राच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत एकूण चार पुस्तकांचे प्रकाशन झाले, त्यातील तीन पुनर्प्रकाशित होती. ' भारतीय रंगभूमीच्या शोधता ' आणि ' बोरकरांची प्रेमकविता ' या दोन पुस्तकांचे पुनर्मुद्रण प्रकाशित झाले.
(Baramati News) पुणे जिल्ह्यातील बारामती येथे गुरुवारी १७ जुलैच्या रात्री उशिरा एका बँक मॅनेजरने बँकेच्या शाखेतच गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशंकर मित्रा असे या बँक मॅनेजरचे नाव आहे. मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमध्ये मित्रा यांनी म्हटले आहे.
मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते कै. अरविंद पिळगांवकर यांच्या आठवणींचा उजाळा देणाऱ्या 'कोsहम, सोsहम' या विशेष पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जुलै रोजी, बालगंधर्वांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, प्रभादेवी इथल्या पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी लघु नाट्यगृहात सायंकाळी ७:१५ वाजता पुस्तक प्रकाशानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईदरम्यान काँग्रेस पक्षाला “राष्ट्राच्या शत्रूंची बाजू घेणारा” असे विधान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केले होते. या विधानावरून काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गोस्वामी यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवार,दि. ७ जुलै रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषशैंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर पार पडली
पतंजली आयुर्वेद'ला डाबरच्या चवनप्राश उत्पादनाचा अपमान आणि विरोध करणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यापासून गुरुवार ,दि. ३ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने मनाई केली आहे. न्या. मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींविरोधात डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या अंतरिम अर्जाला मान्यता दिली.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे दोन वरिष्ठ अधिकारी देखील आहेत.
( Revenue Minister Chandrashekhar Bawankule warning to senior officials ) तलाठ्यापासून मंत्रालयातून राज्याचा कारभार चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण 'एक परिवार' आहोत हे ध्यानात ठेवून न घाबरता जनतेची कामे करावी. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक जाणीवपूर्वक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या, असा कानमंत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना दिला.
कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होत चालला आहे, यावर दुमत असायचे कारण नाही. देश विदेशातील बाजारपेठांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत वेगाने होणारे बदल आत्मसात करत, माणूस आपल्या भविष्याचा पाया रचतो. दुसर्या बाजूला प्रगत तंत्रज्ञानाबद्दलच्या अज्ञानामुळे साशंकता आणि भीती या दोन भावना, प्रामुख्याने लोकांच्या मनात घर करतात. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचा विचार करत असतानाच, आपसूकच हे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्रात माणसांची जागा घेईल, हा विचार सर्वप्रथम केला जातो. या बद्दलची चिंता आणि चिंतन स्वाभ
ठाणे : जुन्या काळातील हिंदी-मराठी गीतांबरोबरच हळुवार मराठी गीते आणि आई जगदंबेला साकडे घालणारी बहारदार गीते सादर करणाऱ्या कोपरीतील `सिनीयर सिटीझन'चे ( Senior Citizen ) नागरिकांनी कौतुक केले. वयाची सत्तरी ओलांडलेल्या अनेक कलाकारांनी सूर व ताल धरीत उत्तमोत्तम गीतांमधून आपल्यातील गुणांचे प्रदर्शन घडविले. तरुणांप्रमाणे उत्साहात झालेल्या या कार्यक्रमात सिनीयर सिटीझन रमल्याचे पाहावयास मिळाले.
नागपूर : साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.
(Mukhyamantri Vayoshri Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर महायुती सरकारने राज्यातील वयोवृद्धांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री वयोश्री योजने' अंतर्गत १४ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी ३ हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक नीला उपाध्ये यांचे दि. ७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अफाट उत्साह, दुर्दम्य आशावाद, प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि तितक्याच संवेदनशील मनाच्या नीला मॅडम... “पत्रकारितेच्या क्षेत्रात मानवी मूल्ये जपणे जितके महत्त्वाचे तितकेच आपले संस्कार शाबूत राखणेही महत्त्वाचे” अशी शिकवण देणार्या नीला मॅडम. त्यांच्या निधनानेे अक्षरश: जिवाला चटका लागला. या श्रद्धांजलीपर लेखात सारांश रूपाने त्यांच्या आणि माझ्या स्नेहबंधाचे शब्दचित्रण...
(Mukhyamantri Vayoshri Yojana) सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागामार्फत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसाहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत.
Senior Citizen Scheme राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
वानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची किमान प्रत्यक्ष निकष आणि विनिर्देशांची सविस्तर नियमावली महारेराने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे विकासकांवर बंधनकारक राहणार आहे. ही नियमावली राज्यात लागू करण्यात आलेली आहे. या किमान प्रत्यक्ष निर्देशानुसारच असे गृहप्रकल्प बांधावे लागतील. यासोबतच विकासकांना या तरतुदींचा विक्री करारातही यथायोग्य पध्दतीने समावेश करावा लागेल.
दि. १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. त्यासाठी आतापासूनच करनियोजन करणे गरजेचे आहे. मागील भागात आपण काही करातील वजावटीच्या दृष्टीने तरतुदींचा आढावा घेतला. आजच्या भागातही करबचत करणार्या अशाच काही महत्त्वपूर्ण योजनांविषयी...
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रहिवाशी असलेल्या ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आता परिवहन उपक्रमाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. मात्र आता या सवलत योजनेत बदल करून जेष्ठ नागरिकांना परिवहन उपक्रमाच्या बसमध्ये "मोफत प्रवास सवलत योजना सुरु करण्यात आली आहे.म्हणजे आता ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत रामचंद्र जाधव (६३) यांना मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली. गेले काही महिने ते न्युमोनियाशी झुंज देत होते. मुंबईतील एका खासजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री १.१५ वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. परिचयातील सर्व स्वयंसेवक त्यांना प्रेमाने 'बावा शिक्षक' म्हणायचे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) अंतर्गत रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एनडीएमए अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार” पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक आधार असणारी विरंगुळा केंद्रे, सवलतीत एनएमएमटी बस सुविधा, आरोग्य सेवा अशा विविध बाबीनी ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारी नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी ज्येष्ठांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम राबवित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत असते. अशाच प्रकारे या वर्षीचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये जल्लोषात साजरा झाला.
केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेठ जीएसएमडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट अंतर्गत “वरिष्ठ लेखापाल” पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतातील सर्वात जुन्या बँकापैकी एक The Catholic Syrian Bank Limited ( CSB Bank) ने ज्येष्ठ नागरिक आणि महिला खातेधारकांसाठी स्पेशल ऑफर बाजारात आणली आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सेव्हिंग खाते आणि वूमन पॉवर सेव्हिंग खाते या दोन प्रकारची खाते योजना सुरू केली आहे. बँकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या खात्यावर अनेक प्रकारच्या सुविधा, लाभ असणार आहेत. लॉकर रेंटल, एअरपोर्ट विश्रामगृहाचा मोफत प्रवेश, व रुपे प्लाटिनम डेबिट कार्ड असे वेगवेगळे लाभ या खात्यावर मिळणार आहेत.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे मोतीबाग संघ कार्यालय येथे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनंतराव देशमुख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण झाले. यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे सदस्य प्रकाशराव आठवले उपस्थित होते.
भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक योजना अमलात आणल्या. पाश्चिमात्य देशांत ज्येष्ठ नागरिकांना ज्या सवलती मिळतात, त्या तुलनेत आपल्या देशांतील नागरिकांना फारच कमी सवलती उपलब्ध आहेत. तरीही ज्येष्ठ नागरिकांचे औषधपाणी, जीवनमान, चरितार्थ इत्यादींसाठी त्यांच्याकडे पैसा खेळता राहावा म्हणून प्राप्तिकर कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. त्याविषयी सविस्तर...
सोन्यातील गुंतवणूक ही पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष सोनेखरेदीपुरती मर्यादित न राहता, हल्ली त्याचे बरेच डिजिटल पर्याय उपलब्ध होतात. त्याचीही माहिती नागरिकांनी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच अल्पबचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांत ज्येष्ठ नागरिकांची गुंतवणूकदेखील वाढली आहे. याचे कारण म्हणजे या योजनांतील गुंतवणुकीवर आता चांगला परतावा मिळत आहे व या गुंतकवणुकीत जोखीम नाही.
आयुष्याच्या उतारवयात साथसोबत आवश्यक असणार्या ज्येष्ठ नागरिकांना ‘लिव्ह इन’चा आगळावेगळा आधार देणार्या ‘हॅपी सिनिअर्स’ या संस्थेच्या माधव दामले यांच्याविषयी...
मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.
सांगली येथे झालेल्या पहिल्या महिला ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’त कल्याणच्या वैष्णवी पाटील यांनी उपविजेता होण्याचा मान मिळविला आहे. वैष्णवीच्या या यशाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वैष्णवी हरली असली, तरी ती लढली, अशीच भावना आहे. जाणून घेऊया, वैष्णवीची वाटचाल...
विरोधकांकडून मोफत एसटी प्रवासावरून सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र, आपण ज्येष्ठांना सेवा दिल्यानंतर ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठांना या सेवेचा लाभ घेतला. तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा घेणे, देवदर्शनासाठी पर्यटनासाठी त्याचा लाभ घेतला आला. राज्याने यासाठी एकूण २६२ कोटी निधी खर्च केला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी बुधवार, दि. १ मार्च रोजी लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. कुमार यांनी आज जयपूर स्थित सप्तशक्ती कमांडची सूत्रे हाती घेतली आहेत. लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार हे लष्कराच्या मुख्यालयात सैन्य उपप्रमुख (रणनीती) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अलीकडील नियुक्तींमध्ये गुप्तचर मोहिमा, दलांची रचना, ऑपरेशनल लॉजिस्टिक आणि तंत्रज्ञान अशा विविध कामाचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त
दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आज (9 डिसेंबर) सकाळी मुलूंड येथे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आजारी होते. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आजच मुलुंड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सत्कार अर्थात कौतुक सोहळा ठाण्यातील प्रताप व्यायाम शाळेत रविवार, दि. १९ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
माहितीच्या अभावाने प्राप्तिकर पात्र उत्पन्न असलेलेही कित्येक जण त्यांच्या त्यांच्या वयानुसार ‘१५ जी’ किंवा ‘१५ एच’ फॉर्म भरतात. ७५ हून अधिक वय असलेल्या व्यक्ती ज्यांना प्राप्तिकर रिटर्न ‘फाईल’ करण्याची गरज वाटत नसेल, अशा व्यक्ती प्राप्तिकर कायद्याच्या ‘फॉर्म १२ बीबीए’ भरून त्यांच्या बँकेत सादर करू शकतात.
ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व माध्यम सल्लागार मकरंद मुळे यांना यंदाचा 'ठाणे गुणीजन' पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी मुळे यांना गडकरी रंगायतन येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अनिल अवचट यांची गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी वयाच्या ७८व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
पत्रकारिता, सामाजिक कार्य, जगभ्रमण, अध्यापन आणि सामाजिक संघटन असे विविध पैलू यशस्वीपणे सांभाळणार्या ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण शिदोरे यांचे ‘कृष्णेचे पाणी’ हे एक शतकभरातील सामाजिक-राजकीय घडामोडींचा वेध घेत वर्तमानाला भिडणारे महत्त्वाचे आत्मचरित्र.
‘ऑमिक्रॉन’मुळे जर २०२१-२०२२ या वर्षासाठीची प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढविली, तर मुद्दा वेगळा, पण जर नाही वाढविली, तर निवडलेल्या पर्यायात ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक करावीच लागेल. पण, अगदी मार्चपर्यंत, अकराव्या तासापर्यंत थांबू नये. कारण, घाईघाईने निवडलेल्या गुंतवणुकीचा पर्याय चुकीचाही ठरू शकतो. मार्चमध्ये एकदम मोठी रक्कम उभारणे अशक्यही होऊ शकते. त्यामुळे जानेवारीपासूनच योग्य नियोजन करुन, योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. म्हणूनच आजच्या लेखात गुंतवणूकदारांसाठी अशाच दहा पर्यायांची विस्तृत माहिती जाणून घेऊया...
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावरील भोईरवाडी येथे असलेली युनियन बॅकेची शाखा बॅक व्यवस्थापनाने गोपी सिनेमा येथे सुरू केली आहे. भोईरवाडी येथील बॅकेची शाखा तळमजल्यावर असल्याने ज्येष्ठांसाठी ती सोयीची होती मात्र आताची शाखा ही अडचणींच्या जागेत असल्याने बॅकेच्या ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे दिर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा कुशन मित्रा यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली आहे. मित्रा ऑगस्ट २००३ ते २००९पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.
या सप्ताहात नाशिक येथे वास्तव्यास असलेले, परंतु सार्या कलाविश्वाला एकाहून एक असे कलाविद्यार्थी बहाल करणारे आणि दृश्यकलेतील ’प्रामाणिकत्व’ जपण्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड तसेच विचारांची तोडफोड न करणारे असे, ज्यांच्या नावात महाभारतातील महानायक असलेल्या बहुभूमिका निभावणार्या भगवान श्रीकृष्णाचे एक नाव आहे; मात्र ज्यांच्या कुंचल्याचा फटकारा आणि वाणी रामायणातील महानायक प्रभू रामचंद्रांच्या ‘एकवचनी-एकबाणी’ तत्त्वांनुसार व्यक्त होत असते, अशा कलातपस्वी प्रा. केशव मोरे सरांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा केले
ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांचा गौप्यस्फोट !
तरुणांपेक्षा ५० किंवा त्याहून जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सकारात्मकतेचा स्तर हा सर्वाधिक असतो. उपचार करताना, उर्वरित आयुष्य पाहताना, ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात करत असताना याच गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात.
भारतात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात येईल.
नागपुरातील ज्येष्ठ संगीततज्ज्ञ, गायक, गुरु डॉ. बाळासाहेब पुरोहित यांचे दि. २६ डिसेंबर, २०२० रोजी हृदयविकाराने दु:खद निधन झाल्याची बातमी आली आणि मन विषण्ण झाले. सरांच्या कितीतरी आठवणी मनात फेर धरु लागल्या. माझे सर! माझे गुरु! माझे मामा! त्यांची सर्व रुपं माझ्या समोर गर्दी करु लागली.
उत्कृष्ट शिक्षक विशेषतः कलाशिक्षक हा उत्कृष्ट ‘प्रात्यक्षिके’ दाखवू शकतोच असे नसते, तर उत्कृष्ट प्रात्यक्षिके दाखविणारा कलाकार हा उत्कृष्ट कलाशिक्षक असतोच असेही नसते. ही गेल्या तीसेक वर्षांची निरीक्षणे आहेत. प्रात्यक्षिकांच्या बाबतीत तरी दोन प्रकार पडतात, असे माझे निरीक्षणांती मत बनलेले आहे. या दोन्ही प्रकारच्या प्रात्यक्षिककारांच्या कामामध्ये पाहणार्याला मजा येते. आनंद मिळतो. मात्र, ‘सेलिब्रिटी डेमॉन्सस्टेटर’ म्हणजे प्रसिद्धीच्या वलयात आनंद मानणारे प्रात्यक्षिककार कलाकार वेगळे! त्यांचं काम छान वाटतं. मात्
६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी
कोरोनाच्या उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
रंगभूमीचा आणखी एक ‘तारा’ निखळला!