लेकीबाळींचे बालपण म्हणजे निरागस, निष्पाप कळीसारखेच! पण, या कळीला अवेळीच कुस्करण्याचा कायदा ( Iraq Politics for Women Rights ) मुस्लीम राष्ट्र इराकमध्ये पारित झाला आहे. त्यानुसार शिया मुस्लीम मुलीचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी करण्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. काही कळण्याआधीच या बालिकांसाठी ‘निकाह’च्या नावाने लैंगिक आणि मानसिक शोषणाचा पिंजरा कायदेशीररित्या तयार असणार आहे. हा कायदा पारित करण्याचे कारण काय, तर बालवयात निकाह केल्याने मुली-महिला अनैतिक लैंगिक संबंधापासून वाचतील. भयंकर आणि तितकेच घृणास्पद!
Read More
Child Marriage उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात हिंदू अल्पवयीन मुलीशी निकाह करण्यासाठी कट्टरपंथी युवकाने फसवणूक केल्याची घटना घडली. हिंदू मुलीला मोहम्मद मुस्लिम नावाच्या कट्टरपंथी युवकाने निकाह करण्यासाठी न्यायालयात आणले होते. मात्र यावेळी अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू दिसल्याने मुलगी ही हिंदू असल्याचे उघड झाले. याप्रकरणी वकिलांना यासंबंधीत माहिती मिळाली असून ही घटना जौनपूर जिल्ह्यातील कुटाहान पोलीस ठाणे परिसरात ३१ ऑगस्ट रोजी घडली आहे.
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याची बातमी समोर आली आहे. हे प्रकरण कराचीतील शाहदाबकोट गावातील आहे. तिथे समीर अली नावाच्या एका कट्टरपंथी तरुणाने एका १५ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केले, त्यानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले आणि त्यानंतर तिच्याशी लग्न केले.
भारतातच नाही, तर २०१० ते २०२१ या काळात जपानमध्येही मुस्लिमांची लोकसंख्या ११० पटीने वाढली. त्यांना आता कब्रस्थान अपुरी पडत आहेत. त्यामुळे मृतदेह दफन करण्याऐवजी चक्क जाळावा लागतो. नवीन दफनभूमीसाठी परवानगी द्या, अशी मागणी तेथील मुस्लीम करतात. मात्र, भूजल प्रदूषण होईल, म्हणून एकही नवीन दफनभूमी नको, या भूमिकेवर जपानी नागरिक ठाम आहेत. त्यांना वाटते की, जपानी मुलींशी निकाह करून जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढली. म्हणजे आता लोकसंख्यावाढीसाठी निकाह?
भारतात सध्या समान नागरी कायदा आणण्याची चर्चा सुरु आहे. पण समान नागरी कायद्याला भारतातील काही कट्टरपंथीय लोक विरोध करत आहे. भारतात मुस्लीम पर्सनल लॉमध्ये चार निकाह म्हणजेच लग्न करायला परवानगी आहे. मुस्लीम पर्सनल लॉनूसार कोणताही मुस्लीम पुरुष चार लग्न करु शकतो. महिलांना ही परवानगी नाही. सोबतच २०१९ च्याआधी ट्रिपल तलाकही भारतात कायदेशीर होता.
बहारीन देशामध्ये पाल्यांनी इस्लाममध्ये सांगितलेले नियम पाळावे, यासाठी इथले पालक अगदी अतिसजग असतात, नव्हे ‘शरिया’ कायद्यामध्ये जे काही आहे, त्यानुसारच जीवन जगायचे, ही इथली पद्धत! बहारीनमध्ये सध्या अशाच एका घटनेवरून वादळ उठले. शाळेतून एका मुलाबाबत घरी तक्रारी यायच्या की, मुलगा शाळेत येत नाही, सिगारेट ओढतो. मद्यपानही करत असावा. त्याच्या पित्याला या तक्रारीमुळे राग अनावर झाला. मुलाच्या या अपराधाबद्दल पित्याने त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. इतके की, काटेरी साखळीने त्याचा जीव घ्यायचाही प्रयत्न केला. बहारीनमध
नवी दिल्ली: मुस्लिम वैयक्तिक कायद्याद्वारे संमत बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला यांच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ऑक्टोबर महिन्यात सुनावणी होणार आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात होती, पण आता त्याचा पर्दाफाश करण्यापर्यंत देशातले दर्शक पोहोचले आहेत. हिंदूंना बदनाम करणार्यांच्या चेहर्यावरचा बुरखा फाडला जात असून त्यांना त्यांची जागाही दाखवली जात आहे. त्याची आताच्या काळातील निवडक उदाहरणे पाहिली तरी हे नेमके कसे सुरु आहे, हे समजू शकेल.