निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग' साल २०२४ मध्ये स्थापन झाला होता. या आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र विधीमंडळाने २०२४ मध्ये 'मराठा आरक्षण कायदा २०२४' मंजूर केला होता. या कायद्यानुसार मराठा समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला वर्गाला १० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने समाजाला तात्पुरत्या स्वरूपात १०% आरक्षणाचा लाभ घेण्याची परवानगी देणाऱ्या आदेशाला एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात, गुरूवार दि. २६
Read More
मागील काही दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आखाड्यात जेवढा संवेदनशील झाला आहे तेवढाच तो न्यायालयीन दृष्टीने किचकट बनला आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांआधारे आरक्षण दिले होते, परंतु ते मे २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी एप्रिल २०२३ मध्ये फेटाळण्यात आली. त्यानंतर, एक उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली, जी सध्
मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी गुरुवार, ३० जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी २५ जागा लढवण्याची घोषणा केली होती. परंतू, मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्याचे कारण देत त्यांनी सोमवारी सकाळी निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
Manoj Jarange मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाचे सज्जद नेमानी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी भेट घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील यांनी सज्जद नेमानी यांची भेट घेत मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
( Manoj Jarange On Assembly Elections 2024 ) राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्गा सतत चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक उपोषणे व आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने यावर कोणताही ठाम निर्णय वा भूमिका घेतलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मनोज जरांगे यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी
( Pravin Darekar )“सगळ्या आंदोलनातून मनोज जरांगे भरकटल्यासारखे वाटत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल, असे वाटले होते. परंतु, मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसत आहेत. हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल, तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे,” असे आव्हान भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ
मराठा समाजाला देणारा कोण आणि फसवणारा कोण? याबद्दल मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
सारथीच्या माध्यमातून मराठा तरुण मोठमोठ्या पदांवर गेलेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. दरम्यान, काहीही न खाल्ल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मराठा आंदोलनाला आपला पाठिंबा असून, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा अट्टाहास बरोबर आहे का? तसेच, मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी बरोबर आहे का? हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. १९९४ मध्ये ‘मराठा बांधवांना आरक्षणाची गरज नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले असल्याने, त्यासाठी होणारे आंदोलन हे पवारांचेच पाप आहे, असेच म्हणावे लागेल.
मनोज जरांगेंनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंनी त्यांच्याशी संवाद साधला.
आम्ही १० टक्के आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याचा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडी आणि जरांगे हे दोघेही एकालाच टार्गेट करत आहेत. यातून त्यामागची भावना स्पष्ट दिसत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
वक्फ बोर्डाप्रमाणे आरक्षणाचं बिल आणा आमचा पाठिंबा राहिल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून मराठा समाजातील लोक अनेक नेत्यांना आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगत आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.
दुसर्याच्या वाटेत काटे पेरून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, तर त्या काट्यांवरून चालण्याची वेळ स्वतःवरही कधीतरी येते, असे म्हणतात. त्याने पाय रक्तबंबाळ होतातच, शिवाय समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. शरद पवार हे त्याचे ताजे उदाहरण.
काळजी करू नका, छगन भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला.
माझा करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वर करु शकतो, असं चोख प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिलं आहे. जरांगेंनी नाशिकमध्ये भुजबळांचा कार्यक्रम करणार, असा इशारा दिला होता. यावर आता भुजबळांनी प्रत्तुत्तर दिले.
मनोज जरांगे आता एकटे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय भाषा टाळायला हवी, असा सल्ला भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. तसेच मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा अजिबात आवडत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अखेर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका करण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवारांनी या आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण मनोज जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंनी खुशाल २८८ जागांवर उमेदवार उभे करावे, असेही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यावेळी ते आरक्षणासंबंधी जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्रात बांग्लादेशसारखं काहीही होणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे. बांगलादेशमध्ये सध्या अस्थिर वातावरण असून तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. तसेच बांग्लादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी देश सोडला आहे. दरम्यान, यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत मंगळवार, दि. ३० जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळल्याने विरोधकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मातोश्रीबाहेर दाखल झाले असून अनेक घोषणा देत आहेत.
"संरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना एकत्र बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा,” असे काल उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
शरद पवारांनी सोमवार, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी २ वाजताच्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवारांची ही बैठक पार पडली.
शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा प्रश्न करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडले. या महाअधिवेशनात बोलतांना त्यांनी भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट केल्याचे नमूद करून मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगितले, मराठा आरक्षणाची ही लढाई १९८२ मध्ये सुरू झाली होती, अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितले होते. मात्र, त्यांन
अजय बारस्कर यांची पंढरपूरमध्ये गाडी जाळल्याने ते आक्रमक झाले आहेत. त्यांना धमकीचे फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट धमकी देणाऱ्यांची नावच जाहीर करुन टाकली. काही महिन्यांपूर्वी अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते.
छगन भुजबळ शरद पवारांच्या गटात जाणार. छगन भुजबळांची महायूतीत कोंडी होतेय, अशा अनेक बातम्या आज सकाळी सकाळी माध्यमांमध्ये यायला लागल्या. याचं कारण होतं छगन भुजबळांनी अचानक घेतलेली शरद पवारांची भेट. शरद पवारांची अपॉईनमेंट न घेता गेलेल्या भुजबळांना तब्बल दीड तासांनी त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा दीड तास चाललेल्या या भेटीत नेमकं काय शिजतंय, अशी चर्चा सुरु झाली. कुणालाच कानोकान खबर नसलेली ही भेट नेमकी कशासाठी आहे? आणि अशा अचानक घेतलेल्या भेटीमागे नेमकं कारण काय? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जहरी टीका केली आहे. सगेसोयरे हे भेसळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटींच्या हक्कासाठी आरक्षण बचाओ यात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे राज्यभर ठिकठिकाणी दौरे करत असून सभा घेत आहेत. यातच आता गुरुवारी ते बीडमध्ये दाखल झाले असून याठिकाणी त्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विरोधकांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही पण वडेट्टीवारांच्या घरी बसून निवडणूकीची बैठक घेण्यासाठी वेळ आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मंगळवारी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतू, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर मंगळवारी विरोधकांनी ऐनवेळी बहिष्कार टाकला. त्यामुळे विरोधकांचा बोलवता धनी कोण आहे? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. बुधवारी सभागृहात विरोधकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यामुळे सभागृह ४ वेळा तहकूब करण्यात आले होते.
बाहेर मराठा समाजाबद्दल कळवळा दाखवणाऱ्यांनी जाणीवपूर्वक सर्वपक्षीय बैठकीवर जाणीवपूर्वक टाकला. त्यांचा खरा चेहरा आता पुढे आला आहे, असे म्हणत मंत्री शंभुराज देसाईंनी विरोधकांवर संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणसंबंधी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर आज हा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला.
मराठा आरक्षणाबाबतचे महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, अशी टीका भाजप आमदार प्रविण दरेकरांनी केली आहे. मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर आता दरेकरांनी विरोधकांवर टिकास्त्र डागले आहे.
विरोधी पक्षनेत्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की, ओबीसीतून ते त्यांनी जाहीर करावं, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मंगळवारी मराठा आरक्षणासंबंधी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता एक नवीन मागणी केली आहे. कुणबी नोंदी आढळलेल्या मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, जरांगेंच्या या मागणीमुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी सुरु असलेलं उपोषण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मागे घेतलं आहे. गेल्या १० दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणावर बसले होते. अखेर शनिवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला त्यांचं उपोषण मागे घेण्यात यश आलं आहे.
कावळ्याच्या शापाने गाई मरतात का? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना केला आहे. मनोज जरांगेनी भुजबळांचं राजकीय करियर उध्वस्त करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काहीही केलेलं नाही, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. त्यांनी गुरुवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगेंनी उपोषण करुन आत्मक्लेश थांबवायला हवा, असं वक्तव्य ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मागील सहा दिवसांपासून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणाबाबत सगे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. दरम्यान, गुरुवारी राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं आहे. मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला गेले असून त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात येत आहे. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही करण्यात येत आहे.
मनोज जरागेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या भेटीसाठी गेलं होतं. मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला गेले होते. या भेटीदरम्यान, जरांगेंनी आपलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सगे सोयरे संबंधीच्या मुद्दावर शासनाने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात बीड लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. बीडमध्ये यावेळी भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्यात सामना होता. शेटवच्या टप्प्यापर्यंत गेलेल्या मतमोजणीत पंकजा मुंडेंचा सात हजार मतांनी निसटता पराभव झाला. बजरंग सोनवणे यांच्या विजयात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाची मोठी भूमिका होती. मात्र, त्यांनी विजयानंतर 'न्यूज १८ लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या विजयाचे श्रेय मुस्लिम मतदारांना दिले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यानंतर फेब्रुवारी महीन्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण लागु केले. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मराठा आरक्षणासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला.
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली असून लोकसभेत अपक्ष उमेदवार न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, सगे-सोयरे याला विरोध करणाऱ्यांना पाडा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. तसेच, मी माझी जात राजकारणाच्यासमोर आणू शकत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगेंचं नाटक संपुर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगेची प्रसिद्धीची नशा संपत नाही. ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच जाते, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर केली आहे. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दिलेल्या १० टक्के आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.