विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी हेग येथे नेदरलँड्सचे संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्या संबंधित सुरक्षा दृष्टिकोन आणि आव्हानांवर चर्चा केली.
Read More
दिवाळी उत्साहात संपन्न झाल्याने आता भारतात शाळा पुन्हा एकदा सुरु होतील. त्यानंतर सहामाही परीक्षेचे गुणही समोर येतील. आपण परीक्षेत उधळलेले गुण काय रंग दाखवतात, याची धाकधुक एव्हाना परीक्षार्थींच्या मनात सुरु झालेली असतेच. अर्थात, गुण किती मिळतील, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना काय सांगायचे, हाच मुद्दा त्यात अधिक असतो. ‘मार्क्स’वादाचे हे विकृत स्वरुप फक्त भारतातच फोफावले आहे, अशातील बाब नाही, तर पाश्चात्य देशांतदेखील पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी हार्दिक वर्माने नेदरलँडमध्ये राहणारी त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डुडा हिच्याशी लग्न केले आहे. या दोघांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर २०२३) हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले आणि इतर वैवाहिक विधी पूर्ण केले. हार्दिक हा फतेहपूरच्या दतौली गावचा रहिवासी आहे. सुमारे 7 वर्षांपूर्वी तो नोकरीसाठी नेदरलँडला गेला होता. हार्दिकला तिथल्या एका फार्मास्युटिकल कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळाली. काम करत असताना त्याच कंपनीत काम करणारी त्याची सहकारी गॅब्रिएला त्याला भेटली.
लोकमानस, लोकभावना या निवडणुकीच्या निकालातून अगदी स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असतात. म्हणजे जिंकणार्या पक्षाची, त्या पक्षनेतृत्वाची मते, ध्येय-धोरणे यांना मतपेटीतून समर्थन दिले जाते. अलीकडे युरोपीय देशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही युरोपवासीयांनी बहुतांशी उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या पक्षांना, नेत्यांना पसंती दिल्याचे दिसून येते.
गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथील ब्रिगेड ग्राऊंडवर गीता पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ डिसेंबर रोजी होणार्या या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा देण्यात आले असून, यावेळी एका लाखांहून अधिक लोक सामूहिक गीतापठण करतील. परंतु, आता कोलकाता पोलीस आणि प्रशासनाने कार्यक्रम आयोजित करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. विविध मठ, मंदिरे आणि हिंदू संघटनांनी ’गीता पाठ समिती’ स्थापन करून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सामूहिक गीता पठणासाठी आतापर्यंत १ लाख, २० हजार लोकांनी नोंदणीही केल्याची माहित
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची सुरूवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने झाली. आयसीसी वर्ल्डकपच्या वेळापत्रकानुसार ६ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे आयोजित केला आहे.
इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यातील सामन्याने काल आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला सुरूवात झाली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पाकिस्तान आणि नेदरलँडस यांच्यात दुसरा सामना खेळविला जात आहे. नेदरलँडसच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ सर्व बाद २८६ धावा करु शकला.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँडस यांच्यादरम्यान, हैदराबाद येथे खेळविला गेला. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्व बाद २८६ धावा केल्या. या आव्हानांचा पाठलाग करताना नेदरलँडसने २०५ धावा केल्या.
१८ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर या कालावधीत मोदी सरकारकडून बोलावण्यात येणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात आपल्या देशाचे नाव फक्त 'भारत' ठेवण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात येणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमात आणि राजकीय वर्तुळात आहे. G20 साठी राष्ट्रपती भवनातील निमंत्रण पत्रांवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' लिहिलेले आहे, ज्यामुळे या अनुमानांना चालना मिळते. आता या प्रकरणावर चित्रपटापासून क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
विवेकाचे महत्त्व जाणणारा समर्थांसारखा तत्त्ववेत्ता संत क्वचितच आढळून येतो. दासबोधात व मनाच्या श्लोकांत समर्थांनी जागोजाग विवेकाचे महत्त्व सांगितले आहे. सर्व समाजाला विवेकाची शिकवण देऊन समर्थांनी त्याद्वारा लोकांना व्यवहारात आणि परमार्थसाधनेत शहाणे केले आहे.
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा घेतलेला निर्णय नेदरलॅण्डसमोरील आव्हाने वाढवणारा ठरला. सलग दुसर्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत घसरण नोंदवली गेल्याने हा देश मंदीच्या तडाख्यात सापडला आहे. संपूर्ण युरोपवर मंदीचे सावट तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था करत असलेली प्रभावी कामगिरी म्हणूनच लक्षणीय ठरते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(एनईपी) अंतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात म्हटले होते की, मातृभाषेतील शिक्षणाने भारतातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा एक नवीन प्रकार सुरू झाला असून सामाजिक न्यायाच्या दिशेनेही हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. दरम्यान, याच धर्तीवर आता स्थानिक भाषा वाचवण्यासाठी युरोपीय देशांनी शैक्षणिक संस्थांमधून इंग्रजी काढून टाकण्यास सुरुवात केल
भारतचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांने नेदरलँडमध्ये एम्सटर्डमध्ये नवीन भारतीय रेस्टॅासंट उघडले आहे. या रेस्टॅासंटचे काही फोटो रैनाने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यामध्ये तो एक रेसिपी तयार करताना दिसत आहे. तसेच तो स्टाफसोबतही दिसत आहे. तो पत्नी प्रियंका आणि मुलांसह येथील अॅमस्टरडॅममध्ये राहतो.
भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे, ते पाहता लवकरच भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार होईल. चालू आर्थिक वर्षात भारतातील मोबाइल फोनची निर्यात एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या दोन महिन्यांत मोबाईल फोनची निर्यात १२८ टक्काने वाढली आहे.
नोटबंदीनंतर बंद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटांचं नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अहमदाबादच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) च्या विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. ज्यात रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांपासून अनोख्या वस्तू बनवण्यात आल्या होत्या. या नोटांपासून साऊंड प्रूफ टाइल्स, पर्स, विटा, डायरी इत्यादी वस्तू बनवल्या गेल्या होत्या.
नवी दिल्ली : फ्रान्समधील मॉन्ट डी मार्सन लष्करी तळावर सुमारे तीन आठवड्यांच्या बहुराष्ट्रीय हवाई सरावासाठी भारत चार राफेल जेट, दोन सी-17 विमाने आणि दोन आयएल - 78 विमाने पाठवणार आहे. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने परदेशी हवाई सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी 'मूल्य साखळी विकास कार्यशाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विसावे शतक पेट्रोल आणि त्याबद्दलच्या तंट्यांचे होते. आता एकविसावे शतक पाणी आणि त्याबद्दलचे तंटे, यांनी गाजणार आहे. या दृष्टीने बघितले, तर सिंधू नदी पाणी वाटपाचा मुद्दा आज ना उद्या ऐरणीवर आलाच असता. मात्र, अशा स्थितीत दोन्ही देशांनी प्रगल्भता दाखवली पाहिजे.
आता महामारीच्या दोन वर्षांनी पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नेदरलँड या देशाने तयार केलेला नवा कायदा. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कर्मचार्यांचा अधिकार आहे. तसेच, कर्मचार्याने ठरवल्यास कंपन्यांना तो अधिकार नाकारता येणार नसल्याचे तेथील नवा कायदा सांगतो
कोरोना महामारीमध्ये आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणारे देशही कोरोनाच्या तडाख्याने पुरते कोलमडले होते. केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रालाही त्याचा जोरदार फटका बसला. भारतालाही कोरोनाचा प्रकोप प्रारंभी सहन करावाच लागला. मात्र, कालांतराने कोरोना महामारीत आपली आर्थिक बाजू आणि देशभरातील परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळण्यात आपला देश मात्र यशस्वी ठरला.
गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळातही ‘कोविड’मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुसलमान रुग्णांचे दफन न करता, दहन करावे, असा नियम श्रीलंकेत लागू करण्यात आला. त्या निर्णयाला अमेरिकेसह इस्लामिक देशातून विरोेध झाल्यानंतर श्रीलंकेने तो निर्णय रद्द ठरवला खरा; पण बुरखाबंदीच्या निर्णयाबाबत तसे होण्याची शक्यता ही धुसरच!
नुकतेच नेदरलँड्स मध्येही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याला अर्थात बुरखा घालण्याला प्रतिबंध केला आहे. बुरखा घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. इतकेच नव्हे तर तसे केले तर १५० युरोंचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.
नेदरलँडमधील एका स्टार्टअप कंपनीने गायीच्या शेणापासून ड्रेस बनवायला सुरु केले आहे
जागतिक रोग असलेल्या खड्ड्यांवर औषध नाही का, हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न पण, त्यावर औषध आहे. नेदरलँड व जर्मनीसारख्या काही देशांनी ते असल्याचे सिद्ध केले आहे.
नवी दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.