ओएनजीसी (ONGC) कंपनीच्या ३१ मार्च २०२३ मधील निव्वळ नफ्यात ७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ६४७८.२३ कोटींच्या तुलनेत ११५२६.५३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या १.६४ लाख कोटींच्या तुलनेत १.६६ लाख कोटींवर वाढ झाली आहे.
Read More
रेल्वे कंपनी आयआरएफसी (IRFC) कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला गेला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३४ टक्क्यांनी वाढ झाली होती. मार्च २०२४ कंपनीला १७१७.३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तर मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १२८५.२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आपली प्रबळ आर्थिक कामगिरी कायम ठेवली आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी वार्षिक १८.१ टक्क्यांच्या वाढीसह १,६०७.९ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए वार्षिक १०.९ टक्क्यांच्या वाढीसह ६५३.७ दशलक्ष रूपयांवर पोहोचला, तर करोत्तर नफा वार्षिक ९.५ टक्क्यांच्या वाढीसह ४५६.६ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यू २०,२६०.७ दशलक्ष रूपये आहे.
देशातील ख्यातनाम टायर कंपनी MRF ने तब्बल ३० टक्यांचा अंतरिम लाभांश ( Dividend) जाहीर केला आहे. कंपनीनुसार कंपनीने यंदा इयर ऑन इयर बेसिसवर ५ टक्यांनी ग्रोथ मिळवली असून व्यापारातून ६.५ टक्यांची महसूल वाढ प्राप्त केली आहे. नुकतीच MRF कंपनीने आपला सप्टेंबर तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे. शुक्रवारी घोषित केलेल्या या निकालात एकत्रित नफा तब्बल ३५१.७१ टक्यांनी वाढला होता जो मागील वर्षी १२९.८६ कोटी रुपये इतका होता. एमआरएफ प्रत्येक ३ म्हणजेच ३० टक्के प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.
प्रसिद्ध आयटी अमेरिकास्थित कंपनी Cognizant चा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार तिसऱ्या सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा १६.५ टक्यांनी कमी होऊन ५२.५ कोटी डॉलरपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी निव्वळ नफा ६२.९ कोटी डॉलरचा निव्वळ नफा कंपनीला झाला होता. कंपनीची मार्जिनल ग्रोथ ०.८ टक्यांनी वाढली असली तरी उत्पन्न ०.२ टक्यांने घटले आहे.
ब्लू डार्ट् एक्सप्रेस लिमिटेड, दक्षिण एशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर, एकात्मिक वाहतूक आणि वितरण लॉजिस्टीक कंपनीच्या वतीने आज मुंबई येथे आज संपन्न झालेल्या बोर्ड बैठकीत 30 सप्टेंबर, 2023 रोजीपर्यंतचे तिमाही वित्तीय निकल घोषित करण्यात आले.
युनियन बँक ऑफ इंडियाने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर हे निकाल प्रस्तुत करण्यात आले आहेत. सप्टेंबर ३०, २०२३ पर्यंतच्या तिमाहीत कंपनीला गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठा नफा झाला असून इयर ऑन इयर बेसिसवर तब्बल ९० टक्के निव्वळ नफा बँकेला झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर कासा ठेवींमध्ये देखील वाढ झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत बँकेच्या खात्याची रक्कम ११,३७, ६२८ कोटींच्या घरात गेली आहे. बँकेने रिटेल, अँग्रीकल्चर, एमएसएमई उत्पन्नात देखील वाढ दाखवली आहे. रिटेल, अँग्रीकल्चर, एमएसएमई सेक्टर
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( बीपीसीएल) ने सप्टेंबरमध्ये पुनरागमन केले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीला नफ्यात वाढ झाली आहे. जुलै सप्टेंबरमध्ये एकत्रित नफा ८२४३.५५ कोटींचा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात ३३८.४९ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. बीपीसीएलचे करापूर्वीचे उत्पन्न ११२८.२९ कोटींवर आले आहे. मागील आर्थिक वर्षात याचवेळी कंपनीला १२३.१७ कोटींचा तोटा झाला होता.
बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म टॉफलरला मिळालेल्या आकडेवारीनुसार, कॉस्मेटिक कंपनी लॉरियल इंडियाची विक्री आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात लॉरियल इंडियाचे एकूण उत्पन्न 4,993.61 कोटी रुपये होते.आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३,७३८.६९ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २,८५८.३७ कोटी रुपयांची नोंद झाल्याने गेल्या पाच वर्षांतील हा उच्चांक आहे. महामारीपूर्व आर्थिक वर्ष 2020 मध्ये तो 3,461.41 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2019 मध्ये 3,274.44 कोटी रुपये होता.
फेडरल बँकेचा Q2 निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. आर्थिक वर्ष २४ चा निर्णय आल्यानंतर फेडरल बँकेने आपली ग्रोत दाखवत मागील ७०३ कोटी नफ्याच्या तुलनेत थेट ९५४ कोटींचा नफा यंदाच्या आर्थिक वर्षात नोंदवला आहे.फेडरल बँकेचा व्यवसाय (Turnover) ४,२५,६८५ लाख कोटींचा झाला आहे.बँकेचा इतिहासात पहिल्यांदाच इतक्या त्रैमासिक नफ्याची नोंद बँकेने केली आहे.
देशातील सर्वात मोठ्या रिटेल जायंट पैकी एक अशी ओळख असलेल्या डी मार्ट चे Q2 निकाल जाहीर झाले आहेत. कंपनी अव्हॅन्यू संचलित डी मार्ट ला यंदा आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ६२३.३५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ९.९ टक्यांने निव्वळ नफा घटला आहे.गेल्या वर्षी निव्वळ नफा हा ६८५.७१ कोटी रुपये इतका होता.मागच्या त्रिमासिकात कंपनीचा नफा ५.३६ टक्यांने घटत ६५८.७१ टक्के इतका झाला होता.
सुप्रसिद्ध एफएमसीजी कंपनी इमामी ला यंदा चांगला नफा झाला आहे.डिसेंबरचा तिमाहीत नफा ५ टक्क्याने वाढून २१९.५२ कोटी झाला आहे.या आधी आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये २०८.९६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.