देशातून नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाचा विडा अमित शाह यांनी उचलला असून, त्यादिशेने आक्रमक कारवायाही सुरु आहेत. पण, शहरी नक्षलवाद्यांच्या षड्यंत्रांना सुरुंग लावण्यासाठी नागरी पातळीवरही जनजागृती करणे तितकेच अत्यावश्यक. ही बाब लक्षात घेता, अभाविपने तेलंगणमधील विद्यापीठांमध्ये शहरी नक्षलवादाविरोधात राबविलेली मोहीम परिणामकारक ठरली आहे.
Read More
( Rolo dog who campaigned against Naxalism dies in bee attack ) ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या ‘228 बटालियन’मध्ये सेवा बजावत असलेल्या ‘के9 रोलो’ हिचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दि. 27 एप्रिल रोजी तिला मृत घोषित करण्यात आले. ‘सीआरपीएफ’ जवानांनी शुक्रवार, दि. 16 मे रोजी रोलोला सन्मानार्थ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
india Naxalism या देशाला नक्षलवाद ही आतून पोखरणारी कीड आहे. नक्षलवादाने या देशाची अपरिमित हानी केली आहे. त्यामुळे, या नक्षलवादाचा पुरता बिमोड करण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला आहे. या मोहिमेत केंद्र सरकारबरोबर कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका देखील खांद्याला खांदा लावून उभे आहेत. त्यामुळे नक्षलवादाचा बिमोड अटळ आहे.
जातीय व धार्मिक तणाव वाढविण्यासोबतच विकास प्रकल्पांना विरोध आणि समाजात गोंधळ निर्माण करण्याचे काम शहरी नक्षलवादी नियोजनबद्ध पध्दतीने करीत आहेत. तीच त्यांची कार्यपद्धती आहे. शहरी नक्षलवादाची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परदेशामधून तसेच शहरी भागामधून मिळणारी आर्थिक रसद, पाठिंबा याकरिता शहरी नक्षलवादाची धोरणात्मक रचना करण्यात आलेली आहे. याद्वारे जंगलामधील घातक आणि आक्रमक विचारधारा शहरात रुजविण्याचे काम नियोजनबद्ध पध्दतीने सुरु असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.