उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील इस्लाम स्वीकारलेल्या १५ जणांची नुकतीच घरवापसी करण्यात आली. लखनौच्या गोमती नगरमध्ये, विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या सदस्यांनी शंखनाद आणि मंत्रौच्चारात या १५ जणांना हिंदू धर्मात परत आणले. घरवापसीच्या कार्यक्रमावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Read More
ग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका पुरूषाला जामीन मंजूर करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरूवार दि. २६ जून रोजी लिव्ह-इन रिलेशनशिपवर ताशेरे ओढत याचिकाकर्त्याला फटकारले आहे. उच्च न्यायालय भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) च्या तरतुदींखाली आरोपी असलेला शान आलमच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती.
चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
train attack त्तर प्रदेशातील लखनऊमधील रेल्वे ट्रॅकला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना आठवड्यातून दुसऱ्यांदा घडली असल्याचे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यावेळी बक्कस-उत्रेथिया रेल्वे ठाणेदरम्यान डाउन लाईनवर रेल्वेलाईनवर एक मोठा लोखंडी दरवाजा ठेवण्यात आला होता, ज्यात अवजड वाहनामुळे अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला आढळले की पँड्रोल क्लिपही अवजड वाहनासोबत गायब करण्यात आली होती.
Hindu उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखान पोलीस ठाणे परिसरातील औरंगाबाद गावात असलेल्या १२० वर्शे जुन्या पंच शिख मंदिरात २० वर्षानंतर पूजा करण्यात आली. प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात आणि कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रविवाकी १६ फेब्रुवारी २०२५ मंदिरात वैदिक मंत्रांचा जप करत पूजा करण्यात आली. भाविकांची मोठी गर्दी जमली आणि संपूर्ण परिसर हरहर महादेवच्या जयघोष करण्यात आला.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील लखनऊ पोलिसांनी एका समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. ते दुसरे तिसरे कोणीही नसून सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समाजमाध्यमाचे प्रभारी मनीष जगन अग्रवाल आहेत. त्यांना शांतता भंग होण्याच्या भितीने लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे.
Transgender उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये एका पीडितावर जबरदस्ती करत ट्रान्सजेंडर (Transgender) बनवण्यात आल्याची घटना समोर आली. यामुळे पोलिसांनी आरोपी ट्रान्सजेंडर कतरिनाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश पोलीस या घटनेचा खोलवर तपास करत असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
Supreme Court बुधवारी २२ जानेवारी २०२५ रोजी शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आणि संबंधित तपासणीसाठी दिलेल्या अंतरिम स्थगितीत वाढ करण्यात आली आहे. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमाप आणि के.व्ही विश्वानाथन यांच्या खंडपीठाच्या मशीद समितीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर हा आदेश दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Chandan Gupta Firing उत्तर प्रदेश लखनऊच्या एनआयए न्यायालयाने चंदन गुप्ता हत्याकांडातील दोषींना शिक्षा सुनावणी आहे. एनआयएन न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधीही संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता उत्तर प्रदेशातील कासगंज येथे २६ जानेवारी २०१८ रोजी चंदन गुप्ता यांची हत्या करण्यात आली होती. तब्बल ७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Luknow उत्तर प्रदेशातील लखनऊच्या (Luknow) नीलमाथा येथील मंदिरात बसवण्यात आलेली दुर्गा मातेची मूर्ती चोरट्यांनी तोडली आहे. दुर्गा मातेचे हात कापले गेल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने भाविकांनी घटनास्थळी मंदिरात धाव घेतली. याप्रकरणी परिस्थिती पाहता प्रशानाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. लोकांचा संताप पाहून पोलिसांनी अज्ञतांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाचे नेते, वीरेंद्र बहादूर पाल यांच्या विरोधात, वकील महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
कट्टरपंथी युवकाने लखनऊ स्थित एका मंदिराच्या भितीवर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर त्याला रोखणाऱ्या दिलीप सिंह या हिंदू युवकाला जबर मारहाण करत त्याला रक्तबंबाळ केली आहे. त्याच्या घरात घुसून रॉडने हल्ला करत मरणासन्न अवस्थेत सोडून दिले. या प्रकरणात पोलीस तक्रार झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अकबर नगरमध्ये दि. १८ जून २०२४ रोजी रात्री बेकायदेशीररित्या बांधलेल्या मशिद, मदरसे आणि मंदिरे उद्धवस्त करण्याची कारवाई करण्यात आली. रात्री १२.३० ते ३.३० पर्यंत ८ बुलडोजरना कारवाईच्या कामात लावण्यात आले होते. हे संपुर्ण न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे. कारण याठिकाणी रिव्हर फ्रंट बांधण्यात येणार आहे. लखनऊमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून याबाबतची माहिती देण्यात आली आणि तेथील वाहतूकही बंद करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर दि. ८ जून २०२४ रोजी मध्यरात्री ३.३० वाजता भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप लागल्यामने हा अपघात झाल्याची माहिती आहे. तरी या अपघातात भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक लोक जखमी आणि २ जणांचा मृत्यू झालेला आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मुस्लीम महिला सबा नाज आणि तिच्या दोन मुलांना सलीम पन्नी नावाच्या कट्टरपंथीने त्याच्या पाच ते सहा साथीदारांसोबत घरात घुसून जबर मारहाण केली. आई सबा आपल्या दोन मुलांसोबत राजकीय गप्पा मारत होती. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ निवडून येणार, असा विश्वास सबा नाज यांनी व्यक्त केला होता. दरम्यान त्यांचा हा संवाद बाहेरून जाणाऱ्या सलीमने ऐकला आणि त्याला संताप अनावर झाला. तो आपल्या सहा ते सात मित्रांसोबत एकटी असलेल्या सबाच्या घरी शिरला.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. येथे बेपत्ता मौलानाच्या तपास करत असताना पोलिसांना मौलाना त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत सापडला. मौलाना बेपत्ता झाल्याची एफआयआर त्याच्या दोन पत्नींनी दाखल केली होती. मौलानाला तीन बायका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मौलानाला गोंडा येथून सुखरूप शोधून काढले.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा योगींचा बुलडोझर फिरला आहे. लखनौ विकास प्राधिकरण (एलडीए), लखनौ महानगरपालिका आणि पोलिसांनी लखनौच्या अकबरनगरमधील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरची कारवाई सुरू केली.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मदरशात शिकवणाऱ्या मौलानाने विद्यार्थ्यांनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी अवघ्या ८ वर्षांची आहे. मौलाना आबेदीनचे मुलीच्या आईशीही अवैध संबंध असल्याचे बोलले जात आहे. पीडितेच्या आईलाही आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराची माहिती होती, असा दावा केला जात आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी मौलाना आणि त्याच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
"संघ आणि स्वयंसेवकांना स्वत:साठी काही करायचे नसून त्याच्यासाठी देश सर्वप्रथम आहे."; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. रा.स्व.संघाच्या कानपूर महानगरातील शाखा स्वयंसेवकांचे एकत्रिकरण नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. (RSS Nation First Dattatreya Hosbale )
उत्तर प्रदेशच्या बागपतमधील महाभारताशी संबंधित लाक्षागृहा आणि बदरुद्दीन शाह मजारच्या वादाप्रकरणी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. हिंदूंना १०० बिघा जमिनीचा (६१.९ एकर) हक्क दिला असल्याचे मंगळवारी बागपत एडीजे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात न्यायालयाने हिंदू पक्षाकडील १० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती. गेली ५३ वर्ष न्यायालयात खटला सुरू होता. (Baghpat Lakshagruh Hindu)
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून भक्तीचा महापूर आला असून, रामललाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अशा स्थितीत रामललाच्या जन्मस्थानी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि तेथे राहणाऱ्या लोकांना कोणतीही सुविधा मिळण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (NHAI) ६८ किलोमीटर बायपासची योजना बनवली आहे.
अयोध्येत भव्य राममंदिरात प्रभुश्रीरामचेंद्रांचा बहुप्रतिक्षीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची संपुर्ण भारतीय आतुरतेने वाट पाहात होते. भारतभर त्यासाठी गेले १ ते २ महीने जोरदार तयारी केली जात होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य उपस्थीतीत हा सोहळा पार पडला.
लग्नाच्या बहाण्याने एका मुलीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून उघडकीस आली आहे. अफिफुल्ला असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला पूजा करण्यापासून रोखण्यात आले. तिला मौलवीकडे नेण्यात आले. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी पीडितेला मारहाण केली.
अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीच्या कपाळावर सूर्याची किरणे पडणार असल्याची माहीती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. दरवर्षी एका विशिष्ठ दिवशी सुर्य़ाची किरणे प्रभू श्री रामचंद्रांच्या मुर्तीवर पडतील अशा प्रकारे राममंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. २४ जानेवारीपासुन राममंदिर सर्व भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यानंतर अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानिमित्ताने भाविकांसाठी सोयीसुविधा करण्याच काम सरकारकडून केले जात आहे.
येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या सोहळ्याची भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत राम मंदिरावर १६१ फूट उंचीवर धर्मध्वज फडकवला जाणार आहे. मंदिराची उंची १६१ फूट इतकी आहे. त्यावर ४४ फूट उंच ध्वज फडकवला जाणार आहे.
अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण भारतात उत्साहाच वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडणार आहे. २४ जानेवारीपासुन सर्व भारतीयांसाठी मंदिर खूले केले जाणार आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. भारतभर त्यासाठी उत्साहाच वातावरण आहे. २४ जानेवारीला राममंदिर सर्व भाविकांसाठी खूले करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थीत राहणार आहेत. अयोध्येत राममंदिर बनल्यानंतर तेथील अर्थव्यवस्थेत मोठ्याप्रणाणात बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी भव्य सोहळ्याची जोरगदार तयारी सुरू आहे. भव्य राममंदीरीच्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदीराच्या वैशिष्ठांची माहीती दिली आहे. ट्रस्टच्या अधिकृत 'एक्स' अकांउंट वर पोस्ट करत ही माहीती देण्यात आली आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराममंदीरीत विराजमान होण्यासाठी मूर्ती निश्चित करण्यात आली आहे. ही मूर्ती आपल्या देशाचे प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी केली आहे. ते मुळचे कर्नाटकचे आहेत.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राममंदीराच्या सन्मानार्थ प्रयागराजच्या अनामिका शर्माने आकाशातून १३ हजार फूट उंचीवरून राम मंदिराचा ध्वज घेऊन उडी मारली.
राममंदीराच्या उद्धाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. २२ जानेवारीला रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. एकीकडे भारतभर उत्साहाच वारावरण आसताना दुसरीकडे संजय राऊत सोहळ्याच्या निमंत्रणावरुन रोज सरकारवर टीका करत आहेत. त्यांना रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिले आहे.
लखनौ : अयोध्येतील राम मंदीराचे २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत रामललांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललला ज्या पाण्याने अभिषेक केला जाईल ते पाणी नेपाळच्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले आहे.
अयोध्येतील रेल्वे स्थानकानंतर आता यात्रेकरुंच्या सुविधेसाठी बनवण्यात आलेल्या विमानतळाचेही नामकरण करण्यात आले आहे. अयोध्येतील विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे नाव देण्यात आले आहे.
अयोध्येत श्रीराममंदीराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतभर त्यामुळे उत्साहाच वातावरण आहे. अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्याधाम असे करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये आधुनिक सुविधांनी सज्ज अशा रेल्वे स्थानकाचे काम पुर्ण झाले आहे. काही दिवसांपुर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी अयोध्या जंक्क्षन चे नाव अयोध्याधाम जंक्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज यांनी बाळासाहेबांचा आत्मा आज रडत असेल. त्यांचा स्वतःचा मुलगा सोनिया चरणी लीन झाला अस वक्तव्य केल आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. राममंदीराच्या उभारणीत महाराष्ट्राच्या लोकांच मोठ योगदान आहे. असही ते यावेळी म्हणाले.
२२ जानेवारीला अयोध्येत राममंदीराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतभर त्यानिमीत्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स च्या अहवालानुसार राममंदीर उद्घाटन सोहळ्यामुळे देशभरात २२ जानेवारीला ५०,००० कोटी रुपयांचा अतिरीक्त व्यापार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘काळ्या चिमणीची राख फुंकल्याने तुमचे प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर अधिक प्रेम करू लगतात,’ असा संवाद आपण एका चित्रपटात ऐकला असेल किंवा २१ नखांचे कासव घरात ठेवल्याने धनलाभ होतो, अशा या काही सुखावणार्या असल्या तरी शेवटी अंधश्रद्धाच!
विविध पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यातून प्राप्त होणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी करण्याच्या आरोपाखाली ९ कंपन्यांविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एफआयआर नोंदविण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लखनऊमध्ये एका कट्टरपंथीयाने आपली ओळख लपवून एका हिंदू महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ बनवून शारिरीक शोषण केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील माजी मंत्री आणि लखनौ शहर पूर्वेतील भाजप आमदार आशुतोष गोपाल टंडन यांचे दि.९ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात बरेच दिवस उपचार सुरू होते. आशुतोष गोपाल टंडन हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे पुत्र होते. योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते नगरविकास मंत्री होते. या दिवसांत ते पूर्व लखनौचे आमदार होते. या वर्षी जुलै महिन्यात त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
अयोध्येत राम मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्याआधी ५ नोव्हेंबरला एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिरात ५ नोव्हेंबरला अक्षत पूजा होणार आहे. या अक्षत पूजेमध्ये १०० क्विंटल तांदूळ, एक क्विंटल हळद आणि एक क्विंटल देशी तूपाची पूजा केली जाणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात देवी जागरण कार्यक्रमादरम्यान काही कट्टरपंथीयांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. स्टेजवर भजन गात असलेल्या दोन व्यक्तींवर २ कट्टरपंथी मुलींनी काळे कपडे फेकले. त्यासोबतच गायकाचा माईक हिसकावून ‘इस्लाम झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
https://sangraha.net/s90/NBImages/12021/2023/10/25/kashi_202310251414334366.jpg
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. तिच्यावर पतीचा लहान भाऊ आणि मेव्हण्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जात होता. तिच्या सासरच्या मंडळींना तिला वेश्याव्यवसाय करायला लावायचे होते. असे आरोप पीडित महिलेने केले आहेत.
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आंतरधर्मीय लिव्ह-इन जोडप्याची पोलिस संरक्षणाची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. विरुद्ध लिंगाच्या आकर्षणामुळे असे संबंध प्रामाणिकपणाशिवाय तयार होतात, जे अनेकदा केवळ मनोरंजनात बदलतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती मोहम्मद अझहर हुसैन इद्रीसी यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले की, न्यायालय दोन महिन्यांच्या कालावधीत आणि तेही २०-२२ वर्षांच्या वयात अशी अपेक्षा करू शकत नाही की, दोघेही आपल्या नात्याबद्दल गांभीर्याने विचार कर
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका हिंदू कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आग्रा पोलिसांनी आतापर्यंत एकूण ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. सलुद्दीन, जाहिल, नाजिम, हसिम आणि फाजील अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी (२० ऑक्टोबर २०२३) त्यांच्या घरातील मुली, ज्या नवरात्रीच्या काळात माँ दुर्गा पूजा करण्यासाठी जात होत्या, त्यांच्यावर ११ कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी पीडितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका सरकारी शाळेत विद्यार्थिनींना नमाज शिकवण्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या विभागीय तपासात ३ कर्मचारी दोषी आढळले आहेत. शाळेच्या प्रभारी मीरा यादव यांना निलंबित करण्यात आले. सहायक शिक्षिका तहजीब फातिमा आणि शिक्षामित्र ममता मिश्रा यांच्यावर विभागीय कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी (२१ ऑक्टोबर २०२३) या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. याप्रकरणी हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशात परदेशातून निधी घेणाऱ्या आणि बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या आणि कट्टरवादाला प्रोत्साहन देणाऱ्या मदरशांवर योगी सरकार कडक कारवाई करत आहे. या मदरशांना मिळालेल्या निधीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.