'कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Read More
लातूर जिल्ह्यात बोरगावात लातूर वैद्यकीय महाविद्यालाच्या आवारात किशोर कदम या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण न्यायालयात न टिकल्याने त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नजीक उपस्थित व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयात स्थगिती आणण्यात आली आहे. यामुळे नैराश्येत जाऊन त्याने हे पाऊल उचलले आहे.
पश्चिम बेंगॉलच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांना घालण्यासाठी दिग्दर्शक शुभो बासु नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटाद्वारे सज्ज झाले असून त्यांच्या या चित्रपटाचं पहिलं चित्रीकरण सत्र नुकतचं पूर्ण झालं. येत्या ७ नोव्हेंबर पासून या चित्रपटाचं दुसरं चित्रीकरण सत्र कोलकाताच्या विस्तीर्ण सौंदर्य संपन्न विविध ठिकाणी सुरु होत आहे.