एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह (धनुष्यबाण) देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये सुनावणी करणार आहे.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने मानसिक छळातून आत्महत्या केल्याने राज्यभरात त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली असून शपथविधीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी आजपर्यंत अनेक खाती सांभाळली आहे. आता जे काही खाते मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी शनिवार, दि. ३ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली असून त्यासाठी त्यांनी नुकाच आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. सोमवार, १७ मार्च रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २७ मार्च रोजी मतदान पार पडेल.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
कुणीही कुणाला खंडणी मागितल्याचे कानावर आल्यास त्याच्यावर मकोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
अगदी काही महिन्यांपूर्वीच गुलाल उधळणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र निलेश लंके यांचा लोकसभेचा विजयी गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना सपशेल नाकारले. लंके यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार पीआर केल्याने आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जोरावर विजयी झालेल्या खासदार नील
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात बारामतीच्या प्रगतीसाठी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे वरुण सरदेसाई मैदानात असतील.
( NCP) विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून, अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची, तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ईडीच्या पीएमएलए कायद्यांतर्गत वरळीतील सीजे हाऊसमधील त्याच्या मालकीच्या १२व्या आणि १५व्या मजल्यावरील फ्लॅटची अटॅचमेंट रद्द केली. जप्त केलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये आहे. ईडीने २०२२ मध्ये ही मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पीएमएलए प्रकरणाबाबत या जप्तीच्या कारवाईविरोधात सेफेमा न्यायाधिकरणात अपील केले.
महाविकास आघाडीत सांगली आणि मुंबईच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु असतानाच आता काँग्रेसच्या परस्पर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने भिवंडी ( Bhiwandi Loksabha ) मध्ये आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे या जागेवरुन पुन्हा काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. भिवंडीतुन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे यांनी अपक्ष निवडणुक लढवणार असल्याचं म्हणलं आहे.
शरद पवार यांच्या पक्षाने निवडणुकीमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर हा न्यायालयीन मुद्दा आहे, असे अस्वीकरण राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व जाहिरातींमध्ये द्यावा, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. याबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन केले नाही असा आरोप शरद पवार यांच्यातर्फे करण्यात आला होता.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ चिन्हाविषयी ते तात्पुरते असल्याचे अस्वीकरण न देताच वापरल्याचा आरोप करून शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. घड्याळ चिन्हाचा वापर हा न्यायालयीन मुद्दा आहे, असे अस्वीकरण राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व जाहिरातींमध्ये द्यावा, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. याबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन केले नाही असा आरोप शरद पवार यांच्यातर्फे करण्यात
शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत असून आढळराव पाटील यांना शिरुरमधून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारीवाला माणुस हे चिन्ह मिळालेलं आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलेलं असून शरद पवार गट आता येत्या निवडणुकीत या चिन्हावर निवडणुक लढवणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता शरद पवार गटाला चिन्हही बहाल करण्यात आले आहे.
बाबा सिद्दिकी यांनी सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने त्यांचे सुपुत्र झिशान यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून दूर केले आहे. त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.झिशान सिद्दिकी हे वांद्रे (पूर्व) मतदारसंघाचे आमदार आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिशान यांच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यामुळे ते सुद्धा राष
केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटास दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह यासाठी निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जाणार होता. दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे अजित पवार गटाने ट्विट करत 'आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!' असे म्हणटले आहे.
आमच्या वकीलांनी उत्तमपणे बाजू मांडली. तरी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. पण २३ राज्यातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या बाजूने आहे. तसेच सर्वाधिक पदाधिकारी शरद पवारांकडे असल्याचे पाटलांनी सांगितले. २ जुलै २०२३ अजित पवारांनी आपल्याच काकांविरुध्दचा बंडाचं रणशिंग फुकंलं. आणि अजित पवार आपल्या ९ आमदारांसह फडणवीस- शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या
दि. ३१ जानेवारी २०२४ रात्रीचे ९.०० वाजले होते. तेवढ्यात माध्यमांवर तीन बातम्या थोड्याफार वेळेच्या फरकाने प्रसारित झाल्या. एक म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दुसरी बातमी म्हणजे, चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. आणि तिसरी बातमी म्हणजे ईडीकडून हेमंत सोरेन यांना अटक! या तीन बातम्यांनी संपुर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यामुळे हेमंत सोरेन यांना अटक का झाली? चंपई सोरेन कोण आहेत? हेमंत सोरेन यांनी पदाचा राजीनामा का दिला? झारखंडमधील प
महाराष्ट्रात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)च्या साथीने जोर दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो. मात्र, राज्यातील या तिन्ही पक्षांची सद्यःस्थिती लक्षात घेता, येथेही काँग्रेसच्या हाती शून्यच येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे एकूणच राहुल गांधींच्या यात्रेच्या दुसर्या टप्प्याची वात पेटण्याआधीच विझली असल्याचे दिसते.
जितेंद्र आव्हाडांनी रामाचा अपमान केला नाही अस म्हणत. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी "राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात राहणारा माणुस शाकाहारी कसा असु शकतो" असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भारतभर हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्य़ा. देशभरातून त्याचा हिंदूंनी तीव्र शब्दात निषेध केला होता
राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता अस वादग्रस्त विधान केल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठीकठीकाणी आंदोलने केली जात आहेत. यामूळे हिंदूंच्या भावना दूखावल्या गेल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाराष्ट्रात निदर्शने केली जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दि. २४ डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या नेत्यांविरोधात उघड उघड बंड पुकारतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांचे लक्ष पुणे जिल्ह्यात जास्त आहे. पुण्यात कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. आणि त्यानंतर अमोल कोल्हेंचे राजकीय भवितव्य धोक्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिरुर मतदारसंघातील राजकारण?मतदार संघाचा इतिहास? २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील स्थिती?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर तयार करण्यासाठी २५ कोटी रुपयांची आवश्यकता होती, परंतु त्यांच्या विनंतीवरून गौतम अदानी यांनी तातडीने २५ कोटी रुपयांचा धनादेश पाठवला.
इंडीया आघाडीचे मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खुप फरक आहे. आणि जनता मोदींनाच निवडेल अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक २२ डिसेंबर ला पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना त्यांनी हे मत व्यक्त केल आहे.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेमुळे चर्चेत होते. पण आता रोहित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव असलेले पोस्टर दिसत आहे. दरम्यान रोहित पवार समर्थकांनी खातं हॅक झाल्याचे तिथेच कमेंटमध्ये सांगितले आहे.
मराठा समाजाला आरक्षण न देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार हरीभाऊ बागडे यांनी केला आहे. तसेच लोकांची गरिबी ही काँग्रेस-राष्ट्रवादीची वोट बँक आहे, असा घणाघातही त्यांनी केला. गुरुवारी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
नवाब मलिक आजारपणाचा खोटा आव आणुन कोर्टाची फसवणुक करत आहेत असा आरोप मोहीत कंभोज यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या 'एक्स' अकांउंटवर विडीओ पोस्ट केला आहे. येथुन सुरु झाला नवाब मियॉंचा फर्जीवाडा अस शिर्षक त्यांनी या विडीओला दिले आहे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शरद पवार गटाला दणका दिला आहे. सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
पुणे: अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल शुक्रवारी कर्जत येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन सभेत अनेक गौप्यस्फोट केले होते त्याला शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर जोरदार युक्तीवाद सुरू असताना, येत्या काही दिवसांत राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भातील सुनावणीलाही सुरुवात करणार आहेत. त्यासंबंधीचे वेळापत्रक तयार करण्याचे काम विधिमंडळ सचिवालयाकडून सुरू आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांची महाराष्ट्र प्रदेश `समन्वयक` पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी याबाबत घोषणा केली.
दि. १० जून २०२०. राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन पुण्यात साजारा होत होता. ह्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ह्याचं कार्यक्रमात फुले पगडीचा स्वीकार करायच्या सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला शरद पवार, भुजबळांनी पुणेरी पगडी घातली आणि नंतर फुले पगडीचं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. मग छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी शरद पवारांनी घातली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसींचा आहे, असा प्रयत्न शरद पवारांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी अजित पवार गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा युक्तीवाद शरद पवार गटातर्फे गुरुवारी करण्यात आला आहे.
"शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही. काही लोकांनी राजकारणात आल्यापासून किती पक्ष बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये." अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांवरील होऊ घातलेल्या नियुक्त्या पुन्हा एकदा रखडल्या आहेत. परवा झालेल्या भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या समन्वय बैठकीनंतर नियुक्त्यांबाबत निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नावे न दिल्याने पुन्हा एकदा विधिमंडळ समितीच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले सर्वाधिक आमदार हे आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्हावर आमचाचा हक्क आहे; असा युक्तीवाद राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाकडून सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्कावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला हक्क सांगितला असून याप्रकरणी आता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी ही सुनावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे, याविषयी शरद पवार आणि अजित पवार गटाच्या दाव्यावर उद्यापासून (६ ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली आहे. तसेच येत्या ७२ तासांत प्लांट बंद करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर बारामती अॅगोने न्यायालयात धाव घेतली. आणि आता रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. बारामती अॅगोबाबत ६ ऑक्टोंबर पुढील सुनावणी होणार आहे. तसेच ६ ऑक्टोंबर पर्यत बारामती अॅगोवर कारवाई नको,असे मुंबई हायकोर्टाने सांगितले आहे.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यासाठी इंडीया आघाडीच्या नावाखाली विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यातच इंडीया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपावरुन मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह महायुतीतील घटक पक्षांची संयुक्त आढावा पार पडणार असून, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी या बैठका आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. या बैठकांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महायुती समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ, भाजप प्र
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून बीड येथील जाहीर सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी भाषणात म्हटले की, 'एकच वादा, अजितदादा असा उल्लेख करतानाच मुंडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील जनेतला वादा करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. तसेच, बीड जिल्ह्याच्या अनेक विकामकामांना गती दिलीत, असेही मुंडे म्हणाले.