सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या, जीवनातील संकटे ही संधी समजून त्या संकटांवर मात करत आपले कर्तृत्व सिद्ध करणारा, नौकेत बसून पाण्याला जसे झपाझप कापावे, तसे जीवनध्येय गाठताना वाटेतील अडचणी कापणारा आणि मनातील भीतीवर मात करण्यासाठी खास करून नौकानयन क्रीडा प्रकार निवडणारा भारताचा नौकानयन प्रकारातील एकमेव ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याचा हा जीवनप्रवाह...
Read More
न्यायदेवतेची सेवा करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन तोच वसा पुढे नेणारे, देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडत अनेकांना खडी फोडण्यास पाठविणारे नाशिकमधील असामान्य कर्तृत्व म्हणजे सरकारी वकील अजय मिसर. त्यांच्या कर्तृत्वामुळे गुन्हेशाबितीकरण दरात आजमितीस नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा परामर्श घेणारा हा लेखप्रपंच.
भारताच्या नकाशावर उगवत्या सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पूर्वांचलमध्ये काश्मीरसारखी समस्या निर्माण होऊन हा प्रदेशदेखील विविध विवंचना आणि समस्या यांनी ग्रासला जाऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दूरदृष्टीचा विचार केला आणि आपल्या येथील कार्याचा आदर्श वस्तुपाठ आजमितीस समाजासमोर उभा केला आहे.
आज बाबांच्या ९६ व्या स्मृतिदिनी त्यांची संघ व भा. म. संघावरील अविचल निष्ठा, स्थितप्रज्ञ वृत्ती व संघटन कौशल्य याचे स्मरण करणे औचित्याचे ठरेल!! त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरपूर्वक नमन!!
आध्यात्मिक नगरी, द्राक्ष पंढरी, कुंभ नगरी अशा कितीतरी विशेषणांनी नाशिकची ओळख आजवर भारतासह जगातील इतर देशांना झाली आहे. अपवादाने कोणी तरी येथील एचएएल, करन्सी नोट प्रेस, तोफखाना केंद्र अशा आस्थापनांचा परिचय करून देत हेही नाशिकच आहे, असे सांगताना दिसते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून नाशिक भारतीय संरक्षणदलासाठी केंद्र ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
लोकाभिमुख आणि विकासाभिमुख अशी भाजप सरकारची आजवरची वाटचाल आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत भाजपचा जाहिरनामा हादेखील लोकसहभागातून साकार करण्याचे भाजपचे धोरण असून, त्यासाठी ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या उपक्रमांतर्गत ‘सूचना पेटी’ साकारण्यात आली आहे.
नाशिक वन्यजीव विभाग हा दि. १२ नोव्हेंबर १९९३ रोजी कार्यान्वित झाला. आजमितीस या वन्यजीव विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिशचंद्रगड अभयारण्य, जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्य आणि धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक या रेल्वे मार्गावर लवकरच लोकल ट्रेन धावण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात किंबहुना अवघ्या महाराष्ट्रात मराठा विद्या प्रसारक समाज संस्था माहीत नाही, असे कोणी असणे दुरापास्तच आहे. आजमितीस संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल ही अत्यंत सक्षमपणे सुरू आहे. त्याचे संपूर्ण श्रेय हे नीलिमाताईंच्या निःस्पृह आणि कुशल नेतृत्वाला आणि संस्थेतील सभासदांच्या त्यांच्याप्रती असणाऱ्या विश्वासाला दिले तर वावगे ठरणार नाही.
तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी ७ वाजता निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिक शहर व परिसरातील उद्योगांना जागतिक व्यासपीठ प्राप्त व्हावे, तसेच, जगातील उद्योगांना नाशिकची बाजारपेठ खुली व्हावी यासाठी नुकतेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर संस्थेच्या माध्यमातून जगातील तब्बल २१ देशांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
बदलापूर येथील ‘आधार’ ही संस्था मतिमंद मुलांसाठी काम करते.
राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी असणाऱ्या दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे वाचकांना विचारशील व उपक्रमशील करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याच संकल्पनेतून सध्या नव्याने चर्चेत आलेल्या ‘शहरी माओवादाचे संकट’ या विषयावर नाशिक येथे कॅ. स्मिता गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची चर्चा बुधवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमांवर पसरली होती.
प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणाची होणारी हानी टाळणे, गृहिणींचे आरोग्य रक्षण अशा अनेक बाबी या एका योजनेमुळे साधणे सहज शक्य झाले आहे. या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण योजनेची कार्यफलनिष्पत्ती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातही पाहावयास मिळते.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एल्गार मोर्चा हा सरकारच्या विरोधात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे रोको आंदोलन देखील सरकारच्याच विरोधात आहे. त्यामुळे एल्गार मोर्चाला सहकार्य करण्यासाठीच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.