(Covid Vaccine) कोरोनानंतर प्रौढांमध्ये अचानक वाढलेल्या मृत्यूंबाबत आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या विस्तृत अभ्यासाचा हवाला देत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read More
मुंबईतील कोविड रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविडविषयक आढावा बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २ जून रोजी ही बैठक संपन्न झाली
संपूर्ण जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा जागा होताना दिसतो आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुंबईतही दोन संशयित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
'World Health Organization’ने नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले. महामारी नियंत्रणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार तयार करण्याबाबतचा प्रस्ताव या संघटनेने अंतिम केला आहे. या कराराचा उद्देश भविष्यातील साथरोगांचा धोका ओळखून, त्यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जागतिक सहकार्याची नवी चौकट निर्माण करणे हा आहे. या मसुद्यात प्रभावी लसीकरण, वैद्यकीय संशोधन, माहितीचे पारदर्शक आदानप्रदान आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांतील समन्वय यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, या प्रस्तावाची वेळ, स्वरूप, आणि त्यामागची ऐतिहास
बायडेन प्रशासन आपल्यावर दबाव आणत होते. कोव्हिड काळातील माहिती दडपण्यासाठी मेटावर दबाव टाकण्यात आला, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पत्रात नमूद केले आहे.
चीन विस्तारवादी देश आहे, यात काही शंका नाही. चीन दुसर्या देशांचे भूभाग हडपण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. चीन जमिनी चोरतो, हे सबंध जगाला माहीत होतेच, मात्र आता याच चीनमध्ये चक्क मृतदेह चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन, इस्रायल-‘हमास’ आणि अझरबैजान-आर्मेनिया हे तीनही संघर्ष मध्य आशिया प्रांताच्या अवतीभवतीच घडत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन आणि अझरबैजान-आर्मेनिया हे संघर्ष तर सोव्हिएतोत्तर देशांमध्येच सुरू आहेत. यामागे सोव्हिएत काळातील सदोष सीमा-आखणी आणि विविध वांशिक-धार्मिक गटांविषयीची चुकीची धोरणे, ही पार्श्वभूमी आहे. तसेच सीमा-वाद आणि भाषिक-वांशिक संघर्ष मध्य आशियातही आहेत. अशाप्रकारे लष्करी बळाच्या जोरावर प्रस्थापित सीमांमध्ये केलेले बदल संपूर्ण युरेशियन प्रांतालाच हादरवून टाकणारे आहेत.
प्रवास विमा तुमच्या प्रवासादरम्यान विविध जोखीमांपासून संरक्षण देतो आणि तुमचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी फायदेशीर ठरतो. प्रवासादरम्यान सामानाची चोरी, वैद्यकीय आणीबाणी, प्रवासादरम्यान अपघात, पासपोर्ट हरवणे, उड्डाण विलंब किंवा उड्डाण रद्द होणे इत्यादी सर्व प्रकारच्या परिस्थितीत या विम्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. म्हणूनच नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास विम्याजवळ माहिती असणे आवश्यक आहे.
जगात कोरोनाने दोन वर्षांपूर्वी धुमाकूळ घातले होते. संपूर्ण जगास वेठीस धरणाऱ्या कोरोनाने विदेशात पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात १ महिन्यात कोरोनाची तब्बल १५ लाख नव्या केसेस समोर आल्या आहेत. याची सर्वसाधारण टक्केवारी पाहिली तर जवळपास ८० टक्के असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील सेंट्रल बँकिंगने 2023 साठीचा 'गव्हर्नर ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान केला आहे. सेंट्रल बँकिंग हे एक जर्नल आहे. महागाई व्यवस्थापन, कोविड-19 महामारी आणि जागतिक संकटाच्या काळात भारतातील बँकिंग प्रणाली उत्तम प्रकारे हाताळल्याबद्दल शक्तिकांत दास यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड हे येत्या मे महिन्यात भारत दौर्यावर येणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच दौरा असेल. तत्पूर्वी त्यांनी भारताविषयी अभ्यास करून गृहपाठ पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. खास याकरिता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ‘ग्राऊंड वर्क’ सुरू केले आहे. प्रचंड यांचा भारत दौरा अनेकदा पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी गुरुवार, दि. 20 एप्रिलपर्यंत भारत दौर्यावर येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर शु
विशेष प्रतिनिधी करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव - अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संवाद साधला.
राज्यासह देशात कोरोनाचा धोका वाढत असताना, केंद्र सरकारने युध्द पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक होणार आहे. केंद्र सर्व राज्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-१९ आढावा बैठक घेईल. १०-११एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन करण्यात येणार आहे.
चीन मात्र व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून जगाला जवळ आणत आहे, हा चीनचा संदेश फसवा आहे. यात जगात शांतता नांदण्यापेक्षा अमेरिकेचे नाक कापून चीनच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचा उद्देश आहे. शी जिनपिंग यांनी आपला शांततावादी हात पुढे केल्याने अमेरिकेच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
मागील १० दिवसांमध्ये मुंबईत सक्रिय कोविड प्रकरणांमध्ये ९६ टक्क्यांनी वाढ झाली असून पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ मार्चपर्यंत शहरात ४७ सक्रिय प्रकरणे होती. १० मार्चपर्यंत ९२ झाली. तसेच मार्चच्या पहिल्या १० दिवसांत १२१ प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजे दररोज सरासरी १२ प्रकरणे. तर, १९ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, दररोज सरासरी पाच प्रकरणे होती.
विकसनशील देशांना कर्जमाफी देण्याच्या ‘जी २०’ देशांच्या प्रयत्नांत चीन सहभागी होण्यास फारसा उत्सुक नाही. अशी कर्जमाफी दिली नाही तर या देशांमध्ये चीनविरोधातील रोष अधिक तीव्र व्हायचा आणि दिली तर चीननेच दिलेल्या कर्जाचा चीनभोवती गळफास बसायचा अशी विचित्र अवस्था झाली आहे.
श्रीलंकेच्या संकटाचा संपूर्ण मालदीववर गंभीर परिणाम झालेला दिसतो. कारण, या दोन देशांची बाह्य आणि संरचनात्मक आर्थिक वैशिष्ट्ये जवळपास सारखीच आहेत. दोन्ही देश जागतिक चलनवाढ, ‘कोविड-19’ साथीच्या रोगाचा प्रभाव आणि रशियाचे युक्रेनवरील आक्रमण यामुळे अडचणीत सापडले आहेत. दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणे, वाढलेले व्याज आणि कर्जाचा बोजा, जास्त खर्चासह कमी महसूल, पर्यटनावर जास्त अवलंबित्व आणि कमी निर्यात महसूल यामुळे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था फार मजबूत नाही. त्यामुळे श्रीलंकेच्या संकटाचा थेट परिणाम मालदीवच्य
भारताच्या युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम (यूआयपी) चा समावेश करणारा एक नवीन CoWIN प्लॅटफॉर्म सप्टेंबरच्या मध्यात प्रायोगिक पद्धतीने लॉन्च केला जाणार आहे.
यावेळी महाराष्ट्राचे तत्पर पोलीस आणि आरोग्यमंत्री काय करत होते? कोरोनाग्रस्त मुख्यमंत्र्यांसोबत इतकी लोकं असताना त्यांना का रोखले नाही? कोरोना नियमांचा भंग केला म्हणून आरोग्यमंत्री यावर काही कारवाई करतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
मागच्या २४ तासांमध्ये भारतात १२,७८१ नवीन कोरोना रुग्ण सापडले. दैनंदिन सकारात्मकतेचा दर ४ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
बहुसंख्य शाळकरी मुले त्यांच्या शाळेवर एक अशी जागा म्हणून अवलंबून असतात की, जिथे त्यांना त्यांच्या समवयस्क मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, मैत्रीपूर्ण संबंध जोपासणे, एकमेकांच्या समस्या व्यक्त करणे, त्यातून एक सर्वसामान्य उत्तर शोधणे शक्य होते.
सध्या ‘क्वाड’ गटाच्या शिखर संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी जपानच्या दौर्यावर असल्याने चीनला मिरच्या झोंबणे तसे साहजिकच. परंतु, गेल्या आठवड्यात बुद्धपौर्णिमेनिमित्त नरेंद्र मोदी यांनी केलेला छोटा नेपाळ दौराही चीनला एकप्रकारे मोठा संदेश देणारा ठरला, असे म्हणता येईल. तेव्हा, मोदींच्या नेपाळ दौर्यामागील विदेशनीतीची समीकरणे उलगडणारा हा लेख...
युक्रेनमधील युद्धाचे निमित्त करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील धान्यविक्रेते भारतातून गहू खरेदी करून त्याची भारताबाहेर साठवणूक करून त्यातून नफेखोरीच्या प्रयत्नात आहेत.
केवळ नफा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता रुग्णसेवा करण्याच्या हेतूने अंबरनाथ येथील ‘विजय मल्टिस्पेशालिटी रुग्णालया’ची स्थापना करण्यात आली.
''आमच्या देशात कोरोना नाहीच. त्याचा आमच्या भूमीत प्रवेशही केवळ अशक्य!” अशा बाता मारणारा उत्तर कोरिया हा देश तापाने फणफणला आहे. या तापाचा उद्भव कोरोना असला, तरी या देशाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि त्याच्या हाताखालचे तोंडदेखले सरकार आणि सरकारी माध्यमे मात्र या तापाला ‘कोरोना’ म्हणायला, मानायला मुळी तयारच नाही.
‘लॉकडाऊन’मध्ये आपण नोकरी-व्यवसायात जशी लवचिकता आणली, ‘डिजिटल’ पार्श्वभूमी मजबूत केली, ऑनलाईनची नवी लवचिक ‘मॉडेल्स’ वापरली, तसेच काही नवीन नियोजन स्त्रियांसाठी करायला पाहिजे, तरच त्यांना विधायकदृष्ट्या जगता येईल.
पूर्वी अग्रस्थानी असलेल्या जागतिक संस्थांना भौगोलिक आणि ‘टाईम झोन’मधील फरकांमुळे एकमेकांशी संपर्कात राहणे कठीण होते किंवा गैरसोईचे होते, पण कोरोना काळात हाताच्या बोटांवर विसावलेल्या तंत्रज्ञानामुळे या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकत आहेत.
'कोविड’च्या महामारीने संपूर्ण जगात आपल्या दैनंदिन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आहे. या काळात आपण सगळ्यांनीच बर्याच अकल्पित गोष्टींचा अनुभव घेतला.
मुंबई महानगरपालिकेची ‘कोविड केंद्रे’ त्यांच्या वैद्यकीय सुविधेपेक्षा गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत राहिली. ‘कोविड केंद्रे’ उभारण्यासाठी झालेल्या खर्चाला आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढले आहे. त्यात ‘कोविड केंद्रां’च्या देखभालीवर अजून मोठ्या प्रमाणात खर्च वाढण्याच्या भीतीपोटी मुंबई महापालिकेने ‘जम्बो कोविड केंद्रे’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी सर्वत्र चर्चा रंगत आहे.
स्वतःची विस्तारवादी आणि एकाधिकारशाहीची भूमिका रेटणार्या चीनला आता कोरोना संक्रमणाचे खापर स्वतःवर फुटण्याची भीती वाटू लागली आहे. वुहान हेच कोरोनाचे उगमस्थान होते, आहे आणि राहणार याचा खुलासा वारंवार झाला. तरीही ही बाब पुसून टाकण्याचे पुरेपूर प्रयत्न चीनकडून होताना दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ज्या वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना पसरला, तिथल्या जागेच्या सुरक्षेची जबाबदारी सैन्याच्या जनरलला दिली आहे.
‘कोविड-१९’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरसकट कोणाशीही मुक्त व्यापार, करार करण्याच्या धोरणाला वेगळे वळण देऊन भारताचे नैसर्गिक मित्र असलेल्या तसेच भारताच्या आर्थिक आणि उद्योग क्षेत्राला पूरक असलेल्या देशांशी मुक्त व्यापार, करार करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भारत आणि युएई यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार हे या दृष्टीने टाकलेले आश्वासक पाऊल आहे.
कोरोनाचे उगमस्थान कोणते, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला, तर काही देश आणि संघटना ‘चीन’ असे त्याचे स्पष्ट उत्तर देण्यात आजही कचरतात. कारण काय तर व्यावसायिक हितासाठी चीनला दुखवायला नको. पण, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये कोरोनाचा सरसकट ‘चिनी विषाणू’ असाच उल्लेख करायचे तेव्हा त्यांना मात्र खुळचट ठरविण्यात डावे चीनसमर्थक आघाडीवर होते.
मुंबई : देशभरात कोरोनाचा वाढता आलेख हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. मंगळवारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानं रुग्णालयात दाखल केले आहे. त्या मुंबईतील ब्रीच कँण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांचे वय हे ९२ वर्ष आहे. कोरोनाच्या सौम्य लक्षणांमुळे त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुठल्याही खेळाडूची फक्त खेळ आणि खिलाडू वृत्ती उत्तम असून चालत नाही, तर त्यासाठी गरज असते ती ‘फिटनेस’ आणि ‘डाएट’ या दोन्हींची. खरंतर तुम्ही खेळाडू असाल अथवा नसाल तरी ‘फिटनेस’ आणि ‘डाएट’ यांना जीवनशैलीत स्थान देणे तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, आजच्या भागात ‘फिटनेस’ आणि ‘डाएट’ यांच्या बळावर खिलाडी ठरलेल्या क्रीडापटूंविषयी...
'कोरोना' अपडेट्स : कापडी मास्क वापरणाऱ्यांसाठी मोठा धोका!
मागील सात लेखांमधून निद्रेविषयीचे विविध पैलू आपण जाणून घेतले. निद्रेला आहार व व्यायामाइतकेच स्वास्थ्य टिकविण्याच्या दृष्टीने आयुर्वेदशास्त्रात महत्त्व दिले आहे. ‘न अति न कमी’ हा नियम निद्रेच्या बाबतीत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्याविषयी सविस्तर...
देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असतानाच केरळमधील तब्बल पाच हजार शिक्षकांचा लस घेण्यास नकार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
वैश्विक ‘सेमिकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेशी जग संघर्ष करत असतानाच, भारताने तैवानबरोबर 7.5 कोटी डॉलर्सचा ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. लवकरच ही चर्चा पूर्ण होईल व दोन्ही देशांत ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीसाठी करार केला जाईल, त्यात ‘फाईव्ह-जी’ मोबाईल फोनपासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या उत्पादनांत वापरल्या जाणार्या ‘सेमिकंडक्टर चिप’चा समावेश असेल.
रूग्णाला औषधोपचारांसाठी लागणारे सर्व साहित्य एका पॅकेजमध्ये देण्याचे काम जितेंद्र नेमाडे करीत आहेत. रुग्णासाठी पुरवित असलेल्या वेगळ्या सेवा आणि त्यांचे सामाजिक काम याविषयी आपण जाणून घेऊया.
३८ हजाराहूंन अधिक रुग्ण बरे; ३०,५४९ नव्या रुग्णांची भर
डेल्टा प्लस रूपाचे AY.१ आणि AY.२ हे प्रकार आतापर्यंत महाराष्ट्र, तामिळनाडू,आणि मध्य प्रदेशमधील ५५ ते ५० रुग्णांमध्ये आढळून आले आहेत.
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेने ३५ कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आतापर्यंत ३५ कोटी, १२ लाख, २१ हजार, ३०६ लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लसींच्या ६३ लाख, ८७ हजार, ८४९ मात्रा देण्यात आल्या. गेल्या २४ तासांत भारतात ४३ हजार, ०७१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सलग आठवडाभर ५० हजारांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचारा
कोविड -१९ च्या दुसर्या लाटेची तीव्रता असूनही एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताने सर्वाधिक विक्रमी निर्यात नोंदविली आहे. तसेच, गेल्या आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक १.७२२ अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परकीय गुंतवणूकदेखील झाली आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या 'डेल्टा प्लस' या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.
म्यूकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी. त्याबाबत जनजागृती करावी. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
भारतातील दैनंदिन नवीन रुणांच्या संख्येमध्ये सतत घसरण झालेली आढळून येत असून, भारतात गेल्या २४ तासांत १.३२ लाख इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत दैनंदिन १ लाख, ३२ हजार, ७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवशी दोन लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात दैनंदिन नवीन सक्रिय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे.
'फायझर' कोविड -१९ ही लस जुलैपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.अशी माहीती केंद्र सरकारने गुरुवारी दिली. डॉ. विनोद पॉल (आरोग्य) आणि कोविड -१९ (एनईजीव्हीएसी) साठी लसीकरण प्रशासनावरील 'नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या' अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकार 'फायझरबरोबर' काम करत आहे, 'फायझरने' जूलै पासून सूरू होणाऱ्या लसींबाबत निश्चित प्रमाण दिले आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे. त्यामुळे सर्व बालरोग तज्ज्ञांनी आपल्या ज्ञानाचा फायदा संभाव्य रुग्णांना देवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हयात बालरुग्ण कृती दल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेतही पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळू शकलेला नाही. यामुळे लोकल प्रवास, लसीकरण याच्यापासून त्यांना वंचित राहवे लागले आहे. अन्य अत्यावश्यक सेवांप्रमाणे पत्रकारांनाही वार्तांकनासाठी फिरावे लागते.