२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताने बुधवारी ७ मे पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. या मिशनमध्ये जवळपास ८० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.
Read More
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असून, प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरानंतरही त्याचा गडगडाट सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने ७०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता छावा च्या गौरवासाठी संसदेत खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.
राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यात भाषण करताना पंतप्रधानांनी सध्या चर्चेत असलेल्या छावा चित्रपटाचा उल्लेख केला. त्यांच्या तोंडून छावाचा उल्लेख होताच संपूर्ण सभागृहात टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा कार्यक्रम ’स्त्रीशक्ती समागमम्’ पुढील महिन्यात दि. २ जानेवारी रोजी केरळमध्ये होणार आहे. यामध्ये दक्षिण भारतीय राज्यातील दोन लाख महिला सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केरळ भाजपतर्फे आयोजित केला जात आहे, ज्याचा उद्देश ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याबद्दल, केरळच्या महिलांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणे, हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत.
२०२१ या वर्षामध्ये भारताने आत्मनिर्भरतेकडे जोरदार वाटचाल सुरू केली आहे. कोरोना लसीच्या उत्पादनानंतर आता भारतीय रेल्वेने जगातली पहिली आणि भारताची एकमेव 'हॉस्पिटल ट्रेन' बनवली आहे. जाणून घेऊया याच आत्मनिर्भर भारताच्या "लाईफलाईन एक्सप्रेस" विषयी...