बाळासाहेबांव्यतिरिक्त कोणाच्याही हाताखाली मी काम करणार नाही. तरीही एकाला (उद्धव ठाकरे) संधी दिली होती. पण त्याला समजलेच नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार. कारण हे अपत्य मी जन्माला घातले आहे. आज १८ वर्षे झाली, फोडाफोडीची गोष्ट कधीही मनाला शिवली नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
Read More
'आयुष्मान भव अभियानां'तर्गत देशभरात ५ कोटींहून अधिक आभा खाती तयार करण्यात आली आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावा आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावा अशा एकूण १३ लाख ८४ हजार ३०९ आरोग्य मेळ्यांव्यांना भेट देणाऱ्यांच्या संख्येने एकूण ११ कोटींची पल्ला गाठला आहे.
काँग्रेसी कार्यकाळात एकूण ४० हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनने बळकावला. काँग्रेसी धोरणांचा फटका संपूर्ण देशाला बसला. गेल्या नऊ वर्षांत मात्र मोदी यांनी विस्तारवादी चिनी ड्रॅगनच्या आक्रमकपणाला वेसण घातली. असे असतानाही राहुल गांधींचे खोट्याचे दुकान बंद होताना दिसत नाही. यावरुन ‘काँग्रेस-चीन भाई भाई’ यावरच पुनश्च शिक्कामोर्तब व्हावे.
मुंबई : राज्याच्या सत्तेत कमबॅक केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर फोकस केलेल्या भाजपने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसून तयारी सुरु केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी मुंबईत अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत भाजपच्या मिशन मुंबईचे बिगुल वाजवले आहे. माजी पंतप्रधान आणि भाजपचे संस्थापक अध्यक्ष भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या बोरिवली येथील पुतळ्याला अभिवादन करत आपल्या मिशन मुंबईला सुरुवात केली आहे.
हिंदी महासागरात भारताचा दबदबा निर्माण करण्याची मोठी गरज असताना चीनही भारताची पिछेहाट व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होता मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालदीव या देशाशी असलेली मैत्री पाहता चीनचा हा डाव मालदीवनेच उलटवला आहे. मालदीवमध्ये चार वर्षे जूना असलेला कायदा रद्द करण्यात आल्याने चीनला आता मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे हिंदी महासागरात शिरकाव करण्याचा ड्रॅगनचा प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश मिळाले आहे.
मोदींच्या कामगिरीची माहिती कॉंग्रेसला होऊ नये, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. काही दिवसांपूर्वी मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. यावरून, मोदींच्या कार्यक्षमतेचे आणि कार्यशैलीचे आकलन आपल्याला सहज करता येईल...