पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थांबवण्यात आले, परंतु, तलाव परिसर पूर्ववत करण्याच्या आदेशांचे पालन पवई तलाव परिसरात अजिबात झालेले दिसत नाही. या बद्दल विचारले असता "गरजेनुसार पालिका पाऊले उचलेल, नो कॉमेंट्स'’ असे उत्तर देण्यात आले आहे.
Read More