"भारताच्या विकासामुळे आता काही जणांना अडचण निर्माण झाली आहे. केवळ राजकारणासाठी आणि स्व:ताचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काही लोक देशाच्या एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत"असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात आपल्याला आता लढायचे आहे असा संदेश मोदींनी दिला. राष्ट्रीय एकत्मता दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी गुजरात मधल्या केवाडीया येथे बोलत होते.
Read More
“सरदार सरोवर प्रकल्पाची पायाभरणी देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी केली. मात्र, तो प्रकल्प माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला. या प्रकल्पात अडथळा आणून भारताचा विकास रोखण्यासाठी शहरी नक्षलवादी दीर्घकाळ सक्रिय होते. हे विकासविरोधी घटक आजही सक्रिय असून त्यांचा बिमोड करणे गरजेचे आहे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी राज्यसभेत बोलत होते. या भाषणातून त्यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ले केले
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा विचार करताना सामान्य दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत. त्यानिमित्ताने नक्षल्यांना प्रत्यक्ष हिंसाचाराच्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून मात्र आपण सजग असले पाहिजे. संवेदनशील भागात पोलिसांच्या, सशस्त्र दलाच्या जवानांच्या हिंसाचारात गुंतलेल्या आरोपींचा त्यात विचार करणे दलित चळवळीचा अपमान ठरेल.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदविण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे.