केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी मंगळवारी देशभरात आज होणाऱ्या प्रभावी नागरी संरक्षणासाठी होणाऱ्या मॉक ड्रिल्सबाबत एक बैठक घेतली. गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महासंचालक नागरी संरक्षण आणि महासंचालक एनडीआरएफ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. आम्ही तयारीचा आढावा घेत आहोत. ज्या त्रुटी दूर करायच्या आहेत त्या ओळखल्या गेल्या आहेत, असे गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी SDRF पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच TDRF च्या धर्तीवर पालिकांनी पथकं सुरु करावेत. ज्यामुळे लोकांची तात्काळ मदत करता येईल.त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवावी.स्थानिक तरुणांना बचावकार्यासंदर्भात प्रशिक्षण द्यावे,असे ही शिंदे म्हणाले.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासोबत (एनडीआरएफ) मोठ्या अपघातांच्या वेळी दक्षता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले. सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी इगतपुरी अप यार्ड येथे संयुक्त मॉक ड्रिल सादर करण्यात आले. कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करून, ज्यात एक डबा रुळावरून घसरून अचानक आग लागलेल्या डब्यात प्रवासी अडकल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली.
आंध्रप्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत च्या किनाऱ्यावर 'मिचॉन्ग' चक्रीवादळ धडक देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात त्याचा वेग ताशी ११० किलोमीटर असू शकतो. सध्या ते पश्चिम-मध्य आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनार्यावर आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूवर घिरट्या घालत आहे.
उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात गेल्या १३ दिवसांपासून अडकलेल्या कामगारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) पुन्हा एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. यासोबतच कामगारांना बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्याच्या आणि नंतर घरी पाठवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे काल रात्री नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिली. त्यामुळे नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांन
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातल्याचे दिसून आले. दि. १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिमला येथे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनसारखे प्रकार घडले. समरहिल शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळ्याने अनेक भाविक या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
वसईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अधून मधून हजेरी लावत काहीशी उसंत घेतल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. अनेक शेतांमध्ये मोठा ट्रॅक्टर , पॉवर टिलर यांच्या आवाजाने शेत शिवार गजबजून गेले आहेत .यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे वसईतील आवण्या लांबणीवर पडल्या आहेत .त्यामुळे जमेल तशी आवणी उरकण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत .यंदा जवळ पास निम्म्या आवण्या उरकत आल्या असून उरलेल्या आवणीसाठी भात खाचरात शेतकरी आणि मजूर यांची लगबग सुरू आहे .
महाराष्ट्राच्या अनेक भागात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या २४ तासांपासून राज्यभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून राज्यातील विविध भागांतील जनजीवनाला फटका बसला आहे. विशेषतः पश्चिम किनारपट्टीभागात पावसाचा जोर कायम असून येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागने दिला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील प्रशानस यंत्रणा अलर्टवर असून राज्यातील विविध भागातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर दिसून आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पुर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी देखील इशारा पातळी ओलांडली.
हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून २४ तासांत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, मंडी ते मनाली महामार्ग विविध ठिकाणी दरड कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. तसेच, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काही भागात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून एनडीआरएफने रेस्क्यूदेखील केले. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसामुळे परिस्थिती चिंताजनक असून दिल्ली, हरियाणा , जम्मू आणि काश्मीर ही राज्येदेखील मुसळधार पावसामुळे प्रभावित झ
नाशिक जिल्ह्याची ओळख राज्याची ‘कृषी राजधानी’ अशी केली जाते. मुंबई-पुण्यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही नाशिकच्याच भाज्या, फळे आणि फुलांचा पुरवठा होतो. येथील अर्थव्यवस्था कांदा, द्राक्ष आणि एकूणच कृषी मालावर आधारित आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने नाशिकच्या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकणी अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे काही तालुक्यातील शेती वाहून गेली, तर बर्याच शेतांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचले.
‘बिपरजॉय’ने अपेक्षेप्रमाणेच गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात तांडवनृत्य केलेच. आता हे वादळ पुढे राजस्थानकडे सरकले आहे. मात्र, या चक्रीवादळाचा अतिशय यशस्वीपणे सामना करून गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनातील नवा अध्याय नक्कीच रचला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने हे कसे साध्य केले, ते समजून घेणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वार्तांकन करणाऱ्या विविध माध्यम संस्थांचे पत्रकार, छायाचित्रकार विशेषत: खाजगी वाहिन्यांच्या माध्यमकर्मींच्या सुरक्षेबद्दलची गंभीर दखल घेत, त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नरत राहील, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट, रूपादेवी पाडा येथील ठाणे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची टाकी (जलकुंभ) २३ जुलै रोजी सकाळी फुटल्याने खळबळ उडाली.
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१)-२, पालघर-१, रायगड-महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ पथक तैनात आहेत. नांदेड आणि गडचिरोली येथे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेली पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असली तरी अजूनही वाहनांच्या मोठया रांगा लागल्या आहेत
राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार, दि. २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसानभरपाईबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीत आर्थिक मदतीबाबत चर्चा तर झाली. मात्र, अद्याप नुकसानभरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. “सध्या तत्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत,” अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली.
राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तैनात
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून सुमारे ११ लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात येणार आहे.
कांदिवली पश्चिम येथील दलजी पाडा भागात एका दुमजली घराची भिंत कोसळली आहे. रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच या भागात अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक रवाना झाले. दबलेल्या ढीगाऱ्या खालून १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत रविवारी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीतून ६१ लोक प्रवास करत होते. त्यापैकी १२ जणांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.
पाकचे पुन्हा नापाक कृत्य : सतलज नदीत सोडले दूषित पाणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले. त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर सांगितले.
महापूर : सांगलीत बोट उलटून १४ जण बुडाले
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), प्रादेशिक सेना (टेरिटोरियल आर्मी), कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथक, कोस्ट गार्डच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला
काल रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका करण्यात आली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरु केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात २३ ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मोठी जीवित व वित्तहानी टळली
बंगालच्या खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या ‘फनी’ वादळाचे रूपांतर सोमवारी सायंकाळपर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली
पूर्वा एक्सप्रेस (१२३०३) ही हावडा येथून नवी दिल्लीला जात होती. शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कानपूरपासून १५ किलोमीटर असलेल्या रुमा गावाजवळ या ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरले. यात तब्ब
पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये रवी पंडित मिल हा ६ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल १७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रवीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले.
यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात १३९ जणांनी आपला जीव गमावला आहे.