‘माझाच पक्ष खरा, इतरांचे पक्ष चुकीचे’ अशी भूमिका सावरकरांनी कधीच घेतलेली नाही. सनातन्यांपासून साम्यवाद्यांपर्यंत सर्वांनाच सावरकरांच्या हिंदू राष्ट्रात स्थान आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्यात सर्वात मोठा शत्रू अराजक असून आपले सारे मतभेद मतपेटीत सामावले पाहिजे, अशी अत्यंत व्यापक भूमिका सावरकरांनी घेतलेली आहे. अर्थात, या मतपेटीचे तळ फुटके नाहीत ना, हे तपासण्याची जबाबदारीही मतदारांची आहे, असा इशारा द्यायलाही ते विसरत नाहीत.
Read More