(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More
(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आण
(Tahawwur Rana Extradiction) मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात येत आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतीय पथक त्याला आणण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन जाणारे विशेष विमान दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरले आहे. येथून तहव्वूर थेट एनआयएच्या मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ISIS मुंबई येथे २००२- ०३ च्या साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारा मास्टरमाईंड साकिब नाचनने ISIS ला दहशतवादी संघटना म्हणू नका अशी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आयएसआयचे भारताचे प्रमुख असलेले नाचन यांनी इस्लामिक स्टेट आणि इतर गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारी सरकारी अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याची माहिती नितेश राणे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.
ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली, याचे पुरावेच त्यांनी सादर केले.
ज्यांना इथल्या नागरिकांची काळजी नाही, त्यांना परदेशातून आलेल्या घुसखोरांबद्दल मात्र जिव्हाळा दाटून आल्याचेच दिसते.