(Mumbai Ganeshotsav 2025 DJ Ban) मुंबईत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय कायम ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण मुंबईमध्ये डीजेवर बंदी असणार आहे. जर कुणी डीजेचा वापर केला तर मुंबई पोलीस कारवाई करणार आहे.
Read More
महाराष्ट्र शासनाच्या मसुदा लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारकांची सल्लामसलत बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्सचे कार्यकारी संचालक आर. सेल्वम यांनी भूषविले.
शरद पवारांना ज्या वेळी निवडणूक मॅनेज करून देतो म्हणणारी मंडळी भेटली त्याच वेळी त्यांनी ते जाहिर का नाही केलं? कारवाई का नाही केली. आता ती माणसेच आठवत नाही म्हणणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.
मोर्चा काढण्याआधी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे द्या, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी उबाठा गटाच्या वतीने सरकराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ऋजुता हाडये यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनादरम्यान दिनकर गांगल यांचे प्रतिपादन "ऋजुता हाडये यांच्या कविता अनघड आहेत, परंतु त्या भावभावना व विचार चिंतनात मुरलेल्या आहेत' असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांनी केले. दि. ९ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या दक्षा हॉल येथे सृजनसंवाद प्रकाशनतर्फे संपादक दिनकर गांगल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. ऋजुता हाडये यांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक, बालशल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी कवी, संपादक गीतेश शिंद
मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर ; वेगळी चूल मांडून लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आणि कोण ‘थिफ मिनिस्टर‘ हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले असून तिकडे राहुल गांधींचे आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला, असे प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुलांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात आहे. त्याचबरोबर या मुलांना जीवनाच्या प्रत्येक स्तरावर भेदभाव आणि शोषणाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानच्या बाल हक्क राष्ट्रीय आयोगाच्या (एनसीआरसी) एका अहवालात ही माहीती देण्यात आली असून सरकारने तातडीने यात लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
आपला जन्म ज्या सनातन परंपरेत झाला आहे, तिथे रोजच उत्सव किंवा कार्यक्रम साजरे केले जातात. सनातन परंपरा सर्व हिंदू समाजाला एकत्र करून एकात्मतेने चालवतात. सनातन परंपरांच्या उत्थानानेच समाज आणि भारताचे उत्थान होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर क्षेत्र प्रचारक अनिलजी यांनी व्यक्त केले. गोरखपुर महानगर दक्षिणच्या रक्षाबंधन उत्सवात ते बोलत होते.
जनता दरबारात शौचालयांच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी मंत्री लोढा यांचे महापालिका आयुक्तांना पत्र शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर सह पालकमंत्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यासंदर्भात लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रही लिहले आहे. पालिकेच्या एफ \नॉर्थ विभागात आयोजित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेचे संस्थापक सदस्य व पूर्व अध्यक्ष माधव पुरुषोत्तम थिटे तथा शरदराव थिटे (नाना) यांचे १ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. बाल वयातच संघ स्वयंसेवक झालेले नाना थिटे यांनी पुण्याच्या पूर्व भागात संघकार्य रुजवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष पूज्य महंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना '३६ वा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान' नुकताच प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा रविवारी कोलकाता येथे श्री बडाबाजार कुमारसभा वाचनालयाच्या वतीने नॅशनल लायब्ररी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सन्मानस्वरूप एक लाख रुपयांचा धनादेश आणि मानपत्र प्रदान करण्यात आले.
मुंबईतील कबूतरखान्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून कबूतरखान्यांसंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, ११ ऑगस्ट रोजी नकार दिला आहे.
यंदाच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दि. ८ ऑगस्ट रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने किन्नर भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे केले. त्यारवेळी मोठ्या संख्येने किन्नर भगिनी जमल्या होत्या. कार्यक्रमात या भगिनींनी मनमोकळेपणाने त्यांचे विचार मांडले. त्यांचे विचार ऐकून आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मनात वादळ निर्माण झाले. आम्ही माणूस नाही आहोत का? हा प्रश्न सलत आहे. त्या अनुषंगाने किन्नर भगिनींच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
समाजाची सज्जनशक्ती तुमच्या सोबत आहे. आपली दृष्टी सकारात्मक असेल तर समाज नेहेमी साथ देतो.” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी केले. दै. मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयात किन्नरभगिनींसोबत ‘रक्षांधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. दै. मुंबई तरुण भारतच्या सामाजिक विभागाच्या प्रमुख योगिता साळवी यांनी, आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, "ज्यांच्याकडे सगळं काही आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही अशा दोन्हीकडच्या लोकांना एकत्
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात दाट लोकवस्ती असलेल्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील झोनमध्ये ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मार्गावर व्यापक ध्वनी अडथळे बसवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाडाचा सामना लागला. तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावरील 'सिस्टम डाऊन' झाल्याने चेक इन काऊंटवर मॅन्यूअल मोडवर तिकीट दिले जात होते. त्यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल एका तासाभरानंतर प्रणाली पूर्ववत झाली व चेक इन काऊंटरवरील काम पूर्ववत झाले.
"लोकांनी मला सांगितले की धारावी खूप राजकीय आणि धोकादायक आहे. मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ विटा आणि सिमेंटचा प्रकल्प नाही तर मुंबई बांधण्यास मदत करणाऱ्या लोकांचे उत्थान करण्याचा आहे", असे उद्गार गुरुवार,दि.६ रोजी लखनऊ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे मुख्य भाषण देताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतच्या आपल्या भावना आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
मुंबईच्या मेट्रो प्रवासाने एक मोठा टप्पा गाठत मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवर केवळ ३९ महिन्यांत एकूण २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. कार्यालयीन कर्मचारी वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त व्हावेत, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व वातानुकूलित प्रवास मिळावा, यासाठी मेट्रोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपनगरांना जोडणारी, रस्त्यांवरील वाहतूक कमी करणारी आणि प्रवासाचा वेळ निम्म्याहून अधिक कमी करणारी ही व्यवस्था मुंबईकरांसाठी खरंच जीवनवाहिनी ठरली आहे.
मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प का रखडले? म्हाडा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही का? या प्रकल्पांसाठी 'बांधकाम आणि विकास संस्था' नियुक्त करण्याची वेळ म्हाडावर का आली ? यांसारख्या विषयावर माहिती महाएमटीबीने शिल्प असोसिएट्सचे संस्थापक आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार निखिल दीक्षित यांच्याशी साधलेला संवाद.
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा ; आवश्यकतेनुसार सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसून पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी दिले. कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ‘सुरक्षा दल’ हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टीने ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि ‘गिरगाव चौपाटी’, नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमण्याची कार्यवाही करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्ज' असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
समाज माध्यमांवर सध्या इंडिगो विमानातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये बसलेली एक व्यक्ती एका इस्लामिक व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसतेय. या व्हिडिओचा वापर करून काही समाजकंटक समाज माध्यमांवरून दोन गटांत विष परसरू पाहतायत. मात्र मारणारी व्यक्ती ही हिंदू नसल्याचे स्पष्ट झालेय. त्यामुळे समाज माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Indigo Fight
राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. या मध्यान्ह भोजनातून होणाऱ्या अन्न विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सविस्तर मानक कार्यपद्धती जारी केली आहे.
महावीरीच्या ध्वजमिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केल्याची घटना बिहारच्या मुझफ्फरपूर येथे नुकतीच घडली. साहेबगंज पोलिस स्टेशन हद्दीतील मीनापूर गावात एका मशिदीजवळील घरांच्या छतावरून धर्मांधांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे. या घटनेत राजेपूर स्टेशन प्रभारी राधेश्याम आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसह अनेक पोलिस गंभीर जखमी झाले. या संघर्षादरम्यान एका झोपडीलाही आग लावण्यात आल्याची माहिती आहे.
हरिद्वारच्या गंगा आणि गंग कालव्याच्या काठावरील वाढते अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तराखंड सरकारने उत्तरप्रदेशच्या पाटबंधारे विभागाला याविषयी पत्र लिहिले असून बेकायदेशीरपणे स्थायिक झालेल्या लोकांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. अशी माहिती आहे की, यूपी पाटबंधारे विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी सरकारी जमिनींच्या व्यवहारात सहभागी असल्याचे सांगितले जाते.
समाज माध्यमांवरून कथितरित्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. प्रकरण इतके वाढले की, हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, अल्पसंख्याक समुदायाच्या एका तरुणाने कथितपणे केलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी गावात तणाव पसरला.
कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी माहिमच्या एल.जे. रोडवर न्यायालयाच्या मनाई नंतरही कबुतरांना खाद्य दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यासंबंधित एका अनोळखी इसमाविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.
संस्कार भारतीचे पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांना पद्मभूषण (२०२४) व ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री (२०२५) मिळाल्याबद्दल संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने 'अभ्यासोनी प्रकटावे' हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.
‘सृजन’ या मुंबईत आयोजित कलाप्रदर्शनाच्या माध्यमातून ऋतुचक्राच्या वेगवेगळ्या छटा कलारसिकांना अनुभवायला मिळतात. ‘रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स’च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारलेला हा अनुभव कसा आहे, याचा घेतलेला परामर्श.
सुमारे १७ वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर, मुंबईतील एका विशेष न्यायालयाने गुरुवारी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी हा निकाल दिला.२००८ मध्ये मालेगाव शहरात झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे १०० जण जखमी झाले होते. या खटल्याचा निकाल १९ एप्रिल २०२५ रोजी राखून ठेवण्यात आला होता.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी खड्डा खणल्यास बृहन्मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या १५ हजार रुपये दंडाच्या निर्णयाचा अखेर पुनर्विचार होणार आहे. या मागणीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पूर्वीप्रमाणे केवळ २ हजार र
हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभे करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला असून आता काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागायला हवी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला महसूल व वन विभागाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण ६२ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार (राजपत्रित, गट-ब) पदावर पदोन्नती जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय सेवेत कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने संघटनात्मक बांधणीचा संकल्प करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. गुरुवार, ३१ जुलै रोजी प्रदेश कार्यालयात झालेल्या माजी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते.
जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
बंदी लागू असूनही कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कडक शब्दांत टीका करत, मुंबई उच्च न्यायालयाने याला सार्वजनिक आरोग्य सुरक्षेचे गंभीर उल्लंघन ठरवले आहे. न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नुकतेच मुंबई महापालिकेला (बीएमसी) आदेश देण्यात आला की, “कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत.”
‘मुंबई ते मुंबई या’ माझ्या पुस्तकाचा आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा दि. १९ जुलै रोजी डॉ. भानूबेन नानावटी कलाघर, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जरी असला, तरी त्यातून समाजमन प्रतित झाले. त्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
राज्य सरकारच्या अधिकारांचा गैरवापर केलेल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्या.आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत म्हटले आहे की “बेकायदेशीर नोटिसी प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणे आणि चौकशी करणे हे एक संवैधानिक न्यायालय म्हणून आमचे कर्तव्य आहे.” या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अधीन असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र
गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात येणाऱ्या दंडाबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. बुधवार, ३० जुलै रोजी महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
गतिमंद असलेल्या अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तन-मन अर्पून मेहनत घेणार्या डॉ. भगवान तलवारे यांच्याविषयी...
(Bhushan Gagrani) "मुंबईतील कबुतरखाने बंद करावे लागतील, त्याला दुसरा पर्याय नाही", असे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई मेट्रो २ अ आणि ७ वरून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नियमित प्रवास कार्ड आणि पासवर थेट २५ टक्के सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून याबाबत एक्स अकाउंटवर माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील पक्षीनिरीक्षकांनी रविवार दि. २७ जुलै रोजी शहरातील दक्षिणेकडील भागातून दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली (seabird in mumbai). त्यांनी दक्षिण मुंबईच्या आकाशातून लेसर फ्रिगेटबर्ड, ख्रिसमस आयलंड फ्रिगेटबर्ड, विल्सनस् स्ट्रोम पेट्रेल, वाईट चिक टर्न नावाच्या दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली. (seabird in mumbai)
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सोमवार, दि. २८ जूलै रोजी, सकाळी ११:३० वाजता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत महायुतीतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भातील मागण्या घेऊन ठाकरे गटाचे नेते राजभवनावर दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह सुषमा अंधारेही उपस्थित होत्या.
रविवार दि. २६ जुलै रोजी बॉलिवूडचा मिस्टर परफेकशनिस्ट म्हणून आोळख असलेला आमिर खानच्या वांद्रे् येथील घराबाहेरील व्हिडियो सध्या व्हायरल झाला असून, यात २५ आयपीएस अधिकारी आमिर खानच्या घरी पोहोचल्याची माहिती उघड झाली आहे. २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम ही आमिरची भेट घेण्यासाठी आल्याची चर्चा आहे.
धारावीसारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी नेमकी कशी उभी राहिली...?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शनिवार, २६ जुलै रोजी मनसेत ९ नव्या विभाग अध्यक्षांच्या नियूक्त्या करण्यात आल्या असून अनेक जागांवर फेरबदलही करण्यात आले आहेत.
मुंबई उपनगरीय भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प एमयुटीपी II अंतर्गत ८,०८७ कोटी, एमयुटीपी-III अंतर्गत १०,९४७ कोटी आणि एमयुटीपी IIIA अंतर्गत ३३,६९० कोटी खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवार,दि.२५ रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.