सुमारे १७ वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर, मुंबईतील एका विशेष न्यायालयाने गुरुवारी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी हा निकाल दिला.२००८ मध्ये मालेगाव शहरात झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे १०० जण जखमी झाले होते. या खटल्याचा निकाल १९ एप्रिल २०२५ रोजी राखून ठेवण्यात आला होता.
Read More
दिल्लीतील संसद भवनाजवळील मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्या खासदारांसोबत बैठक घेतल्याचे समोर आले. या प्रकरणावरून त्यांच्याविरोधात बऱ्याच टीका झाल्या. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी अखिलेश यादव यांची वागणूक लज्जास्पद असल्याचे सांगत चांगलेच फटकारले आहे. रझवी यांनी संपूर्ण समुदायाची माफी मागण्यास सांगितले असून कसे न केल्यास मुस्लिम संघटना त्यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे.
(Akhilesh Yadav) दिल्लीतील संसद भवनाजवळ असलेल्या मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित राजकीय बैठक घेतल्याप्रकरणी वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा आणि उत्तराखंड वक्फ बोर्डाने या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्षेप नोंदवला आहे. मशिदीला तुम्ही राजकारणाचा मंच बनवला आहे. केवळ आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत तर राजकीय मर्यादांचेही उल्लंघन झालेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
बईच्या पूर्व उपनगरातील पाच मशिदींच्या व्यवस्थापनाने अजानसाठी वापरले जाणारे लाऊडस्पीकर हटवण्याच्या नोटीशीप्रकरणी मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, या मशिदींना निरर्थक नोटिसा बजावून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Wakf Board scolds Orders to demolish illegal mosque गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशच्या शिमलामधील संजौली मशिदीच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली होती. त्या घटनेनंतर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आणि चौकशीस प्रारंभ केला. या सर्व चौकशीमध्ये हिमाचल प्रदेश ‘वक्फ बोर्ड’ पूर्णपणे तोंडघशी पडले असून, हा वाद सहा आठवड्यांच्या आत सोडवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
नालासोपाऱ्यात जिहाद्यांकडून पाकिस्तानचे समर्थन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवणाऱ्या हिंदूंना या देशद्रोही गुंडांनी अडवत धमक्या दिल्या. तसेच पाकिस्तानचा झेंडा निदर्शकांकडून खेचून घेण्यात आला.
घाटकोपरमधील मशिदींवरील भोंग्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून ध्वनिक्षेपक वापराच्या परवान्याबाबत मशिदींना नोटीस जारी करण्यात आली आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर (प) पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
Sambhal jama Mosque उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील वादाच्या भोवऱ्यात असलेल्या जामा मशिदीचे प्रमुख जफर अलीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी केस डायरी सादर करेपर्यंत जामीन मंजूर करावा, असा वकिलाने न्यायालयात युक्तीवाद सादर केला आहे. वकिलाचे नाव हरिओम प्रकाश सैनी असून त्यांनी हा युक्तीवाद केला आहे. शिवाय, जामा मशिदीचे प्रमुख आणि वकील असल्याने त्यांनी न्यायालयात जमीन मागितला आहे.
एक काळ असा होता की, हिंदू धर्मसंस्कृती भारताच्या पलीकडे अगदी दक्षिण आशियाई देशांपर्यंत पोहोचली, रुजली अन् बहरली. त्यामुळे अगदी इंडोनेशियापासून ते मलेशिया आणि पुढे थेट थायलंडपर्यंत हिंदूंचा प्रभाव वाढू लागला. भारतातील पल्लव राजांच्या काळात हे सगळे घडत होते. नवव्या शतकापर्यंत अनेक देशांत राजांपासून प्रजेपर्यंत सर्वांनी हिंदू धर्माचरणास प्रारंभ केला. दहाव्या शतकानंतर मात्र परिस्थिती काहीशी बदलू लागली. दक्षिण आशियाई देशांतील काही देश मुस्लीम देशांमध्ये धर्मांतरित होत गेले.
यापुढे कुणालाही सरसकट मशीदींवरील भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. भोंग्याबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
madrasas उत्तराखंडमध्ये अवैध मदरशांविरोधात प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यातील देहरादूनमध्ये आतापर्यंत ११ अवैध मदरशांना कुलूपबंद करण्यात आले आहे. उत्तराखंड राज्याचा विचार केल्यास ५०० हून अधिक अवैध मदरशांवर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये, मशीद समितीने घोष कंपनी चौकातील अबू हुरैरा मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले आहे. ही मशीद अवैधपणे बांधण्यात आली होती. गौरखपूर विकास प्राधिकारणाने १५ दिवसांपूर्वी अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. नोटीशीचा कालावधी संपल्यानंतर मशीद समितीने शनिवारी १ मार्च रोजी स्वत:च बांधकाम पाडण्यास सुरूवात केली.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात ९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासनाने अवैध बांधकाम मशीद मदनी पाडली. मशिदीचा नकाशा मंजूर नसल्याने आणि त्यातील काही भाग पोलीस ठाणे आणि नगरपालिकेच्या जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचे आढळून आले. यामुळे अवैध मशिदीवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली.
(Sambhal Case) संभल येथील जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आणि मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका खाजगी विहिरीच्या संदर्भात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Illegal mosque उत्तराखंडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या फायदा घेत, हरिद्वारनजीक जमलापूर कलानमध्ये अवैधपणे एका मशिदीचे बांधकाम करण्यात आले होते. माध्यामाच्या वृत्तानुसार, जमलापूर कलानमधील सराय मार्गावर अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी न घेताच अवैध मशिदीचे बांधकाम करण्यात आले होते.
mosque स्वत:ला पत्रकार म्हणून घेणारा मीर फैसलने पुन्हा एकदा सोशल मीडियाचा गैरवापर करत १८० वर्षे जूनी असलेली मशीद पाडण्याचा दावा केला आहे. त्याने ही खोटी माहिती एका X ट्विटर अकाऊंटवरून पसरवण्याचे काम केले आहे. अनेकदा बनावट पेडलिंक केल्याबद्दल स्वघोषित पत्रकार मीर फैसलने आता पुन्हा एकदा भारताविरोधात अपप्रचार केला आहे. संबंधित मशीद ही फतेहपूर येथील असल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
बाबरीचे गाडलेले भूत जीवंत करण्याचा नसता खटाटोप कट्टरतावाद्यांकडून सुरु होतो. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी रामनामाच्या आसमंत दुमदुमून टाकणार्या जयघोषांत रामभक्तांनी बाबरी ढाँचा जमीनदोस्त केला. अधर्माचे आणि अन्यायाचे प्रतीक असलेल्या बाबरी ढाँचाला गाडून आता तब्बल ३२ वर्षे उलटली. याच वर्षी अयोध्येत जानेवारी महिन्यात श्रीरामजन्मभूमी स्थळी भव्यदिव्य राममंदिरही उभे राहिले आणि रामजन्मभूमी मुक्तीचा ५०० वर्षांहून अधिकचा लढाही सुफळसंपूर्ण झाला. पण, असे सगळे शुभमंगल घडल्यानंतरही कट्टतावाद्यांच्या मनातील बाबरीचे भूत काही के
महाराष्ट्रात मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम आक्रमक भूमिका घेतल्याचे आपण पाहिले. याचा अर्थ ‘नमाज पडण्यावर बंदी’ असा होत नाही, तर केवळ ‘मशिदींवर लागलेल्या अनधिकृत भोंग्यांतून होणार्या अजानवर बंदी घालावी’ असा त्याचा सरळ अर्थ. याच अवैध भोंग्यांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय इस्रायलमध्ये नुकताच घेण्यात आला आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन ग्वीर यांनी तेथील पोलिसांना मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. बेन ग्वीर लवकरच याबाबत एक विधेयक सादर करणा
sambhal violence : उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडलंय. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला एका पत्राद्वारे चेतावणी दिल्याचे पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ... #jamamasjid #sambhal #sambhalviolence #uttarpradesh #vishnushankarjain #jamamosque #AllIndiaMuslimPersonalBoardLaw #asisurvey #news #mahamtb
Hindus आम्ही आयोध्येतील श्रीरामाचे मंदिर तोडून त्याजागी मंदिर बांधणार आहे हे मी आज सर्वांना सांगत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य मुहम्मद साबीरने केले आहे. यावेळी मुहम्मद साबीर एका युट्यूब चॅनेलसोबत बोलत होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्या पथकाला संभल जामा मशिदीतही ( Sambhal Masjid ) प्रवेश देण्यात आला नाही. या मशिदीच्या संवर्धनाची आणि देखभालीची जबाबदारी १९२० पासून एएसआयकडे असली तरी बऱ्याच दिवसांपासून एएसआयला मशिदीत जाण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे त्याच्या सध्याच्या स्वरूपाची माहिती एएसआयकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी मुंबई विमानतळ येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या पारगाव येथील डोंगराळ ठिकाणी अवैध दर्गा (illegal Mosque) बांधण्यात आला होता. विमानतळाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असल्याने सिडकोने या अवैध दर्ग्यावर जेसीबी चढवत दर्गा जमीनदोस्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दर्ग्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. फुल पीर शाह बाबा दर्गा असे या दर्ग्याचे नाव आहे.
illegal mosque हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बांधलेल्या संजौली येथील अवैध मशिदीचे (Illegal mosque) बांधकाम केल्याप्रकरणी हिंदू समाज एकवटला आहे. या बेकायदेशीर संजौली मशिदीवर लवकरच आता महापालिकेचा हातोडा पडणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी होणार असून न्यायालयाने मशिदीच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.
illegal mosque उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात सरकारी जमीनीवर कब्जा करुन मशीद आणि ईदगाह बांधल्याचे प्रकरण आहे. हिंदू तक्रारदाराला दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावून ते पाडण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तहकुहीराज येथे गहाडिया चिंतामणी गावात रस्त्याच्या कडेला ही धार्मिक स्थळे बांधण्यात आली आहेत.
Sanjauli Mosque : संजौली मशिदीवर अखेर हाथोडा पडलाच! गेल्या २ महिन्यात काय घडलं पाहा संपूर्ण घटनाक्रम
स्थानिक महापालिकेने केलेल्या शिमला येथील बेकायदेशीर मशीद पाडण्याच्या कारवाईनंतर मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी भाष्य केले आहे. बेकायदा मशीद पाडल्यानंतर मुस्लिम समाजाकडून पैसे नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. त्यानंतर आता मशीद पाडण्यात समितीला काही अडचण येत असेल तर ते महापालिकेला पत्र लिहून मदत मागू शकतात, असे मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.
(Himachal Pradesh) शिमला तसेच हिमाचल प्रदेशातील एकूण १२ जिल्ह्यांमध्ये मशिदींच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत हिंदू संघटनांनी निदर्शने केली. या निदर्शनात अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
(Dharavi Land Jihad) धारावीतील ९० फूट रस्त्यावरील सुभानिया मशिदीचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी पालिकेचे पथक त्याठिकाणी पोहोचले होते. २५ वर्ष जुन्या या सुभानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पथकाला रोखले. पालिकेच्या वाहनाच्या काचांची तोडफोड केली. पालिकेच्या पथकाचा रस्ता अडवण्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने जमाव अचानक जमा झाल्याने आधीच मशिदीच्या नावे फतवे काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे धारावीतील लँड जिहादचे
(Mangal Prabhat Lodha) मुंबई महापालिकेद्वारे दि. २१ रोजी सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी
illegal mosque हिमाचल प्रदेशातील मंडी येथील असलेली अवैध मशीद पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हिंदूंनी निदर्शने दर्शवली होती. मात्र आता अवैध असलेली ही मशीद तोडण्याचे आदेश मंडीचे महाआयुक्त एसएस राणा यांच्या न्यायालयाने १३ सप्टेंबर रोजी आदेश दिला. मशीदीचे बेकायदेशीर काम येत्या ३० दिवसांत हटवावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. जेल रोड येथील परिसरात कोणतीही परवानगी न घेता मशीद बांधण्यात आली होती. यामुळे आता न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
दर शुक्रवारी फतव्यानुसार आपल्याइथेही खूप काही घडत असते. या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये नुकतेच सहाव्या शतकातल्या इमाम अली मशीद (ब्लू मशीद) सह इतर तीन मशिदींना टाळे ठोकले गेले. या मशिदींमध्ये जर्मनीत ‘कट्टर इस्लाम’चा प्रसार करण्याचे षड्यंत्र रचले जात होते, असे जर्मनी सरकारचे म्हणणे आहे.
दिल्लीतील मंगोलपुरी येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामावर एमसीडीने कारवाई केली आहे. येथे एमसीडीने एका मशिदीचा बेकायदेशीर भागही पाडला. मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवताना बराच गदारोळ झाला होता. या गोंधळादरम्यान मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यात आला.
इस्लामिक कट्टरतावादाचा सामना करण्याच्या नावाखाली ४० वर्षांपूर्वी सुरू झालेले चीनमधील प्रत्येक मशिदीच्या सिनिकायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. अरबी शैलीत बांधलेल्या शेवटच्या मोठ्या मशिदीचा मिनार आणि घुमट काढून ही मशीद चिनी शैलीत बांधण्यात आल्याचे वृत्त आहे. पूर्वी आणि आताचे बदल चित्रांमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.
दक्षिण कोरियामध्ये दाऊद किम या सुप्रसिद्ध पॉप गायकाने युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट केला. ”मी इंचियोनो येथे १ कोटी, १३ लाख, ७२ हजार, ४९७ रुपयांची जमीन खरेदी केली आहे. लवकरच तिथे भव्य मशीद बांधणार आहे. माशाअल्ला देशातल्या प्रत्येक रस्त्यावर मधुर अजानचे स्वर ऐकू यायला हवेत.
शिया मुस्लिम राष्ट्र इराणने पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत इराणने जैश अल-अदलच्या कमांडरसह त्याच्या साथीदारांना ठार केले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी यासंबधित माहिती एका न्यूज पोर्टलद्वारे केली आहे. 'इराण इंटरनॅशनल इंग्लिश' असे या सरकारी माध्यमाचे नाव आहे. याआधी महिनाभरापुर्वी दोन्ही देशांनी एकमेंकाच्या भूमीवर हवाई हल्ले केले होते.
ज्ञानवापी संकुलातील कथित वजुखान्यात असलेल्या शिवलिंगाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्यात यावे, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती हिंदू पक्षाचे वकील विष्णूशंकर जैन यांनी दिली आहे.
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दि. २४ जानेवारी २०२४ ला महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. आपल्या निर्णयामध्ये न्यायालयाने 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (एएसआय) ने ज्ञानवापी परिसरात केलेले पुरातत्वीय सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजूच्या लोकांना हा अहवाल पाहता येणार आहे.
मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर औरंग्याने जी मशीद उभारली होती, तिचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला. काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल येण्यापूर्वीच, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने परवानगी दिली. पुढील महिन्यात श्रीराम जन्मभूमीवरील भव्यदिव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असतानाच, न्यायालयाने दिलेला हा निकाल निव्वळ योगायोग नाहीच!
दिल्ली उच्च न्यायालयाने धौला कुआन येथील मशीद, मदरसा आणि स्मशानभूमीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. मदरसा आणि कब्रस्तान प्रशासनाकडून पाडले जाण्याची भीती व्यक्त करत कंगल शाह यांच्या व्यवस्थापन समितीने दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळून लावली. मुस्लिम पक्षकारांने बाजूच्या वतीने ज्ञानवापी प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाऐवजी अन्य उच्च न्यायालयाकडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुस्लिम पक्षकारांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
इस्रायली सुरक्षा दलांनी पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागात असलेली अल अन्सार मशीद हवाई हल्ल्यात उडवून दिली आहे. या मशिदीच्या खाली तळघरात इस्लामिक दहशतवादी संघटना हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे दहशतवादी इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते, असे इस्रायली सुरक्षा दलांनी म्हटले आहे.
चीन स्वतःच्या घरात उघूर मुस्लिमांवर अत्याचार करतो. मात्र, पॅलेस्टाईन आणि अल अक्सा मशिदीबद्दल चीन मात्र मुसलमानांच्या सोबत. जून महिन्यात यासंदर्भात चीनने तशी भूमिकाही मांडली. चीन आणि उघूर मुसलमान हा मुद्दा तसा वर्षानुवर्षे चर्चेत आहे.
ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्येही जातीव्यवस्था असून, त्यात काही पुढारलेल्या, तर काही मागास जाती आहेत. आता मुस्लिमांना मिळणार्या अनेक सवलती या गरजूंनाच मिळत आहेत का, ते निश्चित करण्यासाठी आसाममधील मुस्लिमांच्या पाच प्रमुख जातींचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून त्यांची सामाजिक स्थिती काय, ते निश्चित केले जाणार आहे. यामुळे सरकारी योजनांचा खरा लाभ गरजूंना मिळेल आणि लांगूलचालनाच्या राजकारणाला चाप बसेल.
नायजेरियाच्या वायव्येकडील कडुना राज्यातील एका मशिदीवर अज्ञात सशस्त्र गटाने हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे सात नमाजींचा मृत्यू झाला आहे. कडुना पोलिसांचे प्रवक्ते मन्सूर हारुना यांनी सांगितले की, राज्याच्या इकारा स्थानिक सरकारी क्षेत्रातील दुर्गम साया गावात शुक्रवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. यावेळी मशिदीत सर्व नमाजासाठी मशिदीमध्ये आलेले होते.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. बसपा नेते आणि माजी नगरसेवक हाजी खलील अहमद यांनी सुमारे ३० कोटी रुपयांच्या महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. यानंतर तेथे मदरसा आणि मशीद बांधण्यात आली. नंतर काही दुकाने बांधून भाड्याने दिली. आता हाजी खलील अहमद यांच्याविरोधात महापालिकेने एफआयआर नोंदवला आहे. तसेच जागा रिकामी करण्याची नोटीस दिली.
आफ्रिकन देश नायजेरियामध्ये नमाज अदा करताना मशिदीचे छत कोसळल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा शेकडो लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते. दरम्यान डझनभर लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीतील दोन मोठ्या मशिदींचे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाबर रोडवरील बच्चू शाह मशीद आणि टिळक मार्ग रेल्वे पुलाजवळील टाकिया बब्बर शाह मशीदचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी उत्तर रेल्वे प्रशासनाने १५ दिवसांची मुदत दिली होती. नोटीसमध्ये १५ दिवसांच्या आत अतिक्रमण न हटवल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
मुस्लिम संघटना देशात समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध करत आहेत. समान नागरी कायद्याचा विरोध करण्यासाठी या संघटना आता तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये मशिदीबाहेर बार कोड लावण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईतही करण्यात आला होता. UCC
अलीकडेच इराणमधील महिला आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. दरम्यान एका मौलानाने तर दावा केला आहे की, देशातील ७५,००० मशिदींपैकी ५०,००० मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. नुकतेच इराणमध्ये हिजाब आणि बुरख्याविरोधात लाखो महिला रस्त्यावर उतरल्या. आता मौलाना मोहम्मद अबोलगसीम दौलबी यांनी देशातील मशिदी बंद करण्यावर चिंता व्यक्त केली आहे. इराण हा इस्लामिक देश असताना हे सर्व घडत आहे.
प्रसिद्ध गायक/संगीतकार ए.आर.रेहमान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक जोडपे एका मशिदीमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करताना दिसत आहे.हा व्हिडीओ जुना असला तरी 'द केरला स्टोरी ' चित्रपटाच्या वादात तो चांगलाच व्हायरल होत आहे. या लग्नाचा व्हिडिओ केरळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.