महात्मा गांधींचे कार्य ते हयात असताना जसे कित्येकांना प्रेरणा देणारे होते, तसेच ते नसतानाही तितकेच प्रेरणादायी आहे. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, अस्तेयाच्या तत्त्वांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठी चळवळ उभी केली. विनोबा भावेंसारखे वैयक्तिक सत्याग्रही त्यातूनच तयार झाले. गांधी विचारांची प्रासंगिकता जशी त्या काळात होती तशीच आजही आहे व हे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारी उदाहरणेही अस्तित्वात आहेत.
Read More
गांधीवाद म्हणजे काय? गांधींची विचारप्रणाली नेमकी कोणती होती? गांधीवाद हा मार्क्सवाद वा इतर समूहवादांहून भिन्न कसा? गांधीवादाने कोणती सकारात्मक ऊर्जा जागवण्याचे निश्चित केले? असे अनेक प्रश्न. त्याचबरोबर राष्ट्रवाद, युद्ध वगैरे मुद्देही आपल्या अवतीभवती असतात. अशा सर्वच विषयांचा सदर लेखात विचार केला आहे.
महात्मा गांधीजी आणि रा. स्व. संघात काय साम्यस्थळे आहेत? दोघांच्या विचारांत कोणता सारखेपणा आहे? महात्मा गांधीजींना जे अभिप्रेत होते, तेच संघ नेमके कसे प्रत्यक्ष जीवनात करताना दिसतो? असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात असतील. विरोधकांकडून महात्मा गांधी संघविरोधी असल्याचे ठसवले जाते, तर संघाकडून गांधीजींना प्रातःस्मरणीय मानले जाते. परंतु, महात्मा गांधीजींशी संघाचे नाते काय? हेच सदर लेखात समर्पक शब्दांत मांडले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरतेच महात्मा गांधी प्रासंगिक होते का? गांधीजींच्या विचारांनुसार वागणे त्यानंतर शक्यच नव्हते का? महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व काळात तर प्रमुख होतेच. पण, आजच्या संदर्भात त्यांचे विचार उपयुक्त आहेत का, असे अनेक प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले जातात. तेव्हा, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.