घरातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, शिक्षणाची कास धरून साहाय्यक राज्यकर आयुक्तपदापर्यंत उत्तुंग झेप घेणार्या ज्ञानेश्वर धात्रक यांच्याविषयी...
Read More
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ना
नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि. ४ जुलै रोजी कठोर पाऊल उचलले असून उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांचे तात्काळ निलंबन आणि आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचे आदेश देत त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत विधानसभेत दिले आहेत.
उबाठा गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी नाशिक शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उबाठा गटाचे नाशिकमधील महानगर प्रमुख विलास शिंदे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप केला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला १५ दिवसांमध्ये नाशिकमध्ये दुसरा तडाखा बसला असून सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रभागातील ४ तर इतर ४ असे आठ नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह रविवार दि. २९ जून रोजी ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणत्याही राज्याला स्थिर सरकार मिळाल्यानंतर त्या राज्यामधील मोठ्या शहरांबरोबरच इतरही लहान शहरे कशी कात टाकतात, याचा अनुभव नाशिककरांना आला. नाशिकच्या विकासाला अधिक गती मिळावी, यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकच्या हवाई कक्षा अधिक रुंदावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली असून विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ने घेतला. लगोलग या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्
नाशिकमधील उबाठा गटाच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
मुंबईनंतर नाशिकमध्ये 'उबाठा' गटाला खिंडार पडले आहे. नाशिक जिल्ह्यातील उबाठाच्या गटाच्या चार नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या हेच जीवनकार्य जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
उबाठा गटाचे नाशिकमधील उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी फोन करत या कारवाईचे आदेश दिले. सुधाकर बडगुजर यांनी मंगळवार, ३ जून रोजी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता बुधवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे भूकंप होतो. ते प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला जातात आणि त्याठिकाणी विघटन होते, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उबाठा गटाचे नाशिकचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची बुधवार, ४ जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आता बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उबाठा गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच उबाठा गटात भूकंप येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, २ जून रोजी नाशिक येथे श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली असून शपथविधीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी आजपर्यंत अनेक खाती सांभाळली आहे. आता जे काही खाते मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) प्रकल्पासाठी जागा महसूल विभागाची जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निर्णय घेतला. यावेळी आमदार सीमा हिरे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशाला मंगळवार, दि. ६ मे रोजी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
prosperity journey of Nashik उद्योग आणि कृषी क्षेत्राचा उत्तम मिलाफ साधत मुंबई, पुण्यानंतर नाशिक वेगाने आपला विकास साधत आहे. इथल्या ग्रामीण भागानेही चांगलीच कात टाकायला सुरुवात केली असून द्राक्षे, टोमॅटो आणि कांदा पिकाने शेतकरी वर्गाला आर्थिक समृद्ध केले, तर मधल्या काळात आलेल्या अनेक उद्योगांनी नाशिकच्या विकासाची चाके गतिमान केली.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील केळी व्यापारी सुरेश त्र्यंबक नाईक यांनी एक अनोखे पाऊल उचलले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त व्हावा, या हेतूने त्यांनी पंतप्रधान मदतनिधीत १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे.
नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यात वनरवाडी गावात बुधवार दी.२३ एप्रिलच्या सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पायल चव्हाण २१ वर्षीय युवती शेतात गवत कापयचे काम करत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. कुणालाही काही समजायच्या आत बिबट्याने पायलला जवळपास 6 ते 7 फूट फरफटत नेले.
कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणाची फूस होती? नाशिक हिंसाचाराचं मविआ कनेक्शन नेमकं काय आहे?
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (Nashik Ring Road) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
nilesh deshpande nashik रांगोळीला ‘महारांगोळी’चे स्वरूप देऊन त्याला सामाजिक जनजागृतीची जोड देणार्या नाशिकच्या निलेश मधुकर देशपांडे यांच्याविषयी...
नाशिकमधल्या काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावरून झालेल्या हिंसाचारानंतर नाशिक पेटवण्याचं राजकीय कारस्थान होतं का असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणी पोलिस तपासात उघडकीस आलेलं मविआ कनेक्शन. संशयितांमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय.आतापर्यंत जवळपास दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या हिंसाचार प्रकरणातील राजकीय धागेदोरे समोर आल्यानंतर गंभीर सवाल उपस्थित होतायत. नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून काठे गल्ली येथील अनधिकृत सातपिर बाबा दर्गा हटवण्याची मोहिम मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुरु करण्यात आली. मात्र, यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
( Nashik Municipal Corporation hammers at unauthorized dargah ) उच्च न्यायालयाने आदेश देवूनही सातपीर दर्गा हटविण्यात न आल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अखेर दर्ग्यावर हातोडा चालवत जमिनदोस्त केला.
Rajendra Pahade Nashik खेळण्या-बागडण्याच्या वयात सुरू केलेल्या व्यवसायात अत्युच्च स्थान गाठत, इतरांचेही आयुष्य प्रकाशाने उजळून टाकणार्या नाशिकच्या राजेंद्र नेमिचंद पहाडे यांच्याविषयी...
मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी झटणारेनाशिक येथील ‘जागर मनाचा’ संस्थेचे संस्थापक शंतनू श्रीरंग गुणे यांच्याविषयी...
( Vijay Chaudhary in Nashik today ) भाजप संघटन पर्व ‘सदस्य नोंदणी अभियाना’च्या अनुषंगाने प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी हे उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव व नंदुरबारमध्ये भाजप पदाधिकार्यांची संघटनात्मक बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनी
(Beed District Jail) बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवार दि. ३१ मार्चला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते टोळीचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. कारागृहात गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर महादेव गितेसह आणखी चार जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. तसेच आता मकोका मधील आठवले टोळीतील आरोपींची रवानगीही नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
( nashik trimbakeshwar temple ) प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यानंतर 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केली असून, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या विकासाला चालना मिळेल आणि भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.
( Nashik Municipal Corporation Urban Planning Department approves 1100 construction proposals ) महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने निर्णयांचा धडाका लावत दि. १६ मार्च ते दि. २६ मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल 1 हजार, 100 बांधकाम प्रस्तावांना ऑफलाईन मंजुरी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशींनी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचा लाभ घेतल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढे आणली होती. दरम्यान, आता या बांग्लादेशींविरोधात बुधवार, २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Preparations for Garud Rath in Nashik are in the final stages ) गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेबरोबरच नाशिककरांसाठी श्रद्धा, जल्लोष आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीराम रथ’ आणि ‘गरुड रथा’च्या मिरवणूक उत्सवासाठी ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’ची नुकतीच शौनकाश्रम, पंचवटी येथे बैठक पार पडली.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, २३ मार्च रोजी दिली. त्यांनी २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळ
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जबर तडाख्यांनी उबाठा गटाचे बुरुज एकामागून एक ढासळू लागले आहेत. या बुरुजांची डागडुजी करणे अजूनही उद्धव ठाकरे यांना शक्य झालेले नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका पाहून, ठाकरेंचा एक एक मोहरा एकनाथ शिंदेंकडे डेरेदाखल होत असून, ठाकरे आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांना हताशपणे बघण्यावाचून दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कोकणातून राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आह
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.